सिलेंडर कर डर
होईल सबसिडीही रद्द
आकडा नेहमी वर असेल
सिलेंडर दर वाढीचं
लोकांना मोठं डर असेल
जशी मनमानी वाटेल तसं
बिंधास्तपणे रेटलं जाईल
नव-नवे कर लाऊन लाऊन
ग्राहकांनाही लुटलं जाईल
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
सिलेंडर कर डर
होईल सबसिडीही रद्द
आकडा नेहमी वर असेल
सिलेंडर दर वाढीचं
लोकांना मोठं डर असेल
जशी मनमानी वाटेल तसं
बिंधास्तपणे रेटलं जाईल
नव-नवे कर लाऊन लाऊन
ग्राहकांनाही लुटलं जाईल
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कार्य पध्दती
इकडे गर्दी तिकडे गर्दी
बँकेसमोर दाटली आहे
लवकर नंबर लावण्या
रांगेस रांग तटली आहे
त्रासदायक ठरतील अशा
समस्या ना ऊगवल्या जाव्यात
सहज सुलभ होतील अशा
पध्दतीही राबवल्या जाव्यात
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
बाजार टेलिकॉम
टेलिकॉम कंपन्यांची कानी
रोज नव-नविन ऑफर आहे
ग्राहकांतही आहे ऊत्सुकता
कोणती ऑफर टॉपर आहे
जो परवडेल तोच आपला
समाजात समज पसरला आहे
अन् टेलिकॉम कंपन्यांचा जणू
बाजार आता घसरला आहे
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
अडलेला निकाल
आता लागेल,मग लागेल
निकालाची वेटींग आहे
मुंबई विद्यापीठ निकाल
जणू घसरली सेंटींग आहे
इकडून आणि तिकडूनही
होऊ लागला कालवा हो
विद्यार्थ्यांचं हित जपण्या
सेटींग जराशी हलवा हो
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
फॅक्ट
कितीही वागलं सरळ तरी
म्हणे लोकांना दिसत नाही
सरळ सरळ वागलेलं इथे
लोकांच्या मनी बसत नाही
नको तितकी मनी दाटलेली
वरवर वाढती नाराजी आहे
मात्र इतरांना समजुन घेण्या
इथे कुणाीच ना राजी आहे
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
तडका
रस्ते सुरक्षा
इकडून खड्डे,तिकडून खड्डे
खड्डेच खड्डे आहेत रोडवर
अन् खड्डे बुजण्यासाठी इथे
अहो जोडही दिलेत जोडवर
रस्त्यातील प्रत्येक खड्डयास
जरा गांभिर्याने पाहिलं जावं
रस्ते सुरक्षिततेसाठी प्रशासन
सदा कर्तव्यदक्ष राहिलं जावं
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
ऑफर
ऑफर वरती ऑफरचा
भलता भडीमार आहे
जिकडे-तिकडे ऑफरचे
खुले झालेले द्वार आहे
ऑफर दिसेल तिकडेच
लोकांचाही ओघ असतो
मनाला भरळ पाडणारा हा
ऑफर नामक रोग असतो
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३