हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१६

तडका - सहली करताना

सहली करताना

सहलीवरील बंधनं
झटक्यास घेतले मागे
निसर्गाशी सहलीचे
जुळून आले धागे

सहलीत झालं सामिल
पुन्हा गतवैभव बेरजेचं
मात्र सहली करताना
काळजी घेणं गरजेचं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, १० फेब्रुवारी, २०१६

तडका - फरफटक

तडका - चौकशीचं घोडं

चौकशीचं घोडं

सत्तेच्या दुरूपयोगाने
केली म्हणे गफलत
पण कायद्याच्या कचाट्यातुन
कशी मिळेल सफलत,..?

एका-एकाच्या नावानं
आता वेग धरू लागलं
अन् चौकशीचं घोडं हे
नेत्यांदारी फिरू लागलं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०१६

तडका - सोन्याची साखळी

सोन्याची साखळी

हवेतुनही काढतोय सोनं
बाबा भलता चमत्कारिक
मिळाले सोने अजुन तर
प्रगती होईल फूत्कारित

कित्तेक लोकही होतील फॅन
मग वाट का पाहतोय कोणाची
दारिद्रय इथले घालवण्यासाठी
ती वाटावी साखळी सोन्याची

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - खंजर वाला Dp

खंजर वाला Dp

यांनी यांचे मांडले तर
त्यांनीही मांडले त्यांचे
कुणी मांडले मुद्देसुद
कुणी मांडले अंदाजपंचे

हा घडला सारा प्रकारही
कित्तेक अर्थ पांगवु लागला
अन् खंजरवाला डिपीही
भलती चर्चा रंगवु लागला

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१६

तडका - चॉकलेट डे

चॉकलेट डे

प्रेमाने द्यावे,प्रेमाने घ्यावे
चॉकलेट डे चं चॉकलेट
आनंदाने खावे

मना-मनातुन,मना-मनात
चॉकलेट डे चं प्रेम
भर-भरुन यावे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - भलरीचा सूर

भलरीचा सूर

सुगीच्या गस्त्यामथ्ये
आता ना ऊल्हास आहे
काढणीमधला जोशही
आता जणू खल्लास आहे

या पडल्या दुष्काळाने
शिवार सारा करपलाय
तो भलरीचा सुर सुध्दा
शिवारातुनच हरपलाय

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३