हा ब्लॉग शोधा

बुधवार, १७ जून, २०१५

तडका - संपत्तीचे गुपित,...?

संपत्तीचे गुपित,...?

ज्यांना जाणते म्हटले
तेच जणू लबाड आहेत
भ्रष्टाचारी कमाईचे म्हणे
त्यांच्याकडे घबाड आहेत

लबाडाच्या घबाडाचा हा
ताजा-तवाना किस्सा आहे
भुजबळांच्या संपत्तीत म्हणे
भ्रष्टाचाराचा हिस्सा आहे,...?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

मंगळवार, १६ जून, २०१५

तडका - सत्य चौकशीचे

सत्य चौकशीचे

प्रत्येकाच्या कर्माचे परिणाम
ज्याला-त्याला धडकले जातात
अन् घोटाळेखोरांचे घोटाळेही
वाटोळ्यांत अडकले जातात

मनी लालसा जोपासणारे
मना-मनात निदण असते
अन् कुणी किती खाल्लं याचे
चौकशीअंती निदान असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - हे सत्य आहे

तडका - छापे-काटे

छापे-काटे

चौकशीत समोर येईल की
कोण-कोण ढापे आहेत
आता एका-एका घरावर
छाप्यावरती छापे आहेत

वाढता वेग धरत-धरत
आता चौकशीचे रेटे आहेत
पडणार्‍या प्रत्येक छाप्यांचे
कुठे टोचते काटे आहेत,...?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

सोमवार, १५ जून, २०१५

तडका - छत्रीची गरज

छत्रीची गरज

पाऊस पडणार म्हणजे
भिजण्याची खात्री असते
मात्र आपल्या बचावाला
खंबीरपणे छत्री असते

मात्र पावसाच्या स्वागताला
भिजण्याची भीती दिसत नाही
अन् पावसाच्या आनंदात
छत्रीची गरज असत नाही,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

रविवार, १४ जून, २०१५

तडका - सुट्ट्या संपल्याचा आनंद

सुट्ट्या संपल्याचा आनंद,...

दिर्घकाळ भेटलेल्या सुट्टीलाही
दिर्घकाळाचीच रजा असते
जुण्या आठवणींच्या जोडीला
नव्या क्षणांची मजा असते

शाळेचा पहिला दिवस सदैव
उत्सुकतेत पहूडलेला असतो
अन् सुट्ट्या संपल्याचा आनंद
मना-मनात वाढलेला असतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - सत्य जुण्या-नव्यांचे

सत्य जुण्या-नव्यांचे,...

ज्याच्या त्याच्या काळामध्ये
ज्याची-त्याची चलती असते
मात्र काळ बदलु लागताच
जणू प्रतिमाही ढळती असते

जुण्यांना आलेले अनुभव
नव्यांसाठी सुचक असतात
मात्र जुण्यांपुढचे नवे कधी
जुण्यांसाठी जाचक असतात,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३