हा ब्लॉग शोधा

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४

मृत्युचा चकवा

 मृत्युचा चकवा


जगलो खुप जगणं तरीही

जगण्याचा ना थकवा आहे

पाहताक्षणीच दिसुन येतो

हा मृत्यु मोठा ठकवा आहे


इथे माणसाला माणुस बघा

सहज सहज ठकवु शकतो

पण ठकाच्या महाठकालाही

मृत्यु सहज झुकवु शकतो


इमानाने जीवन जगणारेही

मृत्युच्या तावडीतुन सुटले नाही

असे कोण आहे तेच सांगा

जे मृत्युच्या तावडीत गटले नाही


इथे कित्येक महान व्यक्ती होत्या

त्यांचे मृत्यु जगाची पोकळी आहे

पण जो जन्म घेतो तो मरण पावतो

हीच निसर्गाची साखळी आहे


हा जन्म आहे मरणासाठीच

पण मरण चुकवत जगु चला

माणसांनो माणसांना जपा

आज माणुसकीने वागु चला


एकमेकांस सहाय्य करू

जीवनात पुढेच जाऊ चला

पावलोपावली क्षणाक्षणाला

मृत्युला चकवा देऊ चला


ना ठावुक या वाटेवरती

मृत्यु कुठंशी बसला असेल

पण जेव्हा जेव्हा चकला असेल

मृत्यु नक्कीच हसला असेल


अँड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड. 

मो. 9730573783


मंगळवार, १२ मार्च, २०२४

तडका - नेता महाराष्ट्राचा

 *तडका-२२३९*


नेता महाराष्ट्राचा


सत्य बोलणं, इमानदार वागणं

पारदर्शक वास्तव सांगणं आहे

सरकारी चुकांना स्टेजवर घेऊन

जनतेसमोर उघड टांगणं आहे


म्हणुनच तर आता असा नेता

जनतेच्या मनात बसलेला आहे

महाराष्ट्रातील तमाम जनतेला

आपला आवाज दिसलेला आहे


सत्तेसाठी लाचार असणारांचे

धाबे दणाणुन गेलेले आहेत

हुकुमशाही, लबाड, लाचार नेते

या निर्भिड नेत्याला भिलेले आहेत


भुतकाळात डोकावुन पाहिले तर

राजकारणात जुनाट चोर आहेत

म्हणुनच महाराष्टाच्या मनातील नेता

स्वाभिमानी प्रकाश आंबेडकर आहेत


ॲड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड

मो. ९७३०५७३७८३


सोमवार, १९ फेब्रुवारी, २०२४

भारताचे संविधान

 हा व्हिडीओ पाहुन तुम्हाला भारतीय असल्याचा अभिमान वाटेल


नक्की पहा


https://youtu.be/BMf_kC35_24?si=PJEUAYF0A4eXlY5n