हा ब्लॉग शोधा

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४

मृत्युचा चकवा

 मृत्युचा चकवा


जगलो खुप जगणं तरीही

जगण्याचा ना थकवा आहे

पाहताक्षणीच दिसुन येतो

हा मृत्यु मोठा ठकवा आहे


इथे माणसाला माणुस बघा

सहज सहज ठकवु शकतो

पण ठकाच्या महाठकालाही

मृत्यु सहज झुकवु शकतो


इमानाने जीवन जगणारेही

मृत्युच्या तावडीतुन सुटले नाही

असे कोण आहे तेच सांगा

जे मृत्युच्या तावडीत गटले नाही


इथे कित्येक महान व्यक्ती होत्या

त्यांचे मृत्यु जगाची पोकळी आहे

पण जो जन्म घेतो तो मरण पावतो

हीच निसर्गाची साखळी आहे


हा जन्म आहे मरणासाठीच

पण मरण चुकवत जगु चला

माणसांनो माणसांना जपा

आज माणुसकीने वागु चला


एकमेकांस सहाय्य करू

जीवनात पुढेच जाऊ चला

पावलोपावली क्षणाक्षणाला

मृत्युला चकवा देऊ चला


ना ठावुक या वाटेवरती

मृत्यु कुठंशी बसला असेल

पण जेव्हा जेव्हा चकला असेल

मृत्यु नक्कीच हसला असेल


अँड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड. 

मो. 9730573783


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा