हा ब्लॉग शोधा

विशाल मस्के लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विशाल मस्के लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०२४

तडका २२४४ - एक्झिट पोल

 एक्झिट पोल


वेगवेगळ्या एक्झिट पोलचे

वेगवेगळे आकडे आहेत

कुणाचे पोल सरळ सरळ तर

कुणाचे पोल लय वाकडे आहेत


एक्झिट पोलवर बघता बघता

निकालावर नजरा फिरल्या जातील

सत्तेच्या बाहेरील पार्ट्या देखील

सहज सत्तेत भरल्या जातील


अँड. विशाल मस्के,

सौताडा, ता. पाटोदा, जि. बीड. 

मो 9730573783


मंगळवार, १२ मार्च, २०२४

तडका - नेता महाराष्ट्राचा

 *तडका-२२३९*


नेता महाराष्ट्राचा


सत्य बोलणं, इमानदार वागणं

पारदर्शक वास्तव सांगणं आहे

सरकारी चुकांना स्टेजवर घेऊन

जनतेसमोर उघड टांगणं आहे


म्हणुनच तर आता असा नेता

जनतेच्या मनात बसलेला आहे

महाराष्ट्रातील तमाम जनतेला

आपला आवाज दिसलेला आहे


सत्तेसाठी लाचार असणारांचे

धाबे दणाणुन गेलेले आहेत

हुकुमशाही, लबाड, लाचार नेते

या निर्भिड नेत्याला भिलेले आहेत


भुतकाळात डोकावुन पाहिले तर

राजकारणात जुनाट चोर आहेत

म्हणुनच महाराष्टाच्या मनातील नेता

स्वाभिमानी प्रकाश आंबेडकर आहेत


ॲड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड

मो. ९७३०५७३७८३


मंगळवार, २ जानेवारी, २०२४

तडका - उपकार

 उपकार


दैनंदिन वावरताना

हा अनुभव येतोय

मुलगी शिकल्यामुळे

समाज प्रगत होतोय


समाजात वावरताना

महत्व वाढलेय बाईचे

कदापी फिटु शकत नाही

हे उपकार सावित्री माईचे


ॲड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड

मो. ९७३०५७३७८३





मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

तडका - विशाल संदेश

विशाल संदेश

तुज हाती चावी आहे
या देशाच्या ही सत्तेची
तुच ठरव दिशा आता
या देशाच्या गुणवत्तेची

संविधानिक बलाढ्य बल
बघ तुज पाठी खंबीर आहे
उठ उधळून भोवळ तुझी
तुच देशाचा शूरवीर आहे

सत्तेतील सुस्त गेंड्यांपुढे
तु कधीही घसरू नकोस
तुज हातीच चावी सत्तेची
कदापिही विसरू नकोस

ॲड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड
मो. ९७३०५७३७८३