हा ब्लॉग शोधा

रविवार, ४ फेब्रुवारी, २०२४

समतेचे शिलेदार

समतेचे शिलेदार


समाजाला हे सांगणं आहे
सत्य सांगतो ही थाप नाही
इथे सामाजिक स्वातंत्र्य आहे
कुणीच कुणाचा बाप नाही

बहिष्काराचे दिवस संपलेत
संविधानिक मूल्य विसरू नये
भुजात बळ आलंय म्हणुन
सामाजिक द्वेष पसरवु नये

मतभेद करावे, विरोध करावे
नितिमत्ता मात्र ढासळु नये
आरोप प्रत्यारोप करते वेळी
बुध्दीचे ताक हिसळु नये

समाज आता प्रगत आहे
विषमता वादी होत नसतो
पण हे आगलावे नेते म्हणजे
हा समाजाचा घात असतो

त्यामुळेच  समाज बांधवांनो
ऐका हा सल्ला आहे मोलाचा
तुमच्या वैचारिक क्षमतेवरच
हा सुर्य तळपतोय समतेचा

या समतेचं हे तेज सदैव
अविरत पणे तळपत रहावं
माणसांनीच माणसांकडे
सदा माणुसकी ने पहावं

तरच सामाजिक समतेने
वैचारिक लढाई लढली जाईल
समाजात विष पेरणारांची
हि खोड देखील मोडली जाईल

उठा बंधुंनो जागे व्हा
ही जिम्मेदारी घेऊ या
अन् सामाजिक समतेचे
चला शिलेदार होऊ या


अँड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783



शनिवार, ३ फेब्रुवारी, २०२४

तडका - नेते गुंड

 नेते गुंड


राजकीय युती असली जरी

वैयक्तिक मात्र खेद असतात

सत्तेत गळ्यात-गळे असुनही

मना मध्ये सुपर भेद असतात


म्हणुनच जीवघेणे हल्ले इथे

निर्भयपणे घडवले जातात

कित्येक गुंड प्रवृत्तीचे नेतेही

पक्षा-पक्षांत वाढवले जातात


ॲड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड

मो. 9730573783


शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०२४

तडका - सत्तेचं गणित

 सत्तेचं गणित


जे निवडून येऊ शकतात

त्यांचा पराभव होऊ शकतो

तर निवडून न येणारांकडुनही

हा पराभव केला जाऊ शकतो


म्हणुनच युती, आघाड्यांची

इथे नेहमी गरज पडली जाते

अन मतांचा अंदाज घेत-घेत

इथे निवडणूक लढली जाते


सरकार स्थापन करण्यासाठी

त्यांचा मोठा आटा-पीटा असतो

पण त्यांना सत्ता देण्याकरीता

मतदारांचाच मोठा वाटा असतो


ॲड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड

मो. 9730573783


मंगळवार, २ जानेवारी, २०२४

तडका - उपकार

 उपकार


दैनंदिन वावरताना

हा अनुभव येतोय

मुलगी शिकल्यामुळे

समाज प्रगत होतोय


समाजात वावरताना

महत्व वाढलेय बाईचे

कदापी फिटु शकत नाही

हे उपकार सावित्री माईचे


ॲड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड

मो. ९७३०५७३७८३





शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३

तडका - लोकशाहीचा विजय असो

 लोकशाहीचा विजय असो


कोण कुणासोबत गेलय

ते आम्ही पाहिले आहे

युती आणि आघाड्यांचे

राजकारण बाकी राहिले आहे


घडत्या राजकीय घडामोडींत

आता अजुन अंत पाहु नये

लोकशाही च्या मजबुती करता

इथला "वंचित" वंचित राहु नये


ॲड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड

मो. ९७३०५७३७८३