हा ब्लॉग शोधा

बुधवार, ३ फेब्रुवारी, २०१६

तडका - समर्थन

समर्थन

अडवतात रस्ते
फोडतात गाड्या
निदर्शनासाठी अशा
करतात काड्या

पाठिंबा दाखवा
पण बेवर्तन नव्हेे
गुंडागर्दी करणे
हे समर्थन नव्हे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - हेल्मेट सक्ती

हेल्मेट सक्ती

जो वापरेल,तो सुरक्षित
न वापरल्यास धोका आहे
हेल्मेट सक्ती असने हा
सुरक्षेचाच मोका आहे

आमची प्रांजळ इच्छा
फरक पडो या ऊक्तीने
स्वत:च्या सुरक्षेसाठीच
हेल्मेट वापरावे सक्तीने

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

मंगळवार, २ फेब्रुवारी, २०१६

तडका - षढयंत्र

षढयंत्र

समाजातिल षढयंत्र देखील
इथे परंपरेनं घेतात वेचून
आपलं झाकून ठेवण्यासाठी
दुसर्‍याचं पाहतात वाकून

मिडीयालाही नविन चर्चेत
इशार्‍यावरच नाचवावं लागतं
कोणाला तरी वाचवण्यासाठी
कोणाला तरी खचवावं लागतं,.?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

रे साजना,...

रे साजना,...

           कवी :- विशाल मस्के
           मो. :- 9730573783

ना येती ओठांवरती
या विरहाच्या वेदना
तुझ्यापरी स्नेहाच्या
दाटल्या रे भावना

शृंगार सारा चढवूनी
तुझविनं हा साज ना
प्रतिक्षा रे तुझीच ही
तुच माझा साजना

ये सख्या तु परतुनी रे
ना मन माझे हे स्वार्थी
गाते रे गुणगाण तुझे
तुझीच ही रे आरती

ओळखते मी जाणते रे
ती तुझ्या मनातील प्रीती
तरीही तु का दूर साजना
हा विलंब नको रे अती

ही आर्त हाक प्राणांतली
देईल तुजला मी खुशी
सल रूसव्या-फूगव्यांची
मनी नको बाळगु अशी

नको दाखवू विरह हा
प्रेमात तुझ्या हसतानी
बघ दिवानी झाली रे
मी तुझीच रे मस्तानी

धूर्त जाहले आज तरीही
तु हो प्रेमाची रे वर्धिका
तुजविनं ही प्रीत अधूरी
मी झाली रे अप'राधिका'

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

* सदरील कविता Rutuja Gawande यांच्या आवाजात ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

* व्हाटस्अप वरून मराठी कविता आणि डेली वात्रटिका वाचण्यासाठी आणि ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

* कविता नावासहित शेअर करण्यास परवानगी.

तडका - भुज"बळ" खचले

भुज"बळ" खचले

फसलो नाही फसवले गेले
त्यांचा प्रांजळ दावा आहे
त्यांच्या बाजुने सरळ सरळ
विरोधी पक्षाचा हेवा आहे

हे तपासाचे  षडयंत्र म्हणे
कटकारस्थानाने पोचले आहे
तरीही घडल्या या प्रकाराने
भुज"बळ" मात्र खचले आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

सोमवार, १ फेब्रुवारी, २०१६

तडका - क्रिकेटचं मार्केट

क्रिकेटचं मार्केट

खेळणारे खेळत असतात
पाहणारे तळममळत असतात
कुणी मारतात ऊड्या तर
कुणी ऊगीच जळत असतात

खेळणारासह पाहणारालाही
भरभरून असा इंजॉय आहे
जगभरातुन पाहिलं तरीही
क्रिकेटचं मार्केट हाय आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - शिक्षक विना-अनुदानित

शिक्षक विना-अनुदानित

कर्तव्यात कसुर नाही
कर्तव्य चोख आहेत
सपोर्टचीही कमी नाही
पाठी त्यांच्या लोक आहेत

झटताहेत शिक्षक सारे
स्व-प्रश्न बाजुला ठेऊन
घडवताहेत भविष्य ते
विना-अनुदानित राहून

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३