हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १० जुलै, २०१५

तडका - भेटी

भेटी

कुणाच्या भेटी अवचित तर
कुणाच्या भेटी ठरवुन असतात
कुणा-कुणाच्या भेटी मात्र
पुन्ह-पुन्हा गिरवुन असतात

कुणाच्या भेटी गुपित असतात
कुणाच्या भेटी ओठी असतात
अन् कित्तेक भेटीं मधून मात्र
कधी भेटी अंती भेटी असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

गुरुवार, ९ जुलै, २०१५

तडका - सत्ता आणि जनता

सत्ता आणि जनता

ज्याचे जसे विचार असतात
तसेच त्याचे प्रचार असतात
सत्ता देणारेच कधी-कधी
सत्तेपुढे लाचार असतात

गोड गुल-गुल बाता बोलुन
जनतेला आधी फसवलं जातं
अन् निवडून आल्यावर जनतेला
आपल्या इशार्‍यावर नाचवलं जातं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - चोरी

चोरी

वेग-वेगळी चोरी करण्यासाठीही
वेग-वेगळी असते शक्कल नवी
पण काहीही चोरता आलं तरीही
काय चोरावं याची अक्कल हवी

नाम बदणाम करणार्‍या चोर्‍यांनी
माणूस स्वत:च्या नजरेत हरला जातो
मात्र चांगुलपणा कितीही चोरला तरी
चांगुलपणानं चांगुलपणा वाढला जातो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

बुधवार, ८ जुलै, २०१५

तडका - माणूसकीचा खातमा

माणूसकीचा खातमा

माणसांचे कुकर्म पाहताना
खुम-खुमतेय खुमखुमी
माणसांत माणूस बनण्या
आज माणुस पडला कमी

माणूस कसं म्हणावं त्यांना
ना पवित्र त्यांचा आत्मा आहे
माणसांतल्याच माणसांकडून
माणुसकीचाच खातमा आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - परस्पर संबंध

परस्पर संबंध

कधी एकमेकांचा परस्पर संबंध
अनपेक्षित पणात दडला जातो
ज्या गोष्टींचा कधी जोडूच नये
अशांचा संबंधही जोडला जातो

कधी चांगुलपणाचा आव असतो
कधी वाईटाचाही घुमजाव असतो
अन परस्पर संबंध जोडण्यामागेही
प्रत्येकाचा वेगवेगळा डाव  असतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

मंगळवार, ७ जुलै, २०१५

तडका - नैसर्गिक प्रकोप

नैसर्गिक प्रकोप

दिला निसर्गानं दगा
मेघ लबाड-लबाड
कसं सावरावं मनं
जीनं उजाडं-उजाडं

अपेक्षांची झाली राख
सारे चुकले अंदाज
थेंब-थेंब डोळ्यातला
कसा वाचवावा आज,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - चव सत्य-असत्याची

चव सत्य-असत्याची

सत्य झाकु पहाणारांना कधी
असत्यही वाटत असतं गोडवं
अन् सत्याची बाजु घेणारांना
कधी सत्यही वाटु लागतं कडवं

सत्य-असत्याच्या सत्यापनाला
कधी वैचारिकतेचेही पेव असते
मात्र आप-आपल्या आवडीनुसार
सत्य-असत्याची चव असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३