हा ब्लॉग शोधा

परस्पर संबंध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
परस्पर संबंध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ८ जुलै, २०१५

तडका - परस्पर संबंध

परस्पर संबंध

कधी एकमेकांचा परस्पर संबंध
अनपेक्षित पणात दडला जातो
ज्या गोष्टींचा कधी जोडूच नये
अशांचा संबंधही जोडला जातो

कधी चांगुलपणाचा आव असतो
कधी वाईटाचाही घुमजाव असतो
अन परस्पर संबंध जोडण्यामागेही
प्रत्येकाचा वेगवेगळा डाव  असतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३