हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ३ जुलै, २०१५

तडका - पावसाळी उन्हाळा,...

पावसाळी उन्हाळा,...

पावसाळा असला तरीही
हा पावसाळा वाटत नाही
पावसाचा पडलेला खंड
आता मनाला पटत नाही

आता या नैसर्गिक विद्रोहाने
निसर्गाचीही अवकळा आहे
अन् पावसाळ्याच्या नावाने
हा पावसाळी उन्हाळा आहे,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

गुरुवार, २ जुलै, २०१५

तडका - योजना,...

योजना,...

नविन असो की जुनी असो
घोटाळ्यात अडकली जाते
लाभार्थ्यांपर्यंत येण्याआधीच
कधी योजना तडकली जाते

गरजुवंतांच्या गरजेसाठीच
कुणी योजना घेऊन येतात
पण लाभार्थी राहतात बाजुला
योजना दुसरेच खाऊन जातात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - मास्टर माईंड,...?

मास्टर माईंड,...?

अंगावर आलेल्या आरोपाला
प्रत्यारोपात फेकला आहे
अन् चर्चेमधला घोटाळाही
घोटाळ्यानंच झाकला आहे

असे "अंदर की बात" वाले वारे
सोशियल मिडीयात फिरू लागले
अन् घडल्या प्रकाराचे मास्टरमाइंड
म्हणे मोठे साहेब ठरू लागले,...?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - गुंता,...

गुंता,...

कुणी सहज गुंतला जातो
कुणी मात्र गुंतवला जातो
न गुंतणाराच्या मागे सुध्दा
कधी गुंता भुंकवला जातो

अनपेक्षित अशा गुंत्याचाही
कधी उपद्रव होऊ शकतो
अन् गुंता सोडता-सोडता
गुंता गुंतत जाऊ शकतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

बुधवार, १ जुलै, २०१५

तडका - आरोप

आरोप,...

कोणीही करू शकतो
कोणावरही करू शकतो
आरोपाचा आरोपवार
कोणावरही फिरू शकतो

आरोपांच्या सत्यापनासाठी
मागे चौकशीची घरघर येते
आरोपात तत्थ्य नसलं तरी
परेशानी मात्र जबर होते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - प्रखरणातले प्रकरणं,...

प्रखरणातले प्रकरणं,...

कुणाचे गार पडलेले आहेत
कुणाचे मात्र तापले आहेत
अन् एका-एकाचे प्रकरणं
इथे अजुनही रापले आहेत

कधी बिनबुडाचे आरोपही
रंगवले तर रंगत असतात
अन् वेग-वेगळ्या तर्‍हेनं
कुतुहलांना टांगत असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

ये रे ये रे पावसा,...

ये रे ये रे पावसा,...

केली होती पेरणी,ठेऊन तुझ्यावर भरवसा
ये रे ये रे पावसा,ये रे ये रे पावसा,...||धृ||
उन्हामधी राबुन राबुन
पै-पै जमा केली होती
जमीन भेगाळलेलीच होती
पण आशा मात्र ओली होती
वाटलं होतं मनामधी,मीळल तुझा वसा
ये रे ये रे पावसा,ये रे ये रे पावसा,...||१||
पहिल्या पावसाचं स्वागत कराया
मानवजात आनंदी झाली होती
तुझे पेपराला फोटो अन्
टि.व्ही.ला बातमी दिली होती
सांग आता तु,का रागवलास असा
ये रे ये रे पावसा,ये रे ये रे पावसा,...||२||
पहिलं कर्ज फिटलं नव्हतं
पण दुसरं कर्ज काढलं होतं
अन् कमी पडलेल्या पैश्यांसाठी
बायकोचं दागिणं मोडलं होतं
उगावणार्‍या सुखालाही,नको टाकु फासा
ये रे ये रे पावसा,ये रे ये रे पावसा,...||३||
आता शेताकडं पाहतानाही
मन उदास-उदास होतंय
अन् करपणारं अंकुर सुध्दा
माझ्याकडं केविलवाणं पाहतंय
कसं सांगु त्याला की,माझा मोकळा झालाय खिसा
ये रे ये रे पावसा,ये रे ये रे पावसा,...||४||
वयानं मोठा असलो तरी
मनानं आज छोटा झालोय
अन् मनाच्याही मनामध्ये
आज तुझाच रे भाटा झालोय
तुझं बालगीतही,मी गाऊ लागलो भरदिवसा
ये रे ये रे पावसा,ये रे ये रे पावसा,...||५||

विशाल मस्के,
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

सदरील कविता ऑडीओ स्वरूपात ऐंकण्यासाठी व्हाटस्अप नंबर : 9730573783

कविता आवडल्यास जरूर पुढे पाठवा,परंतु कविते खालुन नाव काढू नये,...