हा ब्लॉग शोधा

गुरुवार, १४ मे, २०१५

तडका - "क"ची किंमत

"क"ची किंमत

कुणाला कमी समजत
आकलेचे तारे पिंजु नये
कुणाची किंमत कुणीही
कधीही कमी समजु नये

रोडवरती असणाराही कुणी
कधी-कधी करोडपती होतो
अन् किंमतीचा "क" गेला तर
करोडपतीचाही रोडपती होतो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

बुधवार, १३ मे, २०१५

तडका - नैसर्गिक विध्वंस

नैसर्गिक विध्वंस

नैसर्गिक आपत्तींची
नैसर्गीक पीडा आहे
नैसर्गिक नियमांना
नैसर्गिक तडा आहे

नैसर्गिक डाव-पेचांचा
नैसर्गिक कावा आहे
नैसर्गिक विध्वंसाचा
हा जाहिर पुरावा आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - हसण्याचे सत्य

हसण्याचे सत्य

प्रत्येकाच्याच जीवनामध्ये
अटळ स्थानावर हशा असतो
कुणी खद-खदा हसतो तर
कुणी-कुणी मुरमुशा हसतो

कित्तेकांनी हे मान्य केलं की
हसतील त्यांचे दात दिसतील
पण ज्यांना दातच नसतील
त्यांचे दात कसे दिसतील,...!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

मंगळवार, १२ मे, २०१५

तडका - टोमण्यांचा साक्षीदार

टोमण्यांचा साक्षीदार

बाहेरच्यांसह आतले सुध्दा
आता धारेवर धरू लागले
सरकारच्या विरोधात असे
उलट वारे फिरू लागले

सरकारवर निशाणा साधत
आता वारंवार टोमणा आहे
मारलेल्या कित्तेक टोमण्यांचा
साक्षीदार "सामना" आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - शाब्दिक आक्रमण

शाब्दिक आक्रमण

सरळ बोलता येईल तिथे
सरळ-सरळ वार आहेत
कुणावरती ना कुणावरती
रोज शाब्दिक प्रहार आहेत

सरळ बोलता नाही आल्यास
शालीतील जोड्यांचे वापर आहेत
शाब्दीक आक्रमण करण्यासाठी
इथे एकापेक्षा एक सुपर आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

सोमवार, ११ मे, २०१५

तडका - नातं जबाबदारीचं

नातं जबाबदारीचं

वाटलं नसेल त्यांनाही
कि बार चा असा बार होईल
आपण केल्या कर्मावरती
अशाप्रकारे प्रहार होईल

मात्र आपण काय करावं हे
प्रत्येकाला कळायला हवं
आपल्या जबाबदारीशी नातं
जबादारीनं पाळायला हवं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - जनतेच्या भावना

जनतेच्या भावना,...

विकासाची तळमळ सदा
जनतेच्या मनी घूटमळते
मात्र विकासाची दशा इथे
जणू सदैव खळखळते

जनतेच्या आशा-अपेक्षांना
जणू झोलाच दिला जातो
जनतेच्या भावनेचा सांगा
विचारच कुठे केला जातो,.?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३