दुष्काळ भावनांचा
नाते जरी तेच असले तरीही
मनं मात्र हल्ली बदलले आहेत
माणूसकीच्या फिलिंग्स मधून
माणसं बघा आदळले आहेत
अहो पुर्वी माणसांच्या जाण्याने
गावंच्या गावं ओसाड व्हायची
गांवचा माणूस मेला तरीही
गांवभर लोक देखील रडायची
पण आता परिस्थिती बदलली
भावनांचा तुटवडा भासत आहे
गेला तो सोडून देऊन पुढे चला
हे वास्तव समाजात दिसत आहे
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा