हा ब्लॉग शोधा

बुधवार, १४ नोव्हेंबर, २०१८

कशी झाली दिवाळी,...?

कशी झाली दिवाळी,.?

सहज सहज बोलणेही
आता जिव्हारी लागु लागले
मनी एकच वहीम आहे
लोक मुद्दाम वागू लागले

निसर्गाने केलीय बघा, सरळ सरळ टवाळी
तरी लोक विचारतात, कशी झाली दिवाळी,.?

ना खरीपाला पाऊस होता
पिकं जगण्या इतका
ना रब्बीला पाऊस झाला
पेरण्या करण्या इतका

ऐन पेरणीतच, सारी जमीन होती भेगाळली
तरी लोक विचारतात, कशी झाली दिवाळी,.?

झाला असता योग्य पाऊस
तर पेरणी वेळेवर झाली असती
अन् मग आमच्याही घरी ती
हसरी दिवाळी आली असती

निसर्गाने दिलीच नाही, आमच्या कष्टाला टाळी
तरी लोक विचारतात, कशी झाली दिवाळी,.?

फटाक्यांचा नादही जणू
मनी आक्रोेश भासत आहे
अन् आकाशातील रोषनाई
आगी पाऊस दिसत आहे

जराही मन रमलं नाही, दिवाळीच्या फराळी
तरी लोक विचारतात, कशी झाली दिवाळी,.?

दिवाळी निमित्त सांगणे एकच
मनी माणूसकीची वात असावी
आज ऊसवलो, ऊद्या सावरू
पण फक्त तुमची साथ असावी

तरच पुन्हा शेतात, फूलवू नव्याने हिरवळी
सांगा तुम्ही तुमची,कशी झाली दिवाळी,.?

कवी
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

--------------------------------------------------------------
कविता पाहण्यासाठी YouTube लिंक :- https://youtu.be/XY5KPRlPZvM

किंवा व्हाटस्अप करा :- 9730573783
---------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा