हा ब्लॉग शोधा

सोमवार, २१ जून, २०२१

तडका - लाटा कोरोना च्या

 लाटा कोरोना च्या


कुठे कमी, कुठे शिल्लक

दवाखान्यात खाटा आहेत

एका पाठोपाठ एक अशा

कोरोना च्या लाटा आहेत


कोणत्या लाटेत कोणाला धोका

याचेही टार्गेट फिक्स आहेत

नव्या लाटेच्या उद्रेकासाठी

जुन्या लाटांचे साक्ष आहेत


ॲड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड

मो. ९७३०५७३७८३


बुधवार, २ जून, २०२१

तडका - भेटी गाठी

 भेटी गाठी


हल्ली कोण कुणाला भेटेल

अंदाज लावणे चुकीचे आहे

कुणाचे भेटणे षढयंत्री तर

कुणाचे भेटणे एकीचे आहे


मात्र त्यांच्या भेटी-गाठीच्या

चर्चेचा मिडीयात पाऊस आहे

अन् इतक्या भेटी होऊन देखील

ज्वलंत विषयांस कंस आहे ? 


जशा भेटी घडवल्या जातात

तशा समस्याही सोडवाव्यात

जनतेच्या समस्या सोडवण्या

भेटीही नक्कीच वाढवाव्यात


ॲड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड

मो. ९७३०५७३७८३



https://youtu.be/6OwyKSt2iOg


शनिवार, २९ मे, २०२१

तडका - आमचे मत

 आमचे मत


आहे एक राजा शौर्याचा

तर दुसरा राजा ज्ञानाचा

आज संगम घडून आला

दोन्ही राजांच्या वारसांचा


गरीब मराठा समाजासह

हि बहुजनांची आशा आहे

हि महाराष्ट्राचीच नव्हे तर

हि देशाची ही दिशा आहे


ॲड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड

मो. ९७३०५७३७८३


तडका - दारू नवसंजीवनी

 दारू नवसंजीवनी ? 


आर्थिक हातभाराला

दारूच अग्रणी आहे

सरकारच्या नजरेतुन

हि नवसंजीवनी आहे


दारूने सुधरत असेलही ती

सरकारची आर्थिक तिजोरी

पण सरकारी सर्व्हे करून पहावा

इथे दारूने उधाडलेल्या घरी


सरकारला काळीज असेल तर

ते देखील पाझरून जाईल

निर्णय दारू बंदी उठवण्याचा

सरकार देखील बदलुन घेईल


ॲड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड

मो. ९७३०५७३७८३


रविवार, ९ मे, २०२१

तडका - कोरोना विशेष

 कोरोना विशेष


हे मृत्युचे तांडव पाहून

अक्षरशः डोळे वाहिले जातात

वाढदिवसाचे फोटोही

आता धास्तीने पाहिले जातात


मास्क लावावे, हात धुवावे

अत्यावश्यक ती दुरी आहे

आपण आपली काळजी घेणे

हिच पध्दत भारी आहे


अॅड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड. 

मो. ९७३०५७३७८३


शनिवार, ८ मे, २०२१

तडका - आरक्षण

 आरक्षण


कुणाला वाढले जाते

कुणाचे काढले जाते

कुणा-कुणाचे आरक्षण

पुर्ततेत नडले  जाते


विषय गंभीर असला तरी

हा राजकारणी घोळ आहे

आरक्षणाच्या घडामोडी

हा तर सरकारी खेळ आहे?


अॅड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड. 

मो. ९७३०५७३७८३


मंगळवार, १३ एप्रिल, २०२१

तडका - वंदन

 वंदन


जगभरात ठरला ज्ञान लोगो

हि गोष्ट या राष्ट्राच्या जोमाची

आज १४ एप्रिल मंगल दिनी

जयंती साजरी करू भिमाची


प्रत्येक ह्रदयातील स्वातंत्र्याचे

बाबासाहेबांमुळेच स्पंदन आहेत

या राष्ट्र निर्माता युगपुरूषास

आमचे कोटी कोटी वंदन आहेत


अॅड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड. 

मो. ९७३०५७३७८३