हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

माय

-:: माय ::-

तुझ्या साठी मला
केव्हाही सवड आहे
तुझीच तर मला
नितांत आवड आहे

माझ्या मनी सदैवच
तुज मानाचं स्थान आहे
तुझ्या मुळे माझं वैभव
याची मला जाण आहे

तुझ्या गौरवासाठी मी तर
निरंतर कटीबध्द आहे
तुझी महती अपार राहिल
हे ही आता सिध्द आहे

तुला वृध्दींगत करण्या
मी नेहमीच झटत राहिल
तुझा मान-सन्मान सारा
अभिमानानं थाटत राहिल

तुझ्या माझ्या नात्यात कधी
दुरावा येऊच देणार नाही
तुझ्या हिताच्या विरोधात
कधीच कधीच जाणार नाही

आमचं वागणं आमचं बोलणं
फक्त तुझ्याच तर साठी आहे
अंत:करणात कुणीही शिरून बघा
आमची माय फक्त मराठी आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

शुक्रवार, २४ जानेवारी, २०२०

तडका - झेंडा - दांडा

झेंडा-दांडा

झेंडे बदलले असले तरी
दांडे मात्र तेच आहेत
झेंडा कुणाचा दांडा कुणाचा
हे नवनिर्माण पेच आहेत

आपला झेंडा,आपला अजेेंडा
हवा तसा बदलला जाऊ शकतो
अन् दांडा धरून बसणारा मात्र
केव्हाही आदळला जाऊ शकतो

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

मंगळवार, १० डिसेंबर, २०१९

तडका - बाजारे आण्णा

बाजारे आण्णा

नको तो जीवाचा आटापीटा
मोफत मोफत चालु करतात
समर्थनीय सरकार बदलले की
बाजारे आण्णा बोलु लागतात

जवळचे लोक सत्तेत असल्यास
जणू मुग गिळून गप्प असतात
समर्थनीय सरकार आहे तोवर
बाजारे आण्णा ठप्प असतात,.?

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९

तडका - हैदराबादी एन्काऊंटर

✨✨✨ *तडका - २१८५* ✨✨✨

हैदराबादी एन्काऊंटर

काय खरं काय खोटं
चौकशीचा भाग आहे
बलात्कारी आरोपींवर
देशभरातुन राग आहे

झटपट व्हावी शिक्षा
हे जनमनाचं सेंटर आहे 
त्याचंच एक उदाहरण
हैदराबादी एन्काऊंटर आहे,.?


अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

...................................................

शनिवार, २८ सप्टेंबर, २०१९

तडका - ओळखा कोण,.?

ओळखा कोण,..?

आम्ही तिकडे होतो तेव्हा
लोक होते आमच्या मागे
आम्ही इकडे आलो तरीही
लोक आहेत आमच्या मागे

लोकांना मागे खेचत खेचत
आम्ही जातोहेत भलते पुढे 
तरी लोकांत आम्हीच श्रेष्ठ
आम्ही कोण ते ओळखा गडे,?

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१९

तडका - निष्ठा एक चेष्टा

निष्ठा एक चेष्टा

आयाराम अन् गयारामांची
आता मोठीच ऊसंत आहे,.!
राजकारणात निष्ठा असते
हि कथा केवळ दंत आहे,.?

राजकारणाची दिशा तर
जनतेनेही हेरलेली नाही,.?
अन् निष्ठावंत म्हणायला
EVM हि उरलेली नाही,.?

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, १० सप्टेंबर, २०१९

तडका - इलेक्शन जिंदाबाद

इलेक्शन जिंदाबाद

कुणी बदलले छत तर
कुणी बुड बदलले आहेत
कुठे-कुठे वाढलेत सुर तर
कुठे सुड ओसरले आहेत

निवडणूकांच्या पार्श्वभागावर
हि नेहमीचीच गजबज असते
अन् नेत्यांसह कार्यंकर्यांचीही 
जरा गोंधळलेलीच पोज असते

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३