हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

माय

-:: माय ::-

तुझ्या साठी मला
केव्हाही सवड आहे
तुझीच तर मला
नितांत आवड आहे

माझ्या मनी सदैवच
तुज मानाचं स्थान आहे
तुझ्या मुळे माझं वैभव
याची मला जाण आहे

तुझ्या गौरवासाठी मी तर
निरंतर कटीबध्द आहे
तुझी महती अपार राहिल
हे ही आता सिध्द आहे

तुला वृध्दींगत करण्या
मी नेहमीच झटत राहिल
तुझा मान-सन्मान सारा
अभिमानानं थाटत राहिल

तुझ्या माझ्या नात्यात कधी
दुरावा येऊच देणार नाही
तुझ्या हिताच्या विरोधात
कधीच कधीच जाणार नाही

आमचं वागणं आमचं बोलणं
फक्त तुझ्याच तर साठी आहे
अंत:करणात कुणीही शिरून बघा
आमची माय फक्त मराठी आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा