हा ब्लॉग शोधा

गुरुवार, १४ सप्टेंबर, २०१७

तडका - मर्यादा बाह्य

मर्यादा बाह्य

जेव्हाही वाटतं यावं तु
मुद्दाम गायब होणार तु
जेव्हा तु येऊ नये वाटतं
तेव्हाच नेमकं येणार तु

अन् देणार इतका त्रास की
जगणंही वाटतं असह्य हे
ऐकुन घे पावसा थांबव जरा
तुझं येणंही मर्यादाबाह्य हे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७

तडका - निवडणूक

निवडणूक

ग्रामपंचायत निवडणूक
तोंडावर आली आहे
तशी गावा-गावांमध्ये
तयारी सुरु झाली आहे

मनात मनसुबे घेऊन
राजकीय फड रंगु लागले
अन् गावाकडचे जबरे डाव
गटा-गटांत रंगु लागले

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, १२ सप्टेंबर, २०१७

तडका - वादातील संमेलनं

वादातील संमेलन

कधी नंतर तर कधी-कधी
अगोदरच बिघडले जातात
अन् होणारे साहित्य संमेलनं
वादात सापडले जातात

संमेलन अन् वादाचं हे
जुनंच समीकरण आहे
प्रत्येक नव्या संमेलनाला
नव्या वादाचं स्फुरण आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, १० सप्टेंबर, २०१७

तडका - आधार जरूरी है

आधार जरूरी है

इनबॉक्स मधील संख्या
जोरात वाढू लागली
मेसेजेस वरती मेसेजे
कंपनी धाडू लागली

आधार कार्ड लिंकसाठी
कंपनीकडून हट्ट आहेत
नसता सिमकार्ड बंदीचे
नियम देखील घट्ट आहेत

सिम नंबरला आधार देण्या
मोठी ऊडी घेतली जाईल
आधारचा आधार देण्यासाठी
जनता देखील लुटली जाईल,.?

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - नेता

नेता

जनतेमध्ये येऊन
समस्या जाणणारा
जनतेत मिसळुन
आपलं म्हणणारा

असाच पाहिजे नेता
समाज सुधारण्यासाठी
विकासाचे वेगवान वारे
समाजात फिरण्यासाठी

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०१७

तडका - काम-नाम

काम-नाम

काम कोणतंही असो
सहज रखडलं जातं
नावासाठी थोडं-फार
चर्चेत पाखडलं जातं

संधी मिळेल तिथे-तिथे
हेच श्रेय घेऊ लागतात
यांचेच नावे पुढे येऊन
कामं मागे राहु लागतात

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३