हा ब्लॉग शोधा

सोमवार, २८ नोव्हेंबर, २०१६

तडका - निवडणूकीय निकाल

निवडणूकीय निकाल

कुणाला होतात गुदगुल्या तर
कुणाला मात्र धक्के बसतात
निवडणूकीय निकाल म्हणजे
लोकशाहीतील एक्के असतात

विरोधकांचा विजय पाहून पाहून
डोक्यात न सोसती जळजळ असते
थोडक्यात हूकलेली बाजी म्हणजे
मनातल्या मनातही हळहळ असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - सुट्टे

रविवार, २७ नोव्हेंबर, २०१६

तडका - लाच एक कलंक

लाच एक कलंक

कितीही नाही म्हटलं तरी
अंधारातुन चालु आहे
लाच देणे-लाच घेणे
जणू व्यवहाराचा पैलु आहे

मात्र लाच देणे-घेणे
समाजात थांबायला हवे
अन् लाचेच्या व्यवहारवाले
तुरूंगात कोंबायला हवे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०१६

तडका - इशारा धोक्याचा

इशारा धोक्याचा

काळाच्या ओघात माणसं
बदलत चालली आहेत
माणसांशी वागतानाही
माणसांवर कलली आहेत

माणसांशी माणसांचेच
अंदाज धुक्यात आहेत
इथे पाळणाघरं देखील
आता धोक्यात आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०१६

तडका - लोकशाहीची खरी ताकत

लोकशाहीची खरी ताकत

विनवण्या वर विनवण्या
वारंवार होऊ लागल्या
पक्षवार प्रचार गाड्याही
दारात घिरट्या घेऊ लागल्या

पण भ्रष्ट आणि कुचकामींवर
आता जनता कोपयला हवी
लोकशाहीची खरी ताकत
लोकांमध्येच दिसायला हवी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०१६

तडका - चंगळ

चंगळ

हि नोटाबंदीची स्वारी
देशभरात फिरली आहे
काळ्या पैशाची किंमत
कवडीमोल ठरली आहे

म्हणूनच काळा पैसा म्हणजे
आता रिकामी ओंजळ आहे
आणि ज्यांच्याकडे पैसा नाही
त्यांच्याच मनात चंगळ आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०१६

तडका - आपले अधिकार

आपले अधिकार

माणसं फसतात म्हणून
सहज फसवले जातात
पैशाचे अमिश दाखवुन
सहज ऊसवले जातात

स्वाभिमान ठेवत गहाण
कुणी पैशा पुढे झूकू नयेत
माणसांनी आपले अधिकार
कवडीमोल विकू नयेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३