हा ब्लॉग शोधा

बुधवार, ९ डिसेंबर, २०१५

तडका - दारू संधी,...?

दारू संधी,...?

कितीही करा आंदोलनं
अन् कितीही काढा मोर्चे
कितीही मांडा वास्तव
कित्तेक ऊध्वस्त घरचे

त्यांचे र्‍हदय मुर्दाडच
ही कसली धुंदी आहे
दारुबंदी ऐवजी जणू
इथे दारूसंधी आहे,.?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

मंगळवार, ८ डिसेंबर, २०१५

तडका - अधिवेशन

अधिवेशन

अतिमहत्वाच्या मुद्यांनाही
सरकार कडून डागणी आहे
चर्चा नको घोषणा हवीय
विरोधकांची मागणी आहे

पाहणारांनी समजुन घ्यावे
हे नक्की कोणते टोक आहे
सभागृहापेक्षा सभागृहाबाहेर
अधिवेशन आक्रमक आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - हिवाळी अधिवेशन

हिवाळी अधिवेशन

जे प्रश्न सुटले नव्हते
ते प्रश्न पेटले आहेत
कित्तेक दबलेले आवाज
अधिवेशनात उठले आहेत

ज्वलंत-ज्वलंत विषयांनी
सरकारलाही घेरले आहे
आणि हिवाळी अधिवेशन
गरमा-गरम ठरले आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

सोमवार, ७ डिसेंबर, २०१५

तडका - वाटणी महाराष्ट्राची

वाटणी महाराष्ट्राची

आपले असुन परक्यावानी
आता आपलेच वागु लागले
स्वत:साठी वेगळी मागणी
जोर धरून मागू लागले

आपल्या हाताने विनाकारण
करू नये आपलीच छाटणी
ती विदर्भाची निर्मिती नव्हे
महाराष्ट्राची ठरेल वाटणी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - कांदिवली न्युज

तडका - कांदिवली न्युज

सुखी चालल्या जींदगीला
अधोगतीचे बाक आहेत
आगीत फक्त संसार नाही
कित्तेक उमेदी खाक आहेत

जळले आहेत पंख तयांचे
आता झेप घेता येईल का,.?
मोडला संसार सावरण्याला
सरकार मदत देईल का,..?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - उमेदवारीचे सत्य

उमेदवारीचे सत्य

प्रत्येक प्रत्येक निवडणूक
हौसे-हौसेनं लढवावं वाटतं
पण "मन मे हा,मुह मे ना"
नाईलाजाने म्हणावं लागतं

मात्र उमेदवारी नाकारली तरी
खुश असल्याचं दाखवावं लागतं
अन् वाट्याला आलेलं दु:खही
हसतमुखाने पचवावं लागतं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

रविवार, ६ डिसेंबर, २०१५

तडका - मनोगत घटक पक्षाचे

मनोगत घटक पक्षाचे

आम्ही कुठवर वाट पहावी
तुम्ही अजुन ना लाजता राव
सत्ता मिळवली आपण परंतु
तुमचीच पोळी भाजता राव

विस्ताराचा मुहूर्त लांबवुन
आमच्या मनी घालता घाव
सत्तेच्या या वाटा-घाटीत
तुम्ही चिडी खेळता डाव,.!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३