हा ब्लॉग शोधा

रविवार, १० मे, २०१५

तडका - शेतकरी,...

शेतकरी,...

शेतकर्यांना इजा होणारी
कुणी भाषा करू लागलेत
ज्यांच्या आशा धरायच्या
तेच ठोशा मारू लागलेत

'शेतकरी जगाचा पोशिंदा' या
निष्ठेचा आशय गेला आहे
अन् शेतकरी जणू त्यांच्या
चेष्ठेचा विषय झाला आहे,..?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - आठवणी,...

आठवणी,...

जीवनामध्ये खुप काही
प्रत्येकाला कमवावं वाटतं
मात्र जे आयुष्यभर कमावलं
तेही क्षणात गमवावं लागतं

कुणी अनुभव घेऊन पाहतात
कुणी अनुभव दूरून पाहतात
कमावलेल्या अन गमावलेल्या
आठवणी मात्र उरून राहतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

शनिवार, ९ मे, २०१५

तडका - आमचा सल्ला

आमचा सल्ला

आप-आपल्या पध्दतीनं
प्रत्येकजन बोलतो आहे
कुणी जनतेच्या भावनांशी
भावनाशुन्य खेळतो आहे

मात्र ठोकायच्या म्हणून
उगीच बाता ना ठोकाव्यात
आपल्या भावना मांडताना
इतरांच्या भावना जपाव्यात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - घटकपक्षांचे एल्गार

घटकपक्षांचे एल्गार

देणारांनी अजुन ना दिला आहे
ना मागणारेही थकलेले आहेत
सत्तेत वाटा मिळवता-मिळवता
घटकपक्ष मात्र ठकलेले आहेत,.?

सत्तेतला वाटा देण्याबाबत
देणारे अजुनही गपगार आहेत
मात्र सत्तेसाठी घटकपक्षांचे
एल्गारांवरती एल्गार आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

शुक्रवार, ८ मे, २०१५

तडका - कायदा

कायदा

कायद्यापुढे सर्व समान आहेत
विषय नाही गरिब-श्रीमंतीचा
विषय आहे मात्र गरिबाच्या
न्यायासाठी होणार्या भ्रमंतीचा

न्यायिक विषमतेचा विषय मात्र
नव्या नव्याने नवतीवर असतो
सर्वांसाठी कायदा समान आहे
उपयोग मात्र कुवतीवर असतो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - प्रसिध्दीच्या पोळ्या

प्रसिध्दीच्या पोळ्या

जे काही अंदाज लावलेले होते
ते सुध्दा व्यर्थ होऊन राहिले
आप-आपल्या पध्दतीनं कुणी
वेग-वेगळे अर्थही लावुन पाहिले

वैचारिक आणि अवैचारिक सुध्दा
एकएकाचे विधानं गाजु लागतील
कुणी सलमान खानच्या खटल्यावरती
प्रसिध्दीच्या पोळ्याही भाजु पाहतील

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

गुरुवार, ७ मे, २०१५

तडका - सल-मान

सल-मान

कुणी म्हणाले योग्य आहे
कुणी मात्र रडून गेले
सलमानच्या शिक्षेवरती
खुप काही घडून आले

सलमानच्या या प्रकरणात
कुणी सांत्वनाला जाई
मात्र कुणा-कुणाच्या मनात
सल आहे पण मान नाही

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३