हा ब्लॉग शोधा

रविवार, ७ जून, २०२०

तडका - अनलॉक १.०

अनलॉक १.०

सामाजिक बांधिलकी साठी
आमचं मुद्दाम छापणं आहे
आपण स्वत:ला जपणं म्हणजे
हे समाजालाही जपणं आहे

आपण हे विसरूच नये की
आपणच समाजाचा हिरो आहे
कारण प्रत्येकाच्या जबाबदारीचं
आज हे अनलॉक १.० आहे

अँड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड. 
मो. ९७३०५७३७८३

तडका - दुकानांची व्यथा

दुकानांची व्यथा

जरी अटी-शर्तींवरती दुकान
उघडण्यासाठी मुभा आहे
तरी दुकानाच्या असपास
कुणी ग्राहक ना उभा आहे

पोट भरण्याचा प्रश्न म्हणून
दुकाने जरी उघडले आहेत
तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
आर्थिक स्रोत गडगडले आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड. 
मो. ९७३०५७३७८३

................................................... 

युट्युब लिंक :- https://youtu.be/RqnjDtDEnJ8

शनिवार, ६ जून, २०२०

सम-विषम

सम-विषम

आज बंद उद्या चालु
नियम आहे गरजेचा
लॉकडाऊन सोडताना
आरोग्याच्या बेरजेचा

सम-विषमता पाळत
प्रशासनाला साथ द्या
एकमेका सहाय्य करत
कोरोनाला मात द्या,...

अँड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड. 
मो.  9730573783

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

युट्युब लिंक :- https://youtu.be/X_Wvx1QYLRU

गुरुवार, ४ जून, २०२०

तडका - हात्तीच्या आईला

हात्तीच्या आईला

प्राणी मित्रांवर दया करा
समाजाचे हे ब्रीद आहे
तरी प्राण्यांची हत्या होते
याचा मनाला खेद आहे

अविचारी त्या माणसाला
हा प्रकार कसा पटला असेल
नक्कीच हात्तीच्या आईला
माणूस राक्षस वाटला असेल.?

अँड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड. 
मो. ९७३०५७३७८३

वात्रटिका :- हात्तीच्या आईला
वात्रटिकाकार :- विशाल मस्के
मोबाईल नंबर :- 9730573783


वात्रटिका पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा :- https://youtu.be/19B8qb5kdMU

मंगळवार, २ जून, २०२०

तडका - आपत्तीच्या सामन्याला

आपत्तीच्या सामन्याला

कोरोना वाढत असतानाच
उंबरठ्यावर वादळ आहे
एकामागून एक संकटाने
ही आपत्तींची वर्दळ आहे

आता खचलेल्या मनांनीही
पुन्हा नव्याने उठावे लागेल
प्रत्येक आपत्तीच्या सामन्याला
सार्यांनी मिळुन झटावे लागेल

अँड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड. 
मो. ९७३०५७३७८३

एक खाच मनाची

एक खाच मनाची

घरात रहा, घरात रहा
सुरक्षेचे सांगणे आहे
तरी देखील समाजात
लोकांचे हे पांगणे आहे

कुणी भलताच दक्ष तर
कुणी मात्र ढिलाच आहे
माणसांचा शत्रू माणूस ही
मानवी मनाची खाच आहे

अँड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, २३ मार्च, २०२०

तडका - फरिश्ता

फरिश्ता

कोई फरिश्ता आएगा
हम सब को बचाएगा
छोडो अब ये ढीली सोच
ना कोई फरिश्ता आएगा

रहो घर पर बचाओ खुद को
और बचाओ एक एक रिश्ता
यहीं तो इंसानियत जरूरी है
अब बन जाओ खुद ही फरिश्ता

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३