हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०१५

तडका - पावसाचा जोर

पावसाचा जोर

टिपका-टिपका टिपकवुन
पावसाला हूलकावणी आहे
दिसतोय पण पडत नाही
हि नैसर्गिक सतावणी आहे

जोरदार पाऊस पाहण्याला
आस आमची सक्षम आहे
मात्र पावसाचा झिमझिमाट
जोर धरण्यास अक्षम आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

सोमवार, ३ ऑगस्ट, २०१५

तडका - कृत्रिम पावसात

कृत्रिम पावसात

एकापेक्षा एक विध्वंस करत
निसर्गाने इतिहास रचला आहे
शेतकर्‍यासह सामान्य माणूस
आता दुष्काळाने खचला आहे

अनपेक्षित नैसर्गिक कोपामुळे
अपेक्षांचे भांडार थिजु लागले
तरीही मात्र मनातील स्वप्न
कृत्रिम पावसात भिजु लागले

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - फिल्मी कोडं

फिल्मी कोडं

वेग-वेगळे डायलॉग घेत
तीच-तीच विचारपुस सुरू आहे
सोशियल मिडीया झिंगला पार
मात्र शंकेचा ताठ मेरू आहे

सांगणारालाच काय सांगायचंय
हे एक न सुटणारं तिडं आहे
कटप्पाने बाहूबलीला का मारले
हे कित्तेकांना पडलेलं कोडं आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

रविवार, २ ऑगस्ट, २०१५

तडका - ग्रा.पं. निवडणूक

ग्रा.पं. निवडणूक

घरा शेजारील घरं देखील
कट्टर विरोधक बनले जातात
तर कट्टर विरोधकांशीही कधी
स्नेहाचे बंध विनले जातात

प्रत्येक-प्रत्येक उमेदवारालाही
एका-एका मताची भुक असते
मात्र सहजा-सहजी न कळणारी
ग्रामपंचायतीय निवडणूक असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - मित्रत्व

मित्रत्व

कुणाकडून नियतीत आहेत
कुणाकडून नियती बाहेर आहेत
मित्रत्वाच्या व्याख्या इथे
एकापेक्षा एक माहिर आहेत

आप-आपल्या विचारांनुसार
खरे मित्रत्व सांगु लागले
हास्यास्पद अन् गंभीर वारे
सोशियल मिडीयात झिंगु लागले

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शनिवार, १ ऑगस्ट, २०१५

तडका - फ्रेंडशिप डे

फ्रेंडशिप डे

ह्रदयापासुन निघालेला
ह्रदयापर्यंत वे असतो
शुभेच्छा देण्या-घेण्यासाठी
फ्रेंडशिपवाला डे असतो

आपुलकीच्या वर्षावाचा
रोजच इथे वारा वाहतो
मात्र "फ्रेंडशिप डे" हा
आहे म्हणून साजरा होतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.9730573783

सदरील वात्रटिका ऑडीओ स्वरूपात ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर : 9730573783

तडका - चव

चव

ज्या गोष्टींचा आदर करावा
त्यांची कदर होत नाही
चांगल्याचाही चांगुलपणा
कधी सादर होत नाही

कोणत्या गोष्टींना कसे पहावे
हे तर संस्काराचे पेव असते
मात्र बेचव माणसांना
चवीचीही चव नसते,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३