हा ब्लॉग शोधा

बुधवार, २० मे, २०१५

तडका - उन्हाची गुर्मी

उन्हाची गुर्मी

नैसर्गिकता बदलु लागली
वातावरणातच घोळ आहे
सहनशिलतेच्या अंतापर्यंत
उन्हाची चढती मजल आहे

तापमापीतील पार्याचीही
आता कांडी चढली आहे
अन् गर्मठ-गर्मठ उन्हाची
जणू गुर्मी वाढली आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

मंगळवार, १९ मे, २०१५

तडका - वेळ

वेळ

चांगल्या दिवसांच्या प्रतिक्षेत
वाईट दिवस जगावे लागतात
आपण केलेल्या कर्माची फळे
आपल्यालाच भोगावे लागतात

आपली प्रतिमा आपल्याकडूनच
कधी-कधी डागली जाऊ शकते
अन् अच्छे दिन वरही बुरे दिनची
कधी नकळत वेळ येऊ शकते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - मराठी पदार्थ

मराठी पदार्थ

हॉटेल मधील पदार्थांत
मराठी मुद्दा फिरतो आहे
मराठी पदार्थाचा आग्रह
आता जोर धरतो आहे

हॉटेल मधील पदार्थांमध्ये
मराठी झलक दिसली पाहिजे
आपली संस्कृती आपणच
आपणहून जपली पाहिजे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

सोमवार, १८ मे, २०१५

तडका - अपघात मालिका

अपघात मालिका

रोडवरून जाताना इथे
प्रत्येकालाच ओढ असते
तर कुणा-कुणाची हौसेपायी
रस्त्यावरून दौड असते

रस्त्यावरून जाताना इतरांना
वेगाच्यापुढे नमवावे वाटतात
मात्र कित्तेकांना रस्त्यावरती
आपले प्राणही गमवावे लागतात

कुणी मद्यामुळे मरतात तर
कुणी-कुणी खड्यामुळे मरतात
अपघातांच्या या मालिकेमध्ये
लोक मिनिटा-मिनिटाला मरतात

घडणार्या रोजच्या अपघातांमधली
आता दोषांची उकळी टाळायला हवी
रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी
प्रत्येकाने जागरूकता पाळायला हवी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - व्यथा संघर्षाची

व्यथा संघर्षाची

जगण्यासाठी संघर्ष आहे
वागण्यासाठी संघर्ष आहे
जगता-वागताना संघर्षात
मरण्यासाठीही संघर्ष आहे

संघर्ष करावा लागतो आहे
याची आम्हाला खंत नाही
पण संघर्षात अंत होतो
मात्र संघर्षाला अंत नाही,..!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

रविवार, १७ मे, २०१५

तडका - नराधमांच्या वैचारिकता

नराधमांच्या वैचारिकता

माणसांमधली नैतिकता
माणसांकडून दूर्लक्षित आहे
स्रीयांची सुरक्षितता इथे
अजुनही असुरक्षित आहे

स्रीयांवरील अत्याचारांचे
इथे वारंवार उद्रेक आहेत
वासनांध त्या नराधमांच्या
वैचारिकताच ब्रेक आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - उन्हाचा बोभाटा

उन्हाचा बोभाटा,...

उन्हामध्ये काम करणारांच्या
अंगातुन घामाच्या धारी असतात
मात्र उन्हामध्ये न जाणारांकडून
उन वाढीच्या तक्रारी असतात

जे काही पाहिलं तेच सांगतो
आम्ही उगीच बाता मारत नाहीत
काम करून घाम गाळणारे
घामाचा बोभाटा करत नाहीत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३