हा ब्लॉग शोधा

नाराज ऊसळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नाराज ऊसळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ३ ऑक्टोबर, २०१५

तडका - नाराज ऊसळी

नाराज ऊसळी

ज्याच्या त्याच्या नजरेमध्ये
ज्याची त्याची रडार असते
कधी अंतर्गत तर कधी-कधी
बाह्यरूपीही मदार असते

कधी युती जीगरबाज तर
कधी मात्र भेसळी असते
जिथे संधी मिळेल तेथुन
नाराजीची ऊसळी असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३