हा ब्लॉग शोधा

बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

तडका - रोकडा ठार!

 रोकडा ठार! 


रोकडा ठार! रोकडा ठार! 

अहो पेट्रोल गेलं शंभर पार

तुम्ही येऊन बघा बाजारात

गॅस ही चाललाय हजारात


राज्यासह केंद्राचे ही कर

जनता आमची सोसते आहे

सरकार जनतेला पोसते की

जनता सरकारला पोसते आहे ?


ॲड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड

मो. ९७३०५७३७८३


शुक्रवार, १६ जुलै, २०२१

तडका - डॉक्टर

 डॉक्टर


मरणापासुन वाचवु शकतो

मरणा पर्यंत पाठवु शकतो

अहो तब्येतीत बिघाड होताच

लगेच डॉक्टर आठवु शकतो


आपल्या सुखी जगण्याचा

तो ही एक प्रोटेक्टर असतो

माणसांची सेवा करणारा

देव माणूस डॉक्टर असतो


ॲड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड

मो. ९७३०५७३७८३


बुधवार, ७ जुलै, २०२१

तडका - वकील

 वकील


छोटा असतो, मोठा असतो

मध्यम आणि हूशार असतो

प्रत्येक स्तरात असला तरी

वकील कधी लाचार नसतो


भल्या मोठ्या संकटांतुनही

वकील सहज सहज तारतो

म्हणूनच तर संकटकाळी

वकील प्रत्येकालाच स्मरतो


कुणासाठी असतो दिशादर्शक

कुणासाठी मात्र खंजर असतो

जगणे ही हैराण करू शकतो

कारण वकील पण डेंजर असतो


ॲड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड

मो. ९७३०५७३७८३


सोमवार, २१ जून, २०२१

तडका - लाटा कोरोना च्या

 लाटा कोरोना च्या


कुठे कमी, कुठे शिल्लक

दवाखान्यात खाटा आहेत

एका पाठोपाठ एक अशा

कोरोना च्या लाटा आहेत


कोणत्या लाटेत कोणाला धोका

याचेही टार्गेट फिक्स आहेत

नव्या लाटेच्या उद्रेकासाठी

जुन्या लाटांचे साक्ष आहेत


ॲड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड

मो. ९७३०५७३७८३


बुधवार, २ जून, २०२१

तडका - भेटी गाठी

 भेटी गाठी


हल्ली कोण कुणाला भेटेल

अंदाज लावणे चुकीचे आहे

कुणाचे भेटणे षढयंत्री तर

कुणाचे भेटणे एकीचे आहे


मात्र त्यांच्या भेटी-गाठीच्या

चर्चेचा मिडीयात पाऊस आहे

अन् इतक्या भेटी होऊन देखील

ज्वलंत विषयांस कंस आहे ? 


जशा भेटी घडवल्या जातात

तशा समस्याही सोडवाव्यात

जनतेच्या समस्या सोडवण्या

भेटीही नक्कीच वाढवाव्यात


ॲड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड

मो. ९७३०५७३७८३



https://youtu.be/6OwyKSt2iOg


शनिवार, २९ मे, २०२१

तडका - आमचे मत

 आमचे मत


आहे एक राजा शौर्याचा

तर दुसरा राजा ज्ञानाचा

आज संगम घडून आला

दोन्ही राजांच्या वारसांचा


गरीब मराठा समाजासह

हि बहुजनांची आशा आहे

हि महाराष्ट्राचीच नव्हे तर

हि देशाची ही दिशा आहे


ॲड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड

मो. ९७३०५७३७८३


तडका - दारू नवसंजीवनी

 दारू नवसंजीवनी ? 


आर्थिक हातभाराला

दारूच अग्रणी आहे

सरकारच्या नजरेतुन

हि नवसंजीवनी आहे


दारूने सुधरत असेलही ती

सरकारची आर्थिक तिजोरी

पण सरकारी सर्व्हे करून पहावा

इथे दारूने उधाडलेल्या घरी


सरकारला काळीज असेल तर

ते देखील पाझरून जाईल

निर्णय दारू बंदी उठवण्याचा

सरकार देखील बदलुन घेईल


ॲड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड

मो. ९७३०५७३७८३