हा व्हिडीओ पाहुन तुम्हाला भारतीय असल्याचा अभिमान वाटेल
नक्की पहा
https://youtu.be/BMf_kC35_24?si=PJEUAYF0A4eXlY5n
हा व्हिडीओ पाहुन तुम्हाला भारतीय असल्याचा अभिमान वाटेल
नक्की पहा
https://youtu.be/BMf_kC35_24?si=PJEUAYF0A4eXlY5n
*तडका - २२३८*
अशोक चा शोक
तोडा फोडा अन् राज्य करा
ही सत्ताधारींची नीती आहे
ज्याने सत्तेत घोटाळे केले
त्यांना राजकीय भीती आहे
सत्तेत जाता पाप धुतले जाते
हा आता निव्वळ जोक नाही
म्हणुन अशोक च्या सोडचिठ्ठीचा
जनतेला काहीच शोक नाही
ॲड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड
मो. 9730573783
हा आदर्श बरा नव्हे
महाआघाडीतील महाभाग
महायुतीत घुसायला लागले
विरोधी भुमीका बजावणारे
नक्की काय ढोसायला लागले
ब्लॅकमेलिंग म्हणलं तर बघा
आजचा पक्ष प्रवेश खरा नव्हे
कालचा आदर्श दडपवण्यासाठी
आजचा हा आदर्श बरा नव्हे
ॲड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड
मो. ९७३०५७३७८३
कमळाबाईचा वास
पुतण्या सांगे काका ला
बस करा आता वय झालं
अजुन कुठवर संभाळता
तुमचं नेतृत्व लय झालं
नेतृत्व मलाही जमु शकतं
ही गोष्ट एवढी बडी़ नाही
तुमची वेळ निघून गेली
आता ही तुमची घडी नाही
काकांच्या घडीतील वेळेवरच
पुतण्या ने गल्ला भरला होता
आता मात्र काका च्या घडी वर
पुतण्या ने डल्ला मारला होता
जरी चिन्ह आणि नावही गेलं
काका मात्र अजुन उभे आहेत
पण दोघांच्याही मनात आता
स्वहिताचेच मनसुबे आहेत
तसं पहायला गेलं तर बघा
पुतण्या काकाच्या छत्रीत आहे
महाराष्ट्र हे जाणतो आहे की
कोण कुणाच्या कात्रीत आहे
कधी मनात पाल चुकचुकते
ही लढाई एक भास आहे
काका-पुतण्याच्या लढाईला
कमळाबाईचा वास आहे, ?
ॲड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड
मो. ९७३०५७३७८३