हा ब्लॉग शोधा

अशोक चा शोक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अशोक चा शोक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १२ फेब्रुवारी, २०२४

तडका २२३८ - अशोक चा शोक

 *तडका - २२३८*


अशोक चा शोक


तोडा फोडा अन् राज्य करा

ही सत्ताधारींची नीती आहे

ज्याने सत्तेत घोटाळे केले

त्यांना राजकीय भीती आहे


सत्तेत जाता पाप धुतले जाते

हा आता निव्वळ जोक नाही

म्हणुन अशोक च्या सोडचिठ्ठीचा

जनतेला काहीच शोक नाही


ॲड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड

मो. 9730573783