आरक्षण
कुणाला वाढले जाते
कुणाचे काढले जाते
कुणा-कुणाचे आरक्षण
पुर्ततेत नडले जाते
विषय गंभीर असला तरी
हा राजकारणी घोळ आहे
आरक्षणाच्या घडामोडी
हा तर सरकारी खेळ आहे?
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
आरक्षण
कुणाला वाढले जाते
कुणाचे काढले जाते
कुणा-कुणाचे आरक्षण
पुर्ततेत नडले जाते
विषय गंभीर असला तरी
हा राजकारणी घोळ आहे
आरक्षणाच्या घडामोडी
हा तर सरकारी खेळ आहे?
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
वंदन
जगभरात ठरला ज्ञान लोगो
हि गोष्ट या राष्ट्राच्या जोमाची
आज १४ एप्रिल मंगल दिनी
जयंती साजरी करू भिमाची
प्रत्येक ह्रदयातील स्वातंत्र्याचे
बाबासाहेबांमुळेच स्पंदन आहेत
या राष्ट्र निर्माता युगपुरूषास
आमचे कोटी कोटी वंदन आहेत
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
✨✨✨ *तडका - २२१६*✨✨✨
अच्छे दिन : एक आठवण
बायको म्हणाली नवर्याला
हा कोरोना चा काळ आहे
त्यातच पुन्हा छळणारा
महागाईचा ही जाळ आहे
मग नवरा म्हणाला बायकोला
दिवस बदलुन जातील गं
म्हणे कुणी तरी सांगितलंय
'अच्छे दिन' ही येतील गं,...
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783
_________________________________
महाराष्ट्राचा प्राण
छावा घडवला असा की
गाजला सार्या जगामध्ये
कार्य केले त्याने असे की
आदर्श ठरले युगामध्ये
त्या छाव्याची माय तु
महाराष्ट्राची शान आहेस
घडवला महाराष्ट्र तुच
तु महाराष्ट्राचा प्राण आहेस
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
हे सावित्री माई
माई तु शिकलीस म्हणून
शिकवलंस तुझ्या लेकींना
ज्योतिबा आणि तु मिळुन
सुधारलं सामाजिक चुकांना
सामाजिक शैक्षणिक क्रांतीचे
तुम्ही दोघेच तर दाते आहात
आज यशस्वी स्री जीवनाचे
तुम्हीच तर विधाते आहात
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
एक विश
वर्षे येत असतात
वर्षे जात असतात
प्रत्येक नव्या वर्षाला
नवे बदल होत असतात
एकविसाव्या शतकातील
हे साल ही एकविस आहे
वागा सगळे सौख्य भरे
हिच आमची विश आहे
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
✨✨✨ *तडका - २२११* ✨✨✨
*ईडीची स्वारी*
कधी कुणाच्या घरात घुसेल
याचा काहीच नियम नाही
बेहिशेबी मालमत्ता शोधण्या
आता इडीलाही संयम नाही
मात्र इडीची भीती त्यांनाच
ज्यांच्या नियतीत चोरी आहे
भेटली खबर, निघाली निडर
अहो हि इडीची स्वारी आहे
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''