सुरक्षिततेसाठी
आपला आपला विचार घेऊन
एकेक आवाज उठु लागलाय
पाण्याचाच धोका आजकाल
माशालाही वाटू लागलाय,..?
पाण्यात संकट आले म्हणून
त्याने पाण्याबाहेर घसरू नये
पाण्याविना सुरक्षितता नाही
हे माशाने कदापी विसरू नये
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३