हा ब्लॉग शोधा

विद्यार्थी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विद्यार्थी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ४ जुलै, २०१५

तडका - विद्यार्थी

विद्यार्थी

दिवसें-दिवस शिक्षणातही
अमुलाग्र बदल होऊ लागले
शिक्षणाकडे जात असताना
शिक्षण दारात येऊ लागले

ओझे पेलताना दप्तराचे
जोमा-जोमाने नटू लागले
अन् दप्तराच्या भव्यतेपुढे
विद्यार्थी खुजे वाटू लागले

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शुक्रवार, २६ जून, २०१५

तडका - विद्यार्थी हवेत,...!

विद्यार्थी हवेत,...!

पर्याय कोणता निवडावा याची
विद्यार्थ्यांच्या मनात गोची असते
तर शाळा आणि कॉलेजकडून
विद्यार्थ्यांची खेचा-खेची असते

वेग-वेगळे ऑप्शन सांगत-सांगत
विद्यार्थ्यांना राजी करावं लागतं
तर कधी विद्यार्थी शोधत-शोधत
शिक्षकांना दारो-दारी फिरावं लागतं,.!

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३