हा ब्लॉग शोधा

भविष्यात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भविष्यात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०१५

तडका - भविष्यात

भविष्यात

मना-मनात फोफावणार्‍या
प्रसिध्दीच्या भुका आहेत
जातीय सलोखा साधने या
लांच्छनास्पद चुका आहेत

वर्तमानी केलेल्या चुकांचेही
ऐतिहासिक वर्म राहिले जातील
अन् पुरस्कारितांचे कार्य नव्हे
त्यांचे जाती-धर्म पाहिले जातील

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

बुधवार, ५ ऑगस्ट, २०१५

तडका - भविष्यात,...

भविष्यात,...

दिवसें-दिवस टेक्नॉलॉजीत
नव-नविन बदल घडू लागले
हे मान्यच करावं लागेल की
माणसंही पाऊस पाडू लागले

कदाचित संपेल गरज टँकरचीही
भविष्यात बदल फिरू लागतील
कृत्रिम पावसाच्याच मागण्याही
पाण्यासाठी लोक करू लागतील

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३