हा ब्लॉग शोधा

तुर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
तुर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २६ एप्रिल, २०१७

तडका - तुर

तुर

पिकवा पिकवा म्हणून अम्हा
तुम्ही तुर पिकवायला लावली
पुन्हा तुम्हीच फिरवली पाठ
जेव्हा तुर विकायला ठेवली

आता खरं सांगा साहेब तुम्हीच
तुमची भावना का क्रुर आहे
तुमच्या धोरणांनीच केलाय घात
आता आमची संकटात तुर आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३