हा ब्लॉग शोधा

शनिवार, १२ ऑक्टोबर, २०२४

तडका २२४३ - रावण

 तडका २२४३ - रावण


पटेल कुणाला नाही कुणाला

ही गोष्ट अस्सल गाभा आहे

जाळले जरी हो काल मला

आज मी नव्याने उभा आहे


कितीही जाळले तुम्ही मला

तुम्हीच जपुन ठेवणार आहात

पुढच्या वर्षी नव्या दसर्याला

नवे पुतळे लावणार आहात


रावण असा मी अमर जाहलो

मी जळायला थकणार नाही

स्वतःमधला रावण मात्र

तुम्ही कदापी मारू शकणार नाही


अँड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड. 

मे. ९७३०५७३७८३



शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०२४

तडका २२४२ - प्रेस कॉन्फरन्स

 तडका - २२४२




प्रेस कॉन्फरन्स


कुणी असंतोषात तर कुणी

कुणाच्या कात्रीत अडकतात

म्हणुनच विस्फोटक बातम्या

जनतेत रात्रीत धडकतात


पत्रकारांपासुन दुर पळणारे ही

पत्रकार शोधत फिरू लागतात

जनतेत बोभाटा करण्यासाठी

प्रेस कॉन्फरन्स करू लागतात


अँड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड. 

मे. ९७३०५७३७८३


सोमवार, ७ ऑक्टोबर, २०२४

तडका - राजकारण

 तडका - २२४१


राजकारण


काल जरी ते तिकडे होते,

पण आज इकडे आले आहेत

काल कडवट वाटणारेच

आज गोड गोड झाले आहेत


हे येणे आणि जाणे म्हणजे

कल पाहुन तोल टाकणे असते

सत्तेचे स्वप्न बघत बघत

स्वत:चाच अंगठा चुकणे असते


कधी कुठे आणि काय घडेल

हे घडल्यावरच कळले जाते

तेव्हा कळतंं हे राजकारण

इमानदारीने कुठे पाळले जाते,.? 


अँड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड. 

मे. ९७३०५७३७८३


शनिवार, ५ ऑक्टोबर, २०२४

तडका - योजनाच योजना

 योजनाच योजना


योजनांवर योजनांचा पाऊस

जनता लाभाने चिंब झाली

सरकारचा चेहरा पाहताना

योजनाच प्रतिबिंब झाली


योजना एक असली तरीही

जाहिराती अनेक होत आहेत

निवडणूकांना लक्षात ठेवुन

योजनांचे श्रेय घेत आहेत


योजना आणि जाहिरातीत

सरकार कर्जात बुडू नये

पण योजना कुठलीही असुद्या

जनतेने योजना सोडु नये



अँड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड. 

मे. 9730573783




मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४

मृत्युचा चकवा

 मृत्युचा चकवा


जगलो खुप जगणं तरीही

जगण्याचा ना थकवा आहे

पाहताक्षणीच दिसुन येतो

हा मृत्यु मोठा ठकवा आहे


इथे माणसाला माणुस बघा

सहज सहज ठकवु शकतो

पण ठकाच्या महाठकालाही

मृत्यु सहज झुकवु शकतो


इमानाने जीवन जगणारेही

मृत्युच्या तावडीतुन सुटले नाही

असे कोण आहे तेच सांगा

जे मृत्युच्या तावडीत गटले नाही


इथे कित्येक महान व्यक्ती होत्या

त्यांचे मृत्यु जगाची पोकळी आहे

पण जो जन्म घेतो तो मरण पावतो

हीच निसर्गाची साखळी आहे


हा जन्म आहे मरणासाठीच

पण मरण चुकवत जगु चला

माणसांनो माणसांना जपा

आज माणुसकीने वागु चला


एकमेकांस सहाय्य करू

जीवनात पुढेच जाऊ चला

पावलोपावली क्षणाक्षणाला

मृत्युला चकवा देऊ चला


ना ठावुक या वाटेवरती

मृत्यु कुठंशी बसला असेल

पण जेव्हा जेव्हा चकला असेल

मृत्यु नक्कीच हसला असेल


अँड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड. 

मो. 9730573783