काळा पैसा
कुणी म्हणतो काळा नाही
कुणी म्हणतो काळा आहे
स्वीझ बँकेतील पैशांवर
सगळ्यांचाच डोळा आहे
विकासाच्या अडवणूकीचे
भ्रष्टाचार हे एक जाळे झाले
काळा पैसा शोधता-शोधता
माणसं देखील काळे झाले ?
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
काळा पैसा
कुणी म्हणतो काळा नाही
कुणी म्हणतो काळा आहे
स्वीझ बँकेतील पैशांवर
सगळ्यांचाच डोळा आहे
विकासाच्या अडवणूकीचे
भ्रष्टाचार हे एक जाळे झाले
काळा पैसा शोधता-शोधता
माणसं देखील काळे झाले ?
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
अफवा
खरी जरी नसली तरी
आहे खरीच भासणारी
जलदतेने पसरणारी
अन् विश्वासही बसणारी
ती जेव्हाही येते तेव्हा
तीची भलती धूम असते
ही अफवा आहेच अशी
जी विश्वासाचा खुन असते
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
सोयरिक फॅक्ट
सुन करायची म्हटलं की
शेतकामाला असावं वाटतं
मुलगी द्यायची म्हटलं की
शेतकामच नसावं वाटतं
सोयरिकीच्या बोला-चालीत
हा तर वास्तवी पगडा आहे
मुलगी-सुन समान वागवा
आमचा वैचारिक झगडा आहे
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
माणूसकी
निरिक्षण करून पाहिलं तर
हा विचार आता पटतो आहे
माणूस माणसाला जपतो आहे
माणूस माणसाला टोचतो आहे
स्वार्थापोटी प्रेम, आपुलकी
जाहिररित्या छेडतो आहे
माणसांनाही मारून इथे
माणूसपणाच सोडतो आहे
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
प्लॅस्टीक वापर
घातक आहे, बाधक आहे
याची खात्री झालेली आहे
म्हणूनच तर सरकारनेही
प्लॅस्टीक बंदी केलेली आहे
कुणी केले समर्थन तर
कुणी जोक मारून हसत आहे
प्लॅस्टीक टू पॉलिटीक्स असा
वाढलेला वापर दिसत आहे
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३