हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

तडका - एक विश

 एक विश


वर्षे येत असतात

वर्षे जात असतात

प्रत्येक नव्या वर्षाला

नवे बदल होत असतात


एकविसाव्या शतकातील

हे साल ही एकविस आहे

वागा सगळे सौख्य भरे

हिच आमची विश आहे


अॅड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड. 

मो. ९७३०५७३७८३


सोमवार, २८ डिसेंबर, २०२०

ईडीची स्वारी

✨✨✨ *तडका - २२११* ✨✨✨


*ईडीची स्वारी*


कधी कुणाच्या घरात घुसेल

याचा काहीच नियम नाही

बेहिशेबी मालमत्ता शोधण्या

आता इडीलाही संयम नाही


मात्र इडीची भीती त्यांनाच

ज्यांच्या नियतीत चोरी आहे

भेटली खबर, निघाली निडर

अहो हि इडीची स्वारी आहे


अॅड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड. 

मो. ९७३०५७३७८३


'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''' 


गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२०

तडका - सरकार

 सरकार


करा कष्ट कितीही तुम्ही

पण मोबदला मात्र कमी

कष्टाला किंमत देण्याची

पेलेल का सरकारला हमी


सरकारच्या धोरणांमध्ये

जनतेला धोका दिसु नये

जनता विरोधी सरकार

देशात कदापिही असु नये


अॅड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड. 

मो. ९७३०५७३७८३


रविवार, १६ ऑगस्ट, २०२०

तडका - कोरोना छळ

 कोरोना छळ


कितीही नाही म्हटले तरी

हे बाहेर जाणे टळत नाही

बाहेर जाऊन पाहिले तर

सामाज अंतर पाळत नाही


हल्ली तर मना-मनामध्ये 

या कोरोनाचाच ढास आहे

अन् सहवाशी संबंधाला ही

आता संशयाचाच वास आहे


म्हणूनच तर माणूस पाहून

माणूस दुर दुर पळतो आहे

काळजी घेणारांनाही कोरोना

मानसिक दृष्ट्या छळतो आहे


अॅड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड. 

मो. ९७३०५७३७८३

रविवार, ५ जुलै, २०२०

तडका - कानपुर खबर

कानपुर खबर

दिवसेंदिवस वाढती ही
गुन्हेगारीची उभर आहे
फिल्मी गोष्ट नव्हे तर
हि कानपुर खबर आहे

चकमकीत पोलिस शहिद
हि घटना अनपेक्षित  आहे
पण यंत्रणेपेक्षाही गुन्हेगारी
सांगा कशी विकसित आहे

पोलिसांना हवी ती सुरक्षा
हवी तेव्हा धाडली जावी
अन् गुंडांना विकसित करणारी
मानसिकताच उधाडली जावी

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड. 
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, २५ जून, २०२०

तडका - पदाच्या नादात

पदाच्या नादात

या भूलथापा नाहित
हि खबर ताजी आहे
काल जो माजी होता
तोच आज आजी आहे

कितीही बदलल्या टर्म
त्यांना फरक पडत नाही
लोक जाऊ द्या गेले तरी
पण घर पद सोडत नाही

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड. 
मो. ९७३०५७३७८३

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

https://youtu.be/5pH1zp9gTGo

बुधवार, २४ जून, २०२०

तडका - कमळाचा गोपी छंद

कमळाचा गोपी छंद

करावा लागला संघर्ष
मग बनवला गेला मोहरा
मोहरा बनुन डाव खेळुन
आता बदलुन आला चेहरा

त्याने खेळलेला खेळही 
इथे प्रचंड गाजलेला आहे
त्याचीच दिलती कुर्बानी
आता तोच सजलेला आहे

त्याच्या प्रत्येक बोलण्याला
आताही त्यांचाच गंध आहे
शाब्दिक शिंतोडे उडवणारा
हा कमळाचा गोपी छंद आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड. 
मो. ९७३०५७३७८३

--------------------------------------------------

लिंक :- https://youtu.be/siNORktT1LM