हा ब्लॉग शोधा

रविवार, ४ फेब्रुवारी, २०२४

समतेचे शिलेदार

समतेचे शिलेदार


समाजाला हे सांगणं आहे
सत्य सांगतो ही थाप नाही
इथे सामाजिक स्वातंत्र्य आहे
कुणीच कुणाचा बाप नाही

बहिष्काराचे दिवस संपलेत
संविधानिक मूल्य विसरू नये
भुजात बळ आलंय म्हणुन
सामाजिक द्वेष पसरवु नये

मतभेद करावे, विरोध करावे
नितिमत्ता मात्र ढासळु नये
आरोप प्रत्यारोप करते वेळी
बुध्दीचे ताक हिसळु नये

समाज आता प्रगत आहे
विषमता वादी होत नसतो
पण हे आगलावे नेते म्हणजे
हा समाजाचा घात असतो

त्यामुळेच  समाज बांधवांनो
ऐका हा सल्ला आहे मोलाचा
तुमच्या वैचारिक क्षमतेवरच
हा सुर्य तळपतोय समतेचा

या समतेचं हे तेज सदैव
अविरत पणे तळपत रहावं
माणसांनीच माणसांकडे
सदा माणुसकी ने पहावं

तरच सामाजिक समतेने
वैचारिक लढाई लढली जाईल
समाजात विष पेरणारांची
हि खोड देखील मोडली जाईल

उठा बंधुंनो जागे व्हा
ही जिम्मेदारी घेऊ या
अन् सामाजिक समतेचे
चला शिलेदार होऊ या


अँड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा