हा ब्लॉग शोधा

शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०१५

तडका - राजकारणात

तडका - भांडण तंटे करताना

भांडण तंटे करताना

प्रत्येकाचीच भावना असते
"हम नही किसी से कम,..."
म्हणूणच तर पाहिला जातो
"किसमे कितना है दम,..."

कुणाचा कट्टर विश्वास असतो
"झूंड मे तो शुअर आते है"
मात्र एकमेकांस भीडताना
"शराफत के फेवर जाते है,..!"

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०१५

तडका - वार्षिक आलेख

वार्षिक आलेख

आतले धडपडतात तर
बाहेरचेही तडफडतात
अन् त्यांचे संघर्ष पाहून
आमचे ह्रदय धडधडतात

काय केले अन् काय घडले
हा विषय ही गाजला जावा..?
अन् विकासाच्या आलेखासह
वादंगी आलेख मोजला जावा,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - पेन्शन

पेन्शन

सतावते सल तारूण्यातच
उतारवयातील टेंशनची
म्हणून सेवानिवृत्त व्यक्तींना
साथ असावी पेन्शनची

मोडकळीस आयुष्यामध्ये
जणू उमेदीचा सुधार असतो
अन् उतारवयातील पेन्शन
जगण्याचाच आधार असतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - भांडं

भांडं

यांनी दिला आहे तर
त्यांनीही घेतला आहे
हा पाठींब्याचा विषय
जोमाने पेटला आहे

एकमेकांचं मन देखील
जराही ना थिजलं आहे
भाऊ माना,मित्र माना
भांडं मात्र वाजलं आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०१५

तडका - नगर सेवक

नगर सेवक

येणार्‍या आपत्तींचा देखील
आधीच घेतला जावा आढावा
नगराचा विकास करताना
कधी स्वार्थ मध्ये ना अडावा

दारिद्रयाची जावक करताना
विकासाची व्हावी सदा आवक
नगराचा विकास करण्यासाठी
निस्वार्थीच हवा हो नगरसेवक

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - सत्ता

सत्ता

एकहाती सत्ता घेणासाठी
सारेच उतावळे असतात
वेगळी सत्ता मागण्यासाठी
कधी गोतावळे असतात

एक-मेकांना विरोध करत
हमरी-तुमरी जोरात असते
पण सत्ता आली तरी घरात
अन् गेली तरी घरात असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

बुधवार, २८ ऑक्टोबर, २०१५

तडका - प्रचारात

प्रचारात

मतदारांच्या वशीकरणा
जणू मायावी जाळे असतात
प्रचारांच्या तोफांमध्ये
अश्वासनीय गोळे असतात

कधी आरोप,कधी टीका
कधी गार्‍हाणे घातले जातात
तन-मन-धन देखील
प्रचारात ओतले जातात,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - प्रचारात

प्रचारात

मतदारांच्या वशीकरणा
जणू मायावी जाळे असतात
प्रचारांच्या तोफांमध्ये
अश्वासनीय गोळे असतात

कधी आरोप,कधी टीका
कधी गार्‍हाणे घातले जातात
तन-मन-धन देखील
प्रचारात ओतले जातात,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - डाळ जप्ती

डाळ जप्ती

वाढल्या डाळीच्या भावाने
जनता इथली पीडली आहे
अन् कोट्यावधीची डाळ
गोदामांत पडली आहे,...!

जिथे भांडं फूटेल तिथे
म्हणे डाळीची जप्ती आहे
तरीही सांगा साठेबाजांना
नैतिकता का खुपती आहे,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०१५

तडका - स्टंट मॅन

स्टंट मॅन

सत्ता हाती घेण्यासाठी
नव-नवे स्टंट असतात
कधी बॅक साइट तर
कधी स्टंट फ्रंट असतात

प्रचारकार्याचे उत्साह त्यांच्या
जणू नसा-नसात झिरपतात
पण सत्ता येता कळत नाही
स्टंटमॅन नक्की कुठे हरपतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - प्रिय नेत्यांनो

प्रिय नेत्यांनो

नेत्यांच्या वागणूकीने म्हणे
'नेता' शब्द शिवी झालाय
टोप्या घालण्याचा गुणधर्म
जणू नेत्यांची छवी झालाय

अती व्हि.आय.पी. वागणं
आता नेत्यांनी सोडून द्यावं.?
घेतलं कर्जही तत्परतेनंच
वेळो-वेळी फेडून घ्यावं

ज्याने गौरव व्हायला हवा
त्याने मान ना झूकायला हवी
अन् "नेता" शब्दाची लाजही
आता नेत्यांनीच राखायला हवी

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

तडका - कर्जाळू जीणं

कर्जाळू जीणं

करपतंय पीक
रानही वाळतंय
दूष्काळानं सारं
काळीज पोळतंय

काळ्या मातीमधी
कसं पिकंल सोनं
ठरतंय जीवघेणं
हे कर्जाळू जीणं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - माणसांनो

माणसांनो

माणसांशी हेवे-दावे
जोपासतात माणसं
माणूसकीत वैरपण
खुपसतात माणसं

आपण कसे वागतो हे
माणसांनो तपासा
माणुसकीने माणसांनो
माणसांना जोपासा

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

रविवार, २५ ऑक्टोबर, २०१५

तडका - अहो इलेक्शन

अहो इलेक्शन,...!!!

विकासाचे मुद्दे देखील
कधी बाजुला ठेवले जातात
वैयक्तीक हेवे-दावे मात्र
जोमा-जोमाने तेवले जातात

सत्तेसाठीचा आटा-पीटाही
इथे कुणाचाच झाकत नाही
कारण इलेक्शन आल्याशिवाय
कूठलाच नेता झूकत नाही,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - दाल की बात

दाल की बात

विकणारांची शिजु लागली
खाणारांची शिजणार कशी,.?
आता स्वयंपाकी भातावरती
वरणी डाळ सजणार कशी,.?

अपेक्षांचा चुराडा करत
'अच्छे दिन' वर हा घात आहे
सामान्यांना न परवडणारी
जणू ही "दाल की बात" आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शनिवार, २४ ऑक्टोबर, २०१५

तडका - नाराजाचे मनोगत

नाराजाचे मनोगत

आमचं मस्त चाललंय म्हणा
पण आम्हालाच टोचतं आहे
आमच्याच्याच वागण्यामुळे
आमचं मन खचतं आहे,...

आमच्याचीच कूट नीतीही
आम्हालाच ठकवते आहे
हि मनी पडलेली खंत मात्र
पुन्हा-पुन्हा सतावते आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - कारभार ऑनलाइन

कारभार ऑनलाइन

कोणीही करू शकतो
कोठूनही करू शकतो
हवा असलेला व्यवहार
ऑनलाइन फिरू शकतो

नको वाटणार्‍या विलंबासह
होणारे खेटेही घटले जातील
अन् सरकारी कामं करण्यासाठी
ऑनलाइन ऑफिस थाटले जातील

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०१५

तडका - वास्तव

वास्तव

कुठलीही येजना असुद्या
घोटाळ्याविना ठेवत नाहीत
गुन्ह्याने हात माखले तरी
आरोप अंगी लावत नाहीत

भांडाफोड होताच मग
शिकारी हीच सावज असते
बोट वाकडे केल्यावरती
लोणी सुध्दा सहज फसते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - चौकशीचं घोडं

चौकशीचं घोडं

इकडून तिकडं फिरतंय
तिकडून इकडं फिरतंय
कित्तेकांचा तर दावा आहे
तिथे पाणी नक्कीच मुरतंय

आरोप आहेत, पुरावे आहेत
अजुनही का थांबतंय थोडं,.?
कळतंय तरी पण वळत नाही
चौकशीचं का अाडतंय घोडं,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - मेळावे

मेळावे

नव-नव्या विचारांनुसार
नवे-नवे खेळ असतात
वेग-वेगळ्या मुहूर्तावर
नवे-नवे मेळ असतात

नव-नवे मेळ घालण्यासाठीही
नव-नवे खेळ खेळावे लागतात
शक्ती-भक्ती तपासण्यासाठी
कधी मेळावे घोळावे लागतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०१५

तडका - किंमत

किंमत

यश प्राप्ती करण्यासाठी
ते सर्वमान्य लुटता आलं
पण ज्याला सोनं म्हटलं
तेच आज आपटा झालं

प्रत्येकाला संधी मिळणे ही
ज्या-त्या वेळची गंमत असते
ज्याची-त्याची,ज्याला-त्याला
त्या-त्या वेळीच किंमत असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - अविश्वासी खंजीर

अविश्वासी खंजीर

टोचणाराची कमी नाही
खेचणारांची कमी नाही
असे कोण असेल सांगा
ज्याला खुम-खुमी नाही

याची-त्याची जीरवण्याला
जो-तो म्हणे खंबीर असतो
मात्र सर्वात धक्कादायक
अविश्वासी खंजीर असतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - चौकशी

चौकशी

विहिरी पासुन शेतापर्यंत
योजना सुध्दा झिरपतात
लाट आली तरी देखील
टिपके-टिपके टिपकतात

नक्की पाणी कुठं मुरतं,.?
कळून देखील दिसत नाही
जिथं मुरतं पाणी तिथे
चौकशी आत घूसत नाही

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

बुधवार, २१ ऑक्टोबर, २०१५

दसरा

दसरा

मनसोक्तपणे वाटतात सोनं
चेहरा ठेऊन सदैव हासरा
देऊन-घेऊन प्रेम-आनंद
असा साजरा होतो हा दसरा

आपटा आणि सौंदडीची
मग करण्यासाठी लूट
आनंदाची उधळण करत
सारे येतात होऊनी एकजूट

सोनं-चांदीची करूनी लूट
यशाची होते ती सुरूवात
लहाणांना मिळते प्रेरणा
मोठ्यांचे मिळतात आशिर्वाद

ते झेंडू तोरण दारावरचे
आनंदाने हसत डूलते
प्रसन्न ठेवते घरा-घराला
पाहून त्याला मन हे खुलते

विसरूनी द्वेश मना-मनातील
मनी आपुलकी पेरली जाते
गुण्या-गोविंदाने नांदत राहू
हिच पर्वनी ठरली जाते

वाटत राहू असाच आनंद
आपुलकीचा न सोडता पिच्छा
आनंददायी दसरा दिनाच्या
मंगल-मंगल-मंगल शुभेच्छा

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

तडका - दसरा शुभेच्छा

दसरा शुभेच्छा

झाली असेल चुक तरी
या निमित्ताने ती विसरा
वाटून प्रेम एकमेकांस
साजरा करू हा दसरा

देऊ-घेऊ सोनं-चांदी
आज एकमेकांस स्वेच्छा
सदैव मिळावं यश उदंड
दसर्‍याच्या याच शुभेच्छा

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - पोस्टरवाली बात

पोस्टरवाली बात

लोक पहायला आहेत म्हणून
लावायलाही बरे वाटते
पुराव्यानिशी असेल तर
पाहणारालाही खरे वाटते

वादंगी वनवा भडकवणारी
कधी ती छोटी वात असते
कधी पटणारी,कधी खटकणारी
पोस्टरवाली बात असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

मंगळवार, २० ऑक्टोबर, २०१५

तडका - जल वॉर

जल वॉर

इकडचं तिकडं जायला हवं
तिकडचं इकडं यायला हवं
गरज भासेल तेव्हा-तेव्हा
पाण्याचं स्थलांतर व्हायला हवं

माणसांशी वागताना हल्ली
माणूसपणही सोडलं जातंय
प्रांतीय सीमांच्या आकुंचनात
पाणी सुध्दा आडलं जातंय

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - अच्छे दिनची चुणूक

अच्छे दिनची चुणूक

खाणं महाग झालंय इथे
जीणं महाग झालं आहे
अच्छे दिनचं वारं सांगा
कुण्या दौर्‍यात गेलं आहे

वेग-वेगळे स्वप्न दाखवून
जनता इथली ठकवली आहे
अच्छे दिन ची चुणूक मात्र
तुर डाळीने दाखवली आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - भाव वाढीत

भाव वाढीत

का असं करतात लोक
ते अजुनही गुप्त आहे
जे काही खपत आहे
ते सुध्दा लपत आहे

ज्याचा तुटवडा भासेल
त्याचे भाव भडकतात
प्रत्येक वाढत्या भावामध्ये
सामान्य लोक अडकतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

सोमवार, १९ ऑक्टोबर, २०१५

तडका - जेवन ऑनलाइन

जेवन ऑनलाइन

कुणी काय खाल्लं आहे
कोण काय खातो आहे
खाण्या-पिण्याचा विषय
ऑनलाइनही होतो आहे

जेवन शेअर करण्यासाठीचा
रोजचा नित्यक्रम टळत नाही
फोटो अपलोड केल्याशिवाय
कुणाला घासंच गिळत नाही

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

रविवार, १८ ऑक्टोबर, २०१५

तडका - पैसा

पैसा

पैशासाठी जगतात लोक
पैशासाठी मरतात लोक
पैशांसाठी तर कधी-कधी
माणसांनाही मारतात लोक

पैसे मिळवण्या माणसांमध्ये
नको ती हिंमत आली आहे
माणसं झालेत कवडीमोल
पैशाला किंमत आली आहे,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - गंध

गंध

त्रासवलं तर त्रासतात लोक
अंधश्रध्देनं ग्रासतात लोक
त्यांना हे पक्क ठाऊक आहे
फसवलं तर फसतात लोक

हल्ली म्हणूनच तर समाजात
लोक अंधश्रध्देत अंध आहेत
पण फसणार्‍यांच्या पार्श्वभुमीवर
लागलेले श्रध्देचेही गंध आहेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०१५

तडका - धिंगाणा

धिंगाणा

कुणी म्हणतात मिटेल
कुणी म्हणतात पेटेल
कुणी म्हणतात टिकेल
कुणी म्हणतात तुटेल

वेग-वेगळ्या दृष्टीमधून
वेग-वेगळा निशाणा आहे
बाहेरच्यांसह आतल्यांचाही
वेग-वेगळा धिंगाणा आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - पाणी

पाणी

पाणी जीवन घडवू शकतं
पाणी जीवन बुडवू शकतं
महत्व जाणून घ्यावं याचं
पाणी सुखही आडवू शकतं

काटकसरीने वापरा पाणी
विनाकारण ते ऊडवू नये
एकमेकांना द्यावं पाणी
पाणी कधीही अडवू नये

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०१५

तडका - दुष्काळात

दूष्काळात

कुणी ओरडून सांगितले
कुणी रडू-रडू सांगितले
टिका करत सांगितले कुणी
पाया पडू-पडू सांगितले

विलंब केला नसता इतका
दुष्काळ जाहिर करण्यासाठी
तर नसती आली आपत्तीही
त्या शेतकर्‍यांना मरण्यासाठी

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - वास्तव

वास्तव

जवळच्याला महत्व कमी
दुरला महत्व जास्त असतं
जवळचं सारं महाग जणू
दुर-दुरचं स्वस्त दिसतं

जवळचे दुर गेल्यावरती
खरा अनुभव आला जातो
अन् बैल गेल्यावरती मात्र
झोपा भक्कम केला जातो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०१५

तडका - बार वाला डान्स

बार वाला डान्स

छम्मक छम्-छम् वाजेल पुन्हा
लोकही तिकडे वाहिले जातील
छम्मक-छम्मक पाहण्यासाठी
लोक थंगारीवर राहिले जातील

आशावादी मनंच्या-मनं येऊन
रसिकांचा थवा बसला जाईल
अन् बार वाला डान्स पुन्हा
नव्या-नव्यानं नाचला जाईल

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - तह सत्तेसाठीचा

तह सत्तेसाठीचा

मनी आपुलकी नसेल तर
मन मनाला टोचू शकतं
मित्राने दगा दिला तर
मित्रत्वही खचु शकतं

बेगडी मैत्री असेल तर
मैत्रीत प्रेम भरत नाही
सत्तेसाठीचा तह म्हणजे
अतुट मैत्री ठरत नाही,..!

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

बुधवार, १४ ऑक्टोबर, २०१५

तडका - वाचन

वाचन

नुसतेच वाचन नको आहे
वाचन पचनी पडले पाहिजे
केल्या वाचनाने जीवनही
वचनबध्द घडले पाहिजे

डोक्या-डोक्यात मनापासुन
सदविचारांची भरणा व्हावी
अन् न वाचणारांनी कसोसीने
वाचण्यासाठी प्रेरणा घ्यावी

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - सामाजिक वातावरण

सामाजिक वातावरण

कधी गरम केलं जातं
कधी गार केलं जातं
सामाजिक वातावरण
असंच पार केलं जातं

असे बदल करण्यासाठी
विशिष्ट वर्ग ठप्प असतो
सारं गुपित कळून देखील
समाज मात्र गप्प असतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०१५

तडका - समाजात

समाजात

कारभारी होऊन चालत नाही
कारभार तसा करावा लागतो
खुर्चीत बसुनंच जमत नाही
समाज सुध्दा सावरावा लागतो

नाहीतर आपले समजलेलेही
दुसरे मार्ग चापसु लागतात
अन् सुखातले वाटेकरी देखील
पाठीत खंजीर खुपसु लागतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका- आपलं

आपलं

आपला तो बाबू आणि
दुसर्‍याचं ते कारटं असतं
कित्तेक मना-मनामध्ये
हे ठरलेलं पार्ट असतं

आपल्याचे आपलेपणही
आपुलकीने ओढले जातात
अन् आपल्याचे दोषही कधी
गुणामध्ये मोडले जातात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, १२ ऑक्टोबर, २०१५

तडका - योजना कागदोपत्री

योजना कागदोपत्री

ज्यांनी करायला हवे होते
ते कर्तव्य विसरले जणू
इतके कसे मूर्दाड झाले
अहंकारात घसरले जणू

ज्यांच्यावरती दुष्काळ आहे
ते अजुनही गांजत आहेत
दुष्काळ्यांच्या योजना मात्र
कागदोपत्रीच नांदत आहेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - शाई

शाई

जशी प्रतिमा चढू शकते
तशी खालीही पडू शकते
एकाच शाईच्या वापरातुन
वेग-वेगळी कृती घडू शकते

दर्जा ऊंचावत शाईची
कधी शाही टेक असते
तर कधी निषेधासाठी
मुद्दाम शाई फेक असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, ११ ऑक्टोबर, २०१५

तडका - डाव

डाव

कोण जवळ आहेत याची
सतत चाचपणी केली जाते
जवळच्यांना जवळ ठेवण्या
आमिशी चुणूक दिली जाते

जवळचा दूर जाता मात्र
त्यावरही खडा घाव असतो
प्रत्येक राजकीय खेळामध्ये
हा ठरेल-पुरेल डाव असतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, १० ऑक्टोबर, २०१५

तडका - पोपट

पोपट

बोलके पोपट चतुर
बोलण्यासाठी आतुर
बोलता बोलता मात्र
बोलते पोपट फितुर

आश्वासनीय गोष्टही
जणू केवळ डमी आहे
बोलणारे खुप झालेत
करणारांची कमी आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०१५

तडका - दोष

दोष

दुसर्‍यांना नावं ठेऊन-ठेऊन
प्रसिध्दीच्या भाजतात पोळ्या
ते ही इथे एकटे नाहीत
आता त्यांच्याही आहेत टोळ्या

"जसे बोलावे तसेच चालावे"
या नीतीला जोपासले जावे
दुसर्‍यांना दोष देण्या आधी
स्वत:चे दोष तपासले जावे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३