हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ३१ ऑगस्ट, २०१८

तडका - सत्र अंधश्रध्देचे

सत्र अंधश्रध्देचे

फसणारे आहेत म्हणून
इथे फसवणारेही आहेत
अंधश्रध्देचं खुळ मनी
बघा ढसवणारेही आहेत

ज्यांचे जितके गंदे डोके
तितके त्यांना घुलवले जाते
कधी भीती कधी लालचाने
अंधश्रध्देचे सत्र चालवले जाते

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१८

तडका - चुका

चुका

चुक होत नाही
असे कुणी नाही
त्याचीही चुक होते
ज्याचे मनी नाही

सुधरण्याची संधीही
याच चुका असतात
तर  कधी याच चुका
जबरी ठोका असतात

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१८

तडका - फेकी ड्रॉ

फेकी ड्रॉ

लक म्हणजे काय
जाणून घ्यावं वाटतं
आपलं लक किती
ते ही पहावं वाटतं

म्हणूनच हे लकी ड्रॉ
उदयास आले आहेत
पण कित्तेक लकी ड्रॉ
फेकी ड्रॉ झाले आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, २७ ऑगस्ट, २०१८

तडका - सरकार

सरकार

लोकांच्या मनी सदैव
आदराने राहिले जावे
सरकारकडे जनतेने
आपुलकीने पाहिले जावे

त्यासाठी सरकार मार्फत
जनतेचे हित हेरले जावे
सरकार एक विकास सेतु
जनतेसाठी ठरले जावे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१८

तडका - प्रसिध्दी फॅड

प्रसिध्दी फॅड

प्रसिध्दी साठी नव-नवे प्रयोग
लोक ऊत्साहाने करू लागले
हल्ली दु:खद क्षण देखील
प्रसिध्दीचे मोके ठरू लागले

अंत्यविधीचे फोटो सेशनही
वाढत आलेला कवडसा आहे
कोण कशाची संधी करेल
याचा ना काही भरवसा आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१८

तडका - नैसर्गिक माणूसकी

नैसर्गिक माणूसकी

निसर्ग देखील कोपतो हल्ली
कारण माणूस त्याला कापतोय
जणू नैसर्गिकताच विसरलाय
म्हणून निसर्गही असा झापतोय

या नैसर्गीक आपत्ती ऊत्सर्जनाने
परिस्थिती ओक्साबोक्शी आहे
पण आपत्तीग्रस्तांना मदत करा
हिच नैसर्गिक माणूसकी आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, २२ ऑगस्ट, २०१८

तडका - सत्ता आणि संपत्ती

सत्ता आणि संपत्ती

सत्ता आणि संपत्तीला
लोक चिपकले जातात
सत्तेसाठी लाचार होऊन
स्वार्थासाठी टपकले जातात

सत्ता आणि संपत्तीचे
नको तितके वेडे आहेत
लाचार झाले भलते अन्
स्वाभिमानी थोडे आहेत,.!

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८

हे देशबंधूंनो

कविता :- हे देशबंधूंनो
कवी :- विशाल मस्के,सौताडा.
           ता. पाटोदा, जि.बीड
           मो. 9730573783

लिंक :- https://youtu.be/-3eoJO3Hag8

सोमवार, १३ ऑगस्ट, २०१८

तडका - भारत देश

भारत देश

अभिमान-स्वाभिमान
आणि वाटु लागतो गर्व
तिरंग्याखाली एक होता
आम्ही भारतीय सर्व

हाच आमचा आदर्श
जगानेही हेरला आहे
यशस्वी लोकशाही राष्ट्र
भारत देश ठरला आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१८

तडका - घरचा दहशतवाद

घरचा दहशतवाद

धर्माच्या नावावरती बघा
इथे विपरीत केले जाते
दहशतवादींना बळही
समाजातुन दिले जाते

दहशतवादींना देतो थारा
इतका समाज बाद आहे
देशालाही घातक असा
हा घरचा दहशतवाद आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - एक क्रांती बाकी आहे

एक क्रांती बाकी आहे

शांततेचे गोडवे सतत
नावालाच गायले जातात
दहशतवादी कृत्य मात्र
अबाधित राहिले जातात

जाती-धर्मावर भांडतात लोक
कोण म्हणतो की एकी आहे
सामाजिक शांतीची क्रांती
बघा अजुनही बाकी आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, ५ ऑगस्ट, २०१८

तडका - मैत्री


मैत्री

रक्ताचं नातं नसलं तरी
मनामध्ये जपलेलं असतं
आपल्या सुख-दु:खांना
मैत्रीणेच टिपलेलं असतं

म्हणूनच मैत्रीच्या विषयानं
मन अगदी ऊत्साही होतं
सर्वात जवळचं नातं म्हणून
सदैवच जाहीर ग्वाही देतं

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१८

तडका - एक एल्गार

एक एल्गार

रोज-रोज बसुन घारत
बाहेरचं पाहू लागलोत
अन् न्युज चॅनल वरती
विसंबुन राहू लागलोत

कधी काय दाखवायचं
कुणी स्वत: ठरवू लागले
त्यांच्या विचारांचा पगडा
समाजावर फिरवू लागले

काय पेटवायचं, काय विझवायचं
हा त्यांच्या हातचाच खेळ आहे
म्हणूनच सामाजिक तेजासाठी
कदाचित इथे अजुनही वेळ आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३