हा ब्लॉग शोधा

रविवार, ३१ मे, २०१५

तडका - जनतेचा प्रश्न

जनतेचा प्रश्न

जनतेनं मागण्या करताच
त्यांच्या नीयतीत खोट येतो
अन् जनतेचा लोट येताच
त्यांचा गौप्यस्फोट होतो

जनतेचे प्रश्न बाजुला अन्
गौप्यस्फोट मात्र रंगला जातो
अन् जनतेचा प्रश्न इथे सदैव
जसाच्या तसा टांगला जातो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - मोठेपणाचे सत्य

मोठेपणाचे सत्य

मला मोठं म्हणा म्हणून
कुणी मोठं म्हणत नसतं
कुणी मोठं म्हटल्यानंही
कुणी मोठं होत नसतं

मोठं व्हायचं असेल तर
कर्तृत्व मोठं करावं लागतं
अन् आपण केलेलं कर्तृत्व
इतरांनीही स्मरावं लागतं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - गडगडणारे ढग हजारो

गडगडणारे ढग हजारो

दुष्काळलेल्या धरणीस या
नभ पाणी आज पाजेल काय,.?
आस लागली हो मना-मनाला
जो गरजतोय तो बरसेल काय,..?

दुष्काळ पडला निसर्गात या
पाण्यासाठी खुमखुमी आहे
जरी गडगडणारे ढग हजारो
पण पडणाराची कमी आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

शनिवार, ३० मे, २०१५

तडका - अच्छे दिन जबरदस्ती

अच्छे दिन जबरदस्ती

जनता म्हणते नाही आले
सरकार म्हणतंय आले आहेत
इथले बुरे दिन जाऊन म्हणे
आता अच्छे दिन आले आहेत

अच्छेदिन लादण्याचा प्रयत्न
कुणी जबरदस्तीनं करतो आहे.?
मात्र बुरे दिन जगता-जगता
इथला दीन "दीन" होतो आहे,.!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - जबाबदार माणसांनो

जबाबदार माणसांनो

जबाबदारां कडूनही कुठं
इमानदारीच उधार आहे
गुन्हेगारी रोधक दलाचा
गुन्हेगारीलाच आधार आहे,.?

वेळीच वाढती गुन्हेगारी
जाणीवपुर्वक गाडायला हवी
जबाबदारांनीही जबाबदारी
इमानदारीनं पार पाडायला हवी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

शुक्रवार, २९ मे, २०१५

तडका - सोशियल मिडीया वापरताना

सोशियल मिडीया वापरताना

आपली अस्मीता टिकवताना
इतरांची अस्मीता जपली जावी
सोशियल मिडीया वापरताना
माणूसकी ना खपली जावी

नैतिकतेच्या हद्दी पलिकडे
एकमेकांत ना घर्षण असावं
सोशियल मिडीयात वावरताना
सोसेल असंच वर्तन असावं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - शिक्षण ऑनलाइन

शिक्षण ऑनलाइन

नव-नविन शिकण्यासाठी
आता ऑनलाइन दुवे आहेत
शिकण्यासाठी खुप आहे
मात्र शिकणारे हवे आहेत

वेग-वेगळ्या ऑप्शनसह
वेग-वेगळे फिचर आहेत
नव-नविन शिकवायला
ऑनलाइन टिचर आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

गुरुवार, २८ मे, २०१५

तडका - हे सत्य आहे

हे सत्य आहे

निसर्गात दुष्काळ पडलाय
अंगाला मात्र पाझर आहे
कुलर आणि पंख्यालाही
लोडशेडींगचं गाजर आहे

उन्हाचा सामना करायला
जरी तटस्थ ए.सी. आहेत
पण या नैसर्गिक आपत्तीचे
मानवच तर दोषी आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - निधी "खास"दारी

निधी "खास"दारी,...

आज वर्षही सरून गेलं
वाट अजुन पाहतो आहोत
"अच्छे दिनच्या" प्रतिक्षेत
"बुरे दिन" वाहतो आहोत

मनासारखा विकास मात्र
अजुनही ना घडला आहे
"खासदारीचा" निधी कुठे
"खास" दारीच पडला आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - का माणसा,...?

का माणसा,...?

गरम गरम या उन्हामुळे
जमीन होरपळते आहे
ज्याला उन पोळते आहे
त्याला उन कळते आहे

मात्र उन्हात गेल्या शिवाय
सावलीचं महत्व कळत नाही
अन् तरीही झाडे लावण्यासाठी
माणुस का तळमळत नाही,.?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

बुधवार, २७ मे, २०१५

तडका - कर्माची पावती

कर्माची पावती

हाती आलेल्या निकालाने
कुणी सुखावणारे असतात
तर निकालाला पाहून मात्र
कुणी दुखावणारे असतात

अशी निकालाची घूसमट मनात
सुख-दु:खाच्या अवती-भवती असते
पण हाती आलेला निकाल मात्र
आपल्या कर्माचीच पावती असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - अपयशस्वी मित्रांनो

अपयशस्वी मित्रांनो

धावणारे तर सगळेच असतात
जिंकणारे मात्र सगळे नसतात
पण न जिंकणारे माणसंही
कर्तबगार वेग-वेगळे असतात

आप-आपल्या आवडीनुसार
आपले कार्यक्षेत्र टिकले पाहिजे
कधी खड्डयामध्ये पडलं तरीही
उठून पळायला शिकले पीहिजे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

मंगळवार, २६ मे, २०१५

तडका - रिझल्ट ऑनलाइन

रिझल्ट ऑनलाइन

निकालाची तारीख जवळ येता
मनातील उत्सुकता वाढत असते
पण उत्सुकलेल्या मनातही मात्र
निकालाची आशा धडधड असते

होणार्या अत्यल्प विलंबालाही
मन कदापीही राजी नसते
म्हणूनच मोबाईल अन् कँफेवरील
निकालाची वेबसाइट बीझी असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - निकालाचे सत्य

निकालाचे सत्य

आता उत्सुकता वाढू लागली
कोण पास-कोण फेल आहे,.?
परिक्षा झाली,प्रतिक्षा संपली
आता निकालाची वेळ आहे

टक्केवारीत मागे-पुढे करत मन
आकड्यांचा कल्पतरू असते
अन् निकाल हाती येण्याआधीच
काळजात घालमेल सुरू असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

सोमवार, २५ मे, २०१५

तडका - सवयीचे सत्य

सवयीचे सत्य

जशा सवयी लावाव्यात
तशा सवयी लागल्या जातात
जस-जशी वेळ येईल तशा
या सवयी जागल्या जातात

सवयीचे गुलाम बणून
कित्तेक लोक हूकून घेतात
अन् चहा पोळलेले माणसं
सरबत सुध्दा फूकुन पेतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - वर्षपुर्तीचे सत्य

वर्षपुर्तीचे सत्य

आम्ही फक्त वास्तव मांडतो
ना गुणगौरव ना हेवा आहे
त्यांच्या वर्षपुर्तीचा आता
त्यांच्याकडूनच गव-गवा आहे

हा जनतेचाच कौल आहे
उगीच आरोप फासत नाही
अच्छे दिनच्या चौकटीत मात्र
जनता मुळीच दिसत नाही

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

रविवार, २४ मे, २०१५

तडका - नैसर्गिक सत्य

नैसर्गिक सत्य

वाढती पाणी टंचाई
त्यातच उन्हाचा कहर
दिवसें-दिवस वाढतेय
इथे प्रदुषणाचे जहर

वेळीच आळा बसवावा
समस्यांच्या या संसर्गाला
चांगल्या निसर्ग सेवेसाठी
जपावं लागेल निसर्गाला

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - जनता

जनता

त्यांना काढून यांना बसवले
फरक मात्र पडला नाही
जनतेच्या वाढत्या समस्यांचा
अजुनही पुर दडला नाही

जगण्याच्या संघर्षाचे दु:ख
जनता सदैव संचित आहे
कालही जनता वंचित होती
आजही जनता वंचित आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

शनिवार, २३ मे, २०१५

तडका - रविवार

रविवार

आठवडाभर कित्तेकांचे
रविवारवर लक्ष असते
होऊन गेलेला रविवार
येणार्याची साक्ष असते

कुणासाठी हौस असतो
कुणासाठी नवस असतो
वेग-वेगळ्या अपेक्षांचा
रविवारचा दिवस असतो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - एक साल बाद

एक साल बाद

जेवढे गव-गवा करणारे होते
तेवढेच द्वेश करणारेही आहेत
कुणी स्तुती करणारे आहेत तर
कुणी टोमणे मारणारेही आहेत

कुठे अच्छे दिनचा खेद आहे
कुणाकडून मात्र दाद आहे
कमवलेल्या अन् गमावल्याचा
हिसाब"एक साल बाद"आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

शुक्रवार, २२ मे, २०१५

तडका - टोल-घोळ

टोल-घोळ

जे कठोर भासत होते
त्यांचं मनही पाघळलंय
टळा-टळा बोलणारांचही
टोल-धोरण बदललंय

जणू एकापेक्षा एक इथे
भंपकपणाचे चेले आहेत
ज्यांनी विरोध ठाकले होते
तेच समर्थक झाले आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

गुरुवार, २१ मे, २०१५

तडका - भाव

भाव

कधी चढणारे असतात
कधी घसरणारे असतात
कधी आकडणारे असतात
कधी पसरणारे असतात

भाव-घटी अन् भाव-वाढीचे
वेग-वेगळे कारणं असतात
विकल्या जाणार्या गोष्टींचे
भाव बदलु धोरणं असतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - अनोळखींची ओळख

अनोळखींची ओळख

अनोळखी असणारे अनोळखी
अनोळखी ना वाटत असतात
अनोळखी असणारे माणसंही
मनी आपुलकीनं दाटत असतात

मात्र अनोळखीच्या ओळखीची
आस होणार्या भेटीत असते
अन् अनोळखींची ओळख मात्र
सदा आनंदाच्या मिठीत असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

बुधवार, २० मे, २०१५

तडका - खोचक टोलेबाजी

खोचक टोलेबाजी

वेग-वेगळ्या मुद्दयांवरती
टोमन्यामागून टोमना आहे
वाढत्या नाराजी द्वेशांचा
सामनामधून सामना आहे

कधी टिका,कधी आरोप
कधी प्रखर नाराजी आहे
वाढत्या अंतर्गत मतभेदांची
खोचक टोलेबाजी आहे,..!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - उन्हाची गुर्मी

उन्हाची गुर्मी

नैसर्गिकता बदलु लागली
वातावरणातच घोळ आहे
सहनशिलतेच्या अंतापर्यंत
उन्हाची चढती मजल आहे

तापमापीतील पार्याचीही
आता कांडी चढली आहे
अन् गर्मठ-गर्मठ उन्हाची
जणू गुर्मी वाढली आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

मंगळवार, १९ मे, २०१५

तडका - वेळ

वेळ

चांगल्या दिवसांच्या प्रतिक्षेत
वाईट दिवस जगावे लागतात
आपण केलेल्या कर्माची फळे
आपल्यालाच भोगावे लागतात

आपली प्रतिमा आपल्याकडूनच
कधी-कधी डागली जाऊ शकते
अन् अच्छे दिन वरही बुरे दिनची
कधी नकळत वेळ येऊ शकते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - मराठी पदार्थ

मराठी पदार्थ

हॉटेल मधील पदार्थांत
मराठी मुद्दा फिरतो आहे
मराठी पदार्थाचा आग्रह
आता जोर धरतो आहे

हॉटेल मधील पदार्थांमध्ये
मराठी झलक दिसली पाहिजे
आपली संस्कृती आपणच
आपणहून जपली पाहिजे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

सोमवार, १८ मे, २०१५

तडका - अपघात मालिका

अपघात मालिका

रोडवरून जाताना इथे
प्रत्येकालाच ओढ असते
तर कुणा-कुणाची हौसेपायी
रस्त्यावरून दौड असते

रस्त्यावरून जाताना इतरांना
वेगाच्यापुढे नमवावे वाटतात
मात्र कित्तेकांना रस्त्यावरती
आपले प्राणही गमवावे लागतात

कुणी मद्यामुळे मरतात तर
कुणी-कुणी खड्यामुळे मरतात
अपघातांच्या या मालिकेमध्ये
लोक मिनिटा-मिनिटाला मरतात

घडणार्या रोजच्या अपघातांमधली
आता दोषांची उकळी टाळायला हवी
रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी
प्रत्येकाने जागरूकता पाळायला हवी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - व्यथा संघर्षाची

व्यथा संघर्षाची

जगण्यासाठी संघर्ष आहे
वागण्यासाठी संघर्ष आहे
जगता-वागताना संघर्षात
मरण्यासाठीही संघर्ष आहे

संघर्ष करावा लागतो आहे
याची आम्हाला खंत नाही
पण संघर्षात अंत होतो
मात्र संघर्षाला अंत नाही,..!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

रविवार, १७ मे, २०१५

तडका - नराधमांच्या वैचारिकता

नराधमांच्या वैचारिकता

माणसांमधली नैतिकता
माणसांकडून दूर्लक्षित आहे
स्रीयांची सुरक्षितता इथे
अजुनही असुरक्षित आहे

स्रीयांवरील अत्याचारांचे
इथे वारंवार उद्रेक आहेत
वासनांध त्या नराधमांच्या
वैचारिकताच ब्रेक आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - उन्हाचा बोभाटा

उन्हाचा बोभाटा,...

उन्हामध्ये काम करणारांच्या
अंगातुन घामाच्या धारी असतात
मात्र उन्हामध्ये न जाणारांकडून
उन वाढीच्या तक्रारी असतात

जे काही पाहिलं तेच सांगतो
आम्ही उगीच बाता मारत नाहीत
काम करून घाम गाळणारे
घामाचा बोभाटा करत नाहीत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

शनिवार, १६ मे, २०१५

तडका - घोटाळेबाजांचे भांडवल

घोटाळेबाजांचे भांडवल

जनतेच्या नावानं असल्या तरी
लुबाडणारे मात्र तेच असतात
विकासाचं गाजर दाखवण्याचे
जणू त्यांचे ते डावपेच असतात

कित्तेक याोजनांत छुपी-उघड
घोटाळ्यांचीच दलदल असते
अन् प्रत्येक-प्रत्येक योजना ही
घोटाळेबाजांचे भांडवल असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - अच्छे दिन

अच्छे दिन

मनी धरलेल्या अपेक्षांचा
जणू हा अपेक्षाभंग आहे
दाखवलेल्या स्वप्नांचाही
आता बदलता रंग आहे

दाखवणारे दाखवुन गेले
पाहणारे मात्र फसले आहेत,.?
अन् जयजयकार करणारेही
अच्छे दिन ला त्रासले आहेत,.?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

शुक्रवार, १५ मे, २०१५

तडका - pm चे मोड

तडका - इंधन दरवाढ

इंधन दरवाढ,...

पेट्रोल आणि डिझेलच्या
दरवाढीला बंधन नाही
तळमळली जनता तरी
गडगडणारं इंधन नाही

भड-भड बोभाटा करणारी
पन्नास पैशांची सुट असते
मात्र त्याच्याच पार्श्वभुमीवर
कित्तेक पटींनी लुट असते,.!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - नेट चाट

"नेट चाट,... "( तडका -७७५ )
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
                 वात्रटिकाकार :- विशाल मस्के
                           मो. :- 9730573783

मना-मनातल्या भावनांना
शब्दांमध्ये ओतल्या जातात
सोशियल मिडीयातील गप्पा
मेसेज मध्ये नटल्या जातात

अशा ऑनलाईन गप्पांची
एक वेगळीच झलक असते
कित्तेक ऑनलाईन गप्पांत
अनोळखीच ओळख असते

अशा अनोळखी ओळखीचेही
हर्टलाईन कनेक्शन असतात
कुठे तिरस्कारित तर कुठे
प्रेमाचेही लक्षण असतात

कुणाशी चाटिंग करावी वाटते
कुणाशी चाटिंग नको वाटते
कुणाची चाटिंग रिअल असते
कुणाची चाटिंग फेको वाटते

कुणी-कुणी सिरिअस असतात
कुणी भलतेच जोकरे असतात
ऑनलाईन चाटिंग करतानाही
कुणा-कुणाचे नखरे असतात

चाटिंगने माणसं जोडता येतात
तसे ते तुटलेही जाऊ शकतात
वेग-वेगळ्या विचारांनुसार
चाटिंगचे वापर होऊ शकतात

कित्तेक ऑनलाईन गप्पांची
ऑनलाईनच डेटींग असते
कधी हवीशी कधी नकोशी
अशी ही नेट चाटींग असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

दि. १५/०५/२०१५

गुरुवार, १४ मे, २०१५

तडका - वाद

वाद,...

जुन्यासह नवे माणसंही
जोशामध्ये भिडले जातात
जुन्यासह नवे वादही
नव्या-नव्यानं लढले जातात

कुणी नैतिकतेनं लढतात तर
कुणाचे विचार हिनले जातात
मात्र वादांची इथे कमी नाही
ते घडवुन सुध्दा आणले जातात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - उशीराचे शहाणपण

उशीराचे शहाणपण

जिथे-जिथे नको आहे तिथे
नको तितके बहाणे असतात
गरज नसलेल्या ठिकाणी मात्र
सगळेचजण शहाणे असतात

आपल्या मनाचे शहाणपण तर
आपल्या मनाचाच तुरा असते
गरज असलेले शहाणपण मात्र
नेहमीचेच इथे उशीरा असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - "क"ची किंमत

"क"ची किंमत

कुणाला कमी समजत
आकलेचे तारे पिंजु नये
कुणाची किंमत कुणीही
कधीही कमी समजु नये

रोडवरती असणाराही कुणी
कधी-कधी करोडपती होतो
अन् किंमतीचा "क" गेला तर
करोडपतीचाही रोडपती होतो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

बुधवार, १३ मे, २०१५

तडका - नैसर्गिक विध्वंस

नैसर्गिक विध्वंस

नैसर्गिक आपत्तींची
नैसर्गीक पीडा आहे
नैसर्गिक नियमांना
नैसर्गिक तडा आहे

नैसर्गिक डाव-पेचांचा
नैसर्गिक कावा आहे
नैसर्गिक विध्वंसाचा
हा जाहिर पुरावा आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - हसण्याचे सत्य

हसण्याचे सत्य

प्रत्येकाच्याच जीवनामध्ये
अटळ स्थानावर हशा असतो
कुणी खद-खदा हसतो तर
कुणी-कुणी मुरमुशा हसतो

कित्तेकांनी हे मान्य केलं की
हसतील त्यांचे दात दिसतील
पण ज्यांना दातच नसतील
त्यांचे दात कसे दिसतील,...!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

मंगळवार, १२ मे, २०१५

तडका - टोमण्यांचा साक्षीदार

टोमण्यांचा साक्षीदार

बाहेरच्यांसह आतले सुध्दा
आता धारेवर धरू लागले
सरकारच्या विरोधात असे
उलट वारे फिरू लागले

सरकारवर निशाणा साधत
आता वारंवार टोमणा आहे
मारलेल्या कित्तेक टोमण्यांचा
साक्षीदार "सामना" आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - शाब्दिक आक्रमण

शाब्दिक आक्रमण

सरळ बोलता येईल तिथे
सरळ-सरळ वार आहेत
कुणावरती ना कुणावरती
रोज शाब्दिक प्रहार आहेत

सरळ बोलता नाही आल्यास
शालीतील जोड्यांचे वापर आहेत
शाब्दीक आक्रमण करण्यासाठी
इथे एकापेक्षा एक सुपर आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

सोमवार, ११ मे, २०१५

तडका - नातं जबाबदारीचं

नातं जबाबदारीचं

वाटलं नसेल त्यांनाही
कि बार चा असा बार होईल
आपण केल्या कर्मावरती
अशाप्रकारे प्रहार होईल

मात्र आपण काय करावं हे
प्रत्येकाला कळायला हवं
आपल्या जबाबदारीशी नातं
जबादारीनं पाळायला हवं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - जनतेच्या भावना

जनतेच्या भावना,...

विकासाची तळमळ सदा
जनतेच्या मनी घूटमळते
मात्र विकासाची दशा इथे
जणू सदैव खळखळते

जनतेच्या आशा-अपेक्षांना
जणू झोलाच दिला जातो
जनतेच्या भावनेचा सांगा
विचारच कुठे केला जातो,.?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३