हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २४ मे, २०१८

तडका - कर "नाटकी" शाळा

कर "नाटकी" शाळा

पेट्रोल आणि डिझेलही
जास्तच भाव घेऊ लागले
वाढीव भाव देता-देता
लोकही त्रस्त होऊ लागले

डोळेझाकपणे सांगेल कुणीही
हि विकासाची अवकळा आहे
सतत भाव वाढवणे म्हणजे
हि कर "नाटकी" शाळा आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, २२ मे, २०१८

तडका - मिडीयाचे सत्य

मिडीयाचे सत्य

काही यांचे आहेत तर
बघा काही त्यांचे आहेत
स्वार्थापोटी विकणारे असे
मिडीयातही चमचे आहेत

सरळ सत्य घटनेची देखील
कधी मोडतोड केली जाते
अशा विक्राळू लोकांमूळेच
मिडीयाची प्रतिमा खाली येते

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - आस्था व्यस्त

आस्था व्यस्त

पावसाळ्यात पाऊस
हिवाळ्यात हिव
ऊन्हाळ्यात ऊन जास्त आहे
पण निसर्गालाही दोष देणे
सांगा कितपत रास्त आहे

मानवी कृत्यांचेच परिणाम
मानव हल्ली भोगत आहे
आपला स्वार्थ साधताना
निसर्गालाही डागत आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३