हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ३० एप्रिल, २०१५

तडका - महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र माझा

घडले कित्तेक पराक्रम
या महाराष्ट्राच्या मातीमध्ये
किंचितही ना पडला मागे
जगाच्याही या गतीमध्ये

या महाराष्ट्रातल्या किर्तीचा
जगभरातही पडघम आहे
असाच होईल गौरव सदैव
अहो या मातीतच दम आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - संस्कृती

संस्कृती

वेग-वेगळ्या धर्मांचे इथे
वेग-वेगळे नियम आहेत
समतेपासुन अजुनही कुठे
माणसंच दुय्यम आहेत

स्वाभिमान बाळगता येईल
अशी आपली संस्कृती असावी
मात्र कुणाच्याही संस्कृतीमध्ये
कधीच विषमतेची विकृती नसावी

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

बुधवार, २९ एप्रिल, २०१५

तडका - सत्तेची वाटा-घाटी

सत्तेची वाटा-घाटी

सत्तेची साय चाटण्यासाठी
विरोधकासही लळा असतो
अन् महत्वाच्या पदांवरती
प्रत्येकाचाच डोळा असतो

महत्वाच्या पदांसाठी कधी
अंतर्गत आटा-आटी असते
तर कधी पदांच्या मलिद्यासाठी
इथे सत्तेचीही वाटा-घाटी असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

मंगळवार, २८ एप्रिल, २०१५

तडका - सत्य काय,...?

सत्य काय,...?

ज्यांच्याकडून भविष्य घडवायचे
त्यांचेच भविष्य घडवले जातात
आपले पदाधिकारी निवडताना
इथे अशिक्षितही निवडले जातात

आता उच्चशिक्षिता पेक्षाही इथे
आम्ही अशिक्षित सरस जाणावा,.!
की आपले भविष्य घडवतानाही हा
मतदारांचा आंधळेपणा म्हणावा,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - सत्यापनाची साक्ष

सत्यापनाची साक्ष

नवा होश,नवा जोश आणि
नव्या उमेदीचे वारे आहेत
एकामागुन एका ठिकाणी
राहूलजींचे दौरे आहेत

यामुळे कुणी आनंदी होईल
तर कुणी तोंडसुखही घेईल
अन् या गोष्टींच्या सत्यापनाला
साक्षीमहाराजही साक्ष देईल,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - प्रतिष्ठा

प्रतिष्ठा,...

प्रत्येकाच्या मनी स्वप्रतिष्ठा
इथे नेहमीच वरचड असते
आपली प्रतिष्ठा जपण्याची
प्रत्येकाचीच धडपड असते

मात्र आपली प्रतिष्ठा सदैव
प्रतिष्ठेनंच ठेवावी लागते
तर कधी प्रतिष्ठेसाठी प्रतिष्ठा
पणालाही लावावी लागते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

सोमवार, २७ एप्रिल, २०१५

तडका - आठवणींचे सत्य

आठवणींचे सत्य,...

कधी मनं खुलवणारे असतात
तर कधी हेलावणारे असतात
जिवनामधले कित्येक क्षण
आठवणींत सामावणारे असतात

आठवणींना उजाळा देत-देत
कधी-कधी मनं स्फूरले जातात
तर आठवणींच्या गाभार्‍यात
कधी मनं गहिवरले जातात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - मदतीचा हात,...

मदतीचा हात,...

माणसांमधली माणूसकी
माणसांनीच जपली जावी
आप-आपसातील आत्मीयता
आपुलकीने टिकली जावी

आलेल्या प्रत्येक संकटावर
सहकार्यानं मात पाहिजे
माणसांकडून माणसांसाठी
मदतीचा सदैव हात पाहिजे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

रविवार, २६ एप्रिल, २०१५

तडका - नुकसान भरपाई,...!

नुकसान भरपाई,..!

घडलेल्या या घटणेवरती
कुणी निसर्गावर रोष केला
तर जबाबदारी स्वीकारत
कुणी स्वत:लाही दोष दिला

मात्र मानवता जोपासत मदतीला
माणूस इथला थकणार नाही
पण झाल्या नुकसानाची भरपाई
कदापीही होऊ शकणार नाही,.!

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - ऐक निसर्गा,...

ऐक निसर्गा,...

हे आम्हाला मान्य आहे की
तु नैसर्गिक संपत्ती दिलीस
पण तुलाही मान्य करावं लागेल
की तुही नैसर्गिक आपत्ती दिलीस

मानवी कुकर्माचा सूड म्हणून
जरी तु नैसर्गिक प्रहार आहेस
पण झालेल्या या विध्वंसाचा
तु ही तितकाच गुन्हेगार आहेस

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शनिवार, २५ एप्रिल, २०१५

तडका - नैसर्गिक हाहा:कार

नैसर्गिक हाहा:कार

कधी अवकाळ छळतोय
कधी दूष्काळ जाळतोय
कधी भुकंपाचा धक्का
काळजालाच पोळतोय

यात माणसांच्या बळींसह
कुठे निसर्ग सुध्दा ठार आहे
अन् अभुतपुर्व आपत्तीचा
हा नैसर्गिक हाहा:कार आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - हे निसर्गा,...

हे निसर्गा,...

तुझ्या सौंदर्याचे गाणेही
आम्ही इथे गायली आहेत
तुझी उग्रवादी रूपे ही
सदैव आम्ही पाहिली आहेत

हे निसर्गा सांग असा का
आम्हावरती कोपतो आहेस
कोपता-कोपता आमच्यावर
का स्वत:लाही कापतो आहेस,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शुक्रवार, २४ एप्रिल, २०१५

तडका - महत्वाचे पदं

महत्वाचे पदं

ज्याच्याशी मैत्री केली
तो ही कात्रीत बघू शकतो
जवळचा समजला मित्रही
स्वार्थ पाहून वागू शकतो

राजकीय मैत्रीतही कधी
याच सुत्राने वादं असतात
अन् आकड्यांच्या लफड्यांत
सदा महत्वाचे पदं असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - पोलिस

पोलिस

जनतेच्या रक्षकांकडून
जनतेवरच वार आहेत
ज्यांचा आधार घ्यायचा
तेच कुठे गद्दार आहेत

पोलिस जरी असले तरी
गतानुगतिक वेश असावा
अन् कार्य असं करावं की
जनतेच्या मनी द्वेश नसावा

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

गुरुवार, २३ एप्रिल, २०१५

तडका - मृत्युचे राजकारण

मृत्युचे राजकारण

आपल्या जबाबदार्‍या नेहमीच
प्रत्येकाकडून झटकल्या जातात
मात्र आरोप-प्रत्यारोप करताना
कित्तेकांच्या सटकल्या जातात

सवयी प्रमाने विरोधकांच्या
दोषांचे डफडे बडवले जाते
अन् कुणाच्या मृत्युवरतीही
इथे राजकारण घडवले जाते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - निकालाचे वास्तव

निकालाचे वास्तव

निवडणूकांच्या निकालांचे
कुणाच्या मनी बिचुक असतात
तर अंदाजे लावलेले अंदाजही
कधी-कधी अचुक असतात

मात्र जय आणि पराजयानेच
प्रत्येक निवडणूक घेरलेली असते
अन् कुणाच्यातरी जिंकण्यामागे
कुणाची हार ठरलेली असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

बुधवार, २२ एप्रिल, २०१५

तडका - इंटरनेट स्वातंत्र्य,...?

इंटरनेट स्वातंत्र्य,...?

नेटच्या वाढत्या वापरावरती
कुणी व्हायरस सोडू पाहतात
वेग-वेगळ्या नेट वापरासाठी
वेग-वेगळा चार्ज जोडू पाहतात

असा टेलिकॉम कंपण्यांकडून
हा उतावळा पणा झाला आहे
नेटीझन्सच्या स्वातंत्र्यावरतीच
कंपन्यांकडून हा घाला आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - अंदाज अंदाजपंचे

अंदाज अंदाजपंचे

निवडणूकांच्या निकालाचे
कित्तेकांना वेध असतात
अन प्रत्येक निकालातुन
प्रत्येकाला बोध असतात

डळमळणार्‍या मनांसाठी
सांत्वन फक्त मनचे असतात
जाहीर होणार्‍या निकालांचे
अंदाज अंदाजपंचे असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

होय,मी शेतकरीच बोलतो आहे,...

मी शेतकरीच बोलतो आहे,...

तुम्हा सर्वांना आपुलकीनं सांगतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,...||धृ||
आजवर खुप भोगलं आहे
अजुनही खुप भोगतो आहे
जीवनावरती कर्ज काढून
जीवन आज जगतो आहे
आजही जगण्यासाठी धडपडतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,...||१||
दूष्काळानं होरपळलं आहे
अवकाळही छळतो आहे
आता निसर्गही आमच्या
जगण्याशीच खेळतो आहे
तरीही जगण्याला उमेदीनं पेलतो आहे
होय, मी शेतकरीच बोलतो आहे,...||२||
दुष्काळात अन् अवकाळात
कित्तेकजण दौरे करून गेले
कुणी सांत्वन करून गेले तर
कुणी-कुणी फक्त फिरून गेले
कुणी अजुनही कागदोपत्री फिरतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,... ||३||
शेतकर्‍यांच्या आत्महत्तेचे
इथे अभुतपुर्व तांडव होते
ते दूसरे-तिसरे कुणी नाही
तुमचे-आमचेच बांधव होते
त्यांच्यासाठी आजही जीव तळमळतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,... ||४||
मात्र शेतकर्‍याच्या मदतीचे
आजही प्रश्न प्रलंबित आहेत
अन् सरकारी धोरणांमुळे
भावनाच आचंबित आहेत
मात्र मदतीसाठी,शेतकरी ना मरतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,... ||५||
आत्महत्त्याग्रस्तांच्या आकड्यांतही
इथे भ्रष्टाचार घडतो आहे
अन् मृत्युच्या कारणांच्या
लिखावटीचा प्रश्न पडतो आहे
मृत्युच्या कारणांचे कुणी लेखी पुरावे मागतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,... ||६||
तुम्हाला काय सांगु आमचे
जगणे कीती जर्जर आहेत
कसे लिहीणार मृत्युची कारणे
आम्ही आजही निरक्षर आहेत
कुणी गजेंद्रसिंह कारणे लिहून मरतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,... ||७||
पण आता मृत्युचे कारणे
आम्ही लिहून ठेवणार नाहीत
अन् आत्महत्याग्रस्त म्हणून
शेतकरीही मरणार नाहीत
पण जगण्यासाठी मदतीचा हात मागतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,... ||८||

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

( कविता जरूर शेअर करा परंतु कवितेखालुन नाव काढू नये )

तडका - सरकारी काम

सरकारी काम,...

सरकारी कामातील विलंब
सर्व परिचित झाला होता
सरकारी काम,सहा महिने थांब
हा विचार प्रचलित आला होता

मात्र आता विलंबाभोवती
कामांना ना फिरावं लागेल
ठरवुन दिलेल्या मुदतीतच
सरकारी काम करावं लागेल

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

मंगळवार, २१ एप्रिल, २०१५

तडका - शुल्क नियंत्रण

शुल्क नियंत्रण

खाजगी शिक्षणसंस्थांनी
विद्यार्थ्यांना ग्रासलेलं आहे
मनमानी फी वसुलीमुळे
शिक्षणही महागलेलं आहे

मात्र अतिरिक्त फी वसुली
आता कायद्यानंच पाप असेल
अन् खाजगी शिक्षण संस्थांच्या
मनमानीलाही चाप बसेल,..?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

सोमवार, २० एप्रिल, २०१५

तडका - हेच वास्तव आहे

हेच वास्तव आहे,...

कधी दुष्काळानं छळलंय
कधी अवकाळानं छळलंय
अन् सरकारच्या आकड्यांनी
आज काळीजही पोळलंय

मात्र सरकारच्या मदतीसाठी
इथे आत्महत्या करत नाहित
पण जगणंच होरपळतं साहेब
कुणी हौसेपायी मरत नाहीत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - आमचे साकडे

आमचे साकडे,...

अवकाळ आणि दुष्काळानं
नको तितकं छळलं आहे
आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याचं
दु:ख कुणाला कळलं आहे,.?

सरकारनं दिलेल्या माहितीतही
कपात केलेलेच आकडे आहेत
नैसर्गिक आपत्त्या जवळून पहाव्या
आमचे सरकारला साकडे आहेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - सोनियाचा आनंद

सोनियाचा आनंद

तडका-फडकी आरोप-टिकांसवे
सरकारवर घणाघाती वार आहे
सुटबुटवाल्यांचे अन् उद्योगपतींचे
राहूल म्हणे मोदींचे सरकार आहे

जनहिताच्या हिताचाही मुद्दा
प्रखरपणाने ठेवला आहे
अन् सोनियाचा आनंद मात्र
मनामध्ये ना मावला आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

रविवार, १९ एप्रिल, २०१५

तडका - आपली गरज

आपली गरज

कुणी मार्ग चुकवणारे असतात
कुणी मार्ग दाखवणारे असतात
अन् मार्ग दाखवता-दाखवताही
कुणी चक्क ठकवणारे असतात

मात्र जरी कुणी भुलवलेच
तरीही मन ना भुलले पाहिजे
आपले हित अन अपाय तरी
आपल्यालाही कळले पाहिजे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - जनतेची फसवणूक,...?

जनतेची फसवणूक,.?

कुणी अडलेले आहेत
कुणी नडलेले आहेत
भुमी-अधिग्रहणाचे इथे
समरही घडलेले आहेत

मात्र जनहिताच्या विरोधात
कायदा सुध्दा जाऊ नये
अन् कुणाकडूनही जनतेची
फसवणूकही होऊ नये

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शनिवार, १८ एप्रिल, २०१५

तडका - विकासाच्या दिशा

विकासाच्या दिशा

विकास करणार्‍या हातांनाच
विकासाची ना भीड असते
कित्तेक कित्तेक योजनांना
घोटाळ्यांचीच किड असते

भ्रष्टाचार्‍यांच्या भ्रष्ट काया
अजुन ना भेदरलेल्या आहेत
म्हणूनच तर विकासाच्या दिशा
इथे सदा अंधारलेल्या आहेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - राष्ट्राची संपत्ती,...

राष्ट्राची संपत्ती,...

आपला राष्ट्राभिमान आपण
अभिमानानं जपला पाहिजे
आपल्या राष्ट्राभिमानाच्या पुढे
देशद्रोही पण झूकला पाहिजे

देशातीलच देशद्रोही ही
देशाचीही आपत्ती असते
अन् खरा देशप्रेमी हिच तर
राष्ट्राची खरी संपत्ती असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - यशाची उमेद

यशाची उमेद

यशासाठी प्रयत्न असतात
अपयशानं हरायचं नसतं
प्रयत्नापासुन दूर कधीच
अपयशानं सरायचं नसतं

मिळालंच अपयश तरी
मनी नाराजी मिरवु नये
प्रयत्नांती यश मिळतंच
आपली उमेद हरवू नये

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शुक्रवार, १७ एप्रिल, २०१५

तडका - विकासाच्या समस्या

विकासाच्या समस्या

प्रत्येकजण आपली बाजु
आपल्या परीनं पटवुन देतो
कुणी काय केले याचाही
प्रत्येक क्षण आठवुन देतो

विकासाच्या नावानं कित्तेकवेळी
निवडणूकाही लढलेल्या असतात
मात्र येणार्‍या प्रत्येक निवडणूकीत
विकासाच्या समस्या वाढलेल्या असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - निवडणूकीय मुद्दे

निवडणूकीय मुद्दे

कधी आर्थिक,कधी भावनीक
कधी जातीचा आधार असतो
निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने
कधी अश्वासनीय बाजार असतो

प्रत्येका कडून प्रत्येकावर
आरोप-टिकांचे गुद्दे असतात
प्रत्येक-प्रत्येक निवडणूकीत
तेच-तेच ठरेल मुद्दे असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - प्रतिष्ठा,...

प्रतिष्ठा,...

आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी
प्रतिष्ठा सदैव पेलावी लागते
प्रतिष्ठा जपण्यासाठी कधी
प्रतिष्ठा पणालाही लावावी लागते

प्रतिष्ठा अशी जपली जावी की
प्रतिष्ठेची कधीच चेष्ठा नसावी
प्रतिष्ठा आपली असली तरी
त्यावर इतरांचीही निष्ठा असावी

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

गुरुवार, १६ एप्रिल, २०१५

तडका - आग पाखड

आग-पाखड

काही गोष्टी घडत असतात
कही मात्र घडवल्या जातात
अन् अशा गोष्टींच्या चर्चा इथे
मुद्दामहून बडवल्या जातात

गरज नसलेली गोष्टही कधी
जाणीवपूर्वक जखडली जाते
तोंड तोफ नसते तरीही तोंडून
शाब्दिक आग पाखडली जाते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - पराभवाचे खापर

पराभवाचे खापर,...

कुणाची हार-जीत कधीच
निकालापुर्वी ठरलेली नसते
मात्र कुणाला जिंकण्यासाठी
कुणाची बाजी हरलेली असते

मात्र चर्चांच्या गोंगाटामध्ये
पराभवालाही ओढले जाते
अन् पराभवाचे खापर मात्र
इतरांच्यावर फोडले जाते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - निकालाचे वास्तव

निकालाचे वास्तव

प्रचार करताना प्रत्येकाचे
वारे जोरदार वाहिले होते
आरोप-टिकांच्या वादळांना
आम्ही सुध्दा पाहिले होते

निकालातील जय-पराजयाने
कित्तेकांचे मनं वेढले आहेत
आहेत कुणी गड राखलेले
मात्र कुणी गडगडले आहेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

मंगळवार, १४ एप्रिल, २०१५

तडका - भीमा,...

भीमा,...

अनिष्ट रुढी अन् परंपरांशी
दिलास भीमा तु लढा
माणसांना दिलं माणूसपण
देऊन जातियतेलाही तडा

जरी पीचला होता समाज हा
विषमतेच्या जुलमामुळे
तरी भारत समतेनं वागतोय
भिमा तुझ्या जन्मा मुळे,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - भीमराया,...

भीमराया,...

तुझ्या शांतीच्या क्रांतीचा
शांतीनंच प्रसार होयोय
अन् तुझ्या तत्वज्ञानाचाही
मना-मनात संचार होतोय

हे महापुरूषा भीमराया
तुझ्या क्रांतीचाच हा ठसा आहे
अन् दिशाहिन या समाजाला
तुझ्या विचारांचाच वसा आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

सोमवार, १३ एप्रिल, २०१५

तडका - बाबासाहेब,...

बाबासाहेब,...

सामाजिक सुधारणेचा तो
त्रिकालबाधीत धैर्य होता
विद्वानाच्याही विद्वानांचा
भिमराव ज्ञानसुर्य होता

अनिष्ट रूढींचा र्‍हास होता
सामाजिक क्रांतीचा ध्यास होता
अरे ना झाला ना होईल कधी
असा बाबासाहेबांचा इतिहास होता

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

रविवार, १२ एप्रिल, २०१५

तडका - मत,...

मत,...

आपले मत मांडण्याचा
प्रत्येकाला हक्क आहे
मात्र कुणाचे मत पाहून
आमचे मत थक्क आहे

मत असं मांडावं की;
त्याला समाजात पत पाहिजे
विचार करूनच विचारपुर्वक
आपण मांडलेलं मत पाहिजे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - एक्झिट पोल,...

एक्झिट पोल,...

निकाल जाहिर होण्याआधीच
तर्क-वितर्काचे बोल असतात
प्रत्येक -प्रत्येक निवडणूकाचे
इथे एक्झिट पोल असतात

अंदाजे बांधलेल्या अंदाजाचीही
कुणाला भलतीच धास्ती असते
कारण एक्झिट पोल म्हणजे
रंगीत तालमीतली कुस्ती असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शनिवार, ११ एप्रिल, २०१५

तडका - बँन्ड बंदीचा उपाय,...?

बँन्ड बंदीचा उपाय,...?

वरातीत नाचण्याची इच्छा
कित्तेकांची विराट असते
प्रत्येक लग्न समारंभात
बँन्ड-बाजा-बारात असते

मोठ्या आवाजात नाचण्याचा
इथे कित्तेकांना चेव असतो
नाचणारे नाचतातही धुंदित
मात्र इतरांना उपद्रव असतो

इतरांचा उपद्रव टाळण्यासाठी
ध्वनी प्रदुषणापासुन वाचावं लागेल
अन् नाचण्याची इच्छा असणारांनी
हेडफोन लावुन नाचावं लागेल,...?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - नैसर्गिक बळी,...

नैसर्गिक बळी,...

हल्ली रखरखत्या उन्हाला
अवकाळाची जोड आहे
नैसर्गिक आपत्तींचा वर्षाव
हि निसर्गाचीच खोड आहे

या नियमित आपत्तींमध्ये
माणूस सदा घेरतो आहे
नैसर्गिक आपत्तींचा बळी
निसर्ग सुध्दा ठरतो आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३