हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८

तडका - कर करकर

कर करकर

पेट्रोलवरतीच बोलु काही
मुद्दा जरा हा चर्चिक आहे
कारण गाडी फिरवणे म्हणजे
आजकाल जरा खर्चिक आहे

म्हणूनच काटकसर करणारेही
आता गाड्या घरीच ठेऊ लागतील
पण घरी लावल्या गाड्यावरतीही
कुणी वेगळा कर लाऊ लागतील

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, १८ जानेवारी, २०१८

तडका - एक निशाणा

एक निशाणा

इकडे फडफड-तिकडे फडफड
आता प्रकर्षाने जाणवू लागली
आपले अस्तित्व टिकवण्यासाठी
इतरांना डिवचुन हिनवु लागली

होती एकेकाळी सत्ता तीचीच
पण आज ऊचल-बांगडी आहे
खाद्याला हडप,नफ्याला गडप
ती खुराड्यातील कोंबडी आहे,.?

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, ६ जानेवारी, २०१८

तडका - पत्रकार

पत्रकार

कधी जातीचे,कधी धर्माचे
तर कधी पक्षाचे होऊ नयेत
पत्रकार कुणाच्या लेबलने
कधी ओळखले जाऊ नयेत

अहो पत्रकार असावा सच्चा
अन् नसावा कुणाचा गुलाम
तरच होत राहिल समाजात
पत्रकारांस सदा मानाचा सलाम

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, ५ जानेवारी, २०१८

तडका - ऊडी चुकीची

ऊडी चुकीची

एकाने मारताच ऊडी
सारेच मारतात ऊडी
मग हाकणारेही बघा
खुशाल मारतात दडी

कुणी करतात आरोप
कुणी सांत्वनही करतात
हाकणारे सदा सुरक्षित पण
इथे ऊड्या मारणारेच मरतात

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, ४ जानेवारी, २०१८

तडका - आमचे झेंडा वॉर

आमचे झेंडा वॉर

जाती-धर्माचा झेंडा बघा
ज्याने-त्याने ठरवला आहे
जाती-धर्मासाठी माणूस
माणसांतुनच हरवला आहे

जात-धर्म सोडायला इथे
जणू कुणाचीही रिस्क नाही
माणुसकीचा झेंडा देखील
अजुनही इथे फिक्स नाही

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३