हा ब्लॉग शोधा

रविवार, ३० डिसेंबर, २०१८

तडका - थर्टी फर्स्ट

थर्टी फर्स्ट

जे आलं, ते जाणार
हे पक्क स्पष्ट आहे
याचा विसर नको की
आज थर्टी फर्स्ट आहे

नव्याचं होईल स्वागत
जुण्याचे मानावे आभार
वाइट क्षण सोडून द्यावे
चांगले घ्यावेत साभार

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१८

तडका - इज्जत विशेष

इज्जत विशेष

इज्जत असेल तर
जपायला बरं वाटतं
इज्जतीत बोललेलं
इतरांनाही खरं वाटतं

म्हणूनच इज्जत जपणे
निर्विवाद पटले पाहिजे
अन् स्वआदराचे श्रेयही
मनाला भेटले पाहिजे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, २६ डिसेंबर, २०१८

तडका - युतीची गती

युतीची गती

कुणाला वाटते नको नको
कुणाला वाटते हवी आहे
युतीसाठीची ही घालमेल
राजकारणात ना नवी आहे

अहो प्रत्येक पंचवार्षिकला
हे महानाट्य उघड असते
सत्तेच्या गाजरासाठी जणू
नको त्याला धरसोड असते

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, २४ डिसेंबर, २०१८

तडका - जात

जात

कुणासाठी प्रीत आहे
कुणासाठी जीत आहे
माणसांमधली जात ही
कुणासाठी वीट आहे

उमलत्या वक्तीमत्वांचाही
कधी कधी ही घात आहे
अन् कित्तेक प्रेमांचा मर्डरर
माणसांमधली ही जात आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, २२ डिसेंबर, २०१८

तडका - थंडीतील गस्त

थंडीतील गस्त

गार गार वातावरण
रोज-रोज होऊ लागले
घराबाहेर पडण्याही
लोक आता भिऊ लागले

गुलाबी थंडीच्या आशा
पुर्णपणे उसावल्या आहेत
सांज-सकाळच्या गस्तही
जणू लोप पावल्या आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, २० डिसेंबर, २०१८

तडका - कांदा

कांदा

झिजवुन झिजवुन मन
याला मायेनं जपलं होतं
आमच्या सुखाचं स्वप्नही
याच्यातच तर लपलं होतं

पण याला भाव देताना
सरकारी इरादा गंदा आहे
म्हणूनच तर आज बाजारी
कवडीमोल हा कांदा आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, १७ डिसेंबर, २०१८

तडका - घरचा बहिष्कार

घरचा बहिष्कार

जमत जरी नसलं तरी
जमवुन घेतलं जातं
नाक-डोळे मोडले तरी
कमवुन घेतलं जातं

सत्तेचं गाजर दिसताच
मैत्रीचा अविष्कार असतो
पण मनात मात्र सदैवच
घरचा बहिष्कार असतो

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, ११ डिसेंबर, २०१८

तडका - सेमी फायनल

सेमी फायनल

हे निवडणूकीचे निकाल
पहा खुप काही सांगुन गेले
जे रोवले होते मातीत
त्यांनाही हवेत टांगुन गेले

आता भाषाही बदलली
मिडीयावाल्या चैनलची
सेमी फायनल झाली ही
प्रतिक्षा आहे फायनलची

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, ९ डिसेंबर, २०१८

तडका - काय आठवले असेल

काय आठवले असेल

कुणी प्युवर ध्येयवेडा तर
कुणी स्वार्थापुरता असतो
हा विचार खोटा आहे की
नेता तसा कार्यकर्ता असतो

कुणी कुणी स्वाभिमानी तर
कुणी निव्वळ गद्दार असतो
म्हणूनच पळतो एकटा एकटा
त्यामागे कुणी मतदार नसतो

अशा कित्तेक नेत्यांचे वर्चस्व
कार्यकर्यांनीच गोठवले असेल
मग अशा नेत्यांना मनापासुन
सांगा काय आठवले असेल

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, ८ डिसेंबर, २०१८

तडका - वाचाळकीचे सत्य

वाचाळकीचे सत्य

नसली जरी लायकी
तरी करतात लुडबूड
कळत नाही त्यांनाच
त्यांचे स्वअज्ञानाचे गूढ

एकदा झापले शब्दांनी
तरी देखील कळत नाही
अन् या वाचाळांचे खरे तर
सरळ करण्याही वळत नाही

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, ३ डिसेंबर, २०१८

तडका - 2.0

2.0

एक टर्म संपली की
दुसरीची आशा असते
इलेक्शन समोर ठेऊन
आशावादी भाषा असते

नवे आश्वासनं,नव्या घोषणा
आणखी काही करू पाहतात
अन् व्हर्जन 2.0 साठी नव्याने
हे नव-नवे प्रयत्न सुरू होतात

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३