हा ब्लॉग शोधा

रविवार, ३० एप्रिल, २०१७

तडका - अवकाळी खेळी

अवकाळी खेळी

ध्यानी मनी नसताना
त्याचं आगमन असतं
नुकसान देखील करतो
त्याचं आग मन असतं

तो येताच मनी भरते धास्ती
असा तो अवकाळी आहे
जणू परंपरेनं चालवलेली
पावसाची ही खेळी आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - पाणी

पाणी

अडवलं तर अडवु शकतं
सोडलं तर पळू शकतं
पाणी म्हणजे जीवन आहे
अनुभवाने कळू शकतं

म्हणूनच पाणी वापरताना
काळजीपुर्वक वापरायला हवे
आपल्यासह पुढील पिढ्यांना
मुबलक पाणी पुरायला हवे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, २८ एप्रिल, २०१७

तडका - हुंडा

हुंडा

माणसांचा हव्यास पहा
वरवरतीच वाढतो आहे
हुंडाबळीचा प्रकारही
अजुन इथे घडतो आहे

हुंडा देणार अन् घेणारही
तुरूंगात कोंबला पाहिजे
हुंडा देण्या-घेण्याचा हा
प्रकारच थांबला पाहिजे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, २७ एप्रिल, २०१७

तडका - यात्रा

यात्रा

यांची संघर्ष यात्रा तर
त्यांची संवादयात्रा आहे
कर्जमाफी करण्याबाबतीत
सरकारी बोल तोतरा आहे,..?

आम्हीही ऊत्सुक आहोत
यात्रा यानंतर कोणची आहे,.?
शेतकर्याच्या वाट्याला तर
कष्ट आणि यातनांची आहे,.!

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, २६ एप्रिल, २०१७

तडका - तुर

तुर

पिकवा पिकवा म्हणून अम्हा
तुम्ही तुर पिकवायला लावली
पुन्हा तुम्हीच फिरवली पाठ
जेव्हा तुर विकायला ठेवली

आता खरं सांगा साहेब तुम्हीच
तुमची भावना का क्रुर आहे
तुमच्या धोरणांनीच केलाय घात
आता आमची संकटात तुर आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, २५ एप्रिल, २०१७

तडका - एक आठवण

एक आठवण

तीच्यावरचं माझं प्रेम
अजुन सुध्दा विरलं नाही
मनामधलं तीचं स्थान
मी जराही दुर सारलं नाही

हवी-हवीशी वाटणारी ती
अगदीच सुपर गोड होती
दुसरी तिसरी कोणी नाही
ती टरबुजाची फोड होती

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, २४ एप्रिल, २०१७

तडका - एक विनंती

एक विनंती

अपेक्षेने पिकवली तुर
पण झालो मजबुर
कष्ट करून आनंदाचा
ना गवसला तो सूर

लावल्या रांगाच्या रांगा
तुर विक्री करण्यासाठी
आता तरी समजुन घ्यावे
शेतकरी तारण्यासाठी

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, २३ एप्रिल, २०१७

तडका - हुंडा एक कलंक

हुंडा एक कलंक

कित्तेकांनी सांगितले आहे
आम्हीही सांगत आहोत
हुंडा देणं-घेणं गुन्हा आहे
ब्रीद मनांवर टांगत आहोत

आपसातील आपुलकीने
समाज चित्र रास्त व्हावे
अन् हुंड्यामुळे कोणाचे
जीवन न् ऊध्वस्त व्हावे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, २२ एप्रिल, २०१७

तडका - रीत शोषणाची

रीत शोषणाची

बार केले बंद म्हणून
पेट्रोल केले महाग
कर वसुलीचा काढला
सामान्यांवरती राग

कुणाला कुठे कसे लुटायचे
त्यांच्या मनातला गेम असतो
कुणाला कसे शोषले जाईल
इथे याचा काही नेम नसतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - नाचणारांनो

नाचणारांनो

आज याचं,ऊद्या त्याचं
रोज चालु आहेत लग्न
न् ठेवता ऊन्हाची तमा
कुणी नाचण्यामध्ये मग्न

नाचण्याला विरोध नाही
लग्नात जरूर नाचावे
पण ऊन्हाची वेळ पाहुन
लग्नाचेही भान राखावे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, १९ एप्रिल, २०१७

तडका - व्हि आय पी

व्हि आय पी

जोडण्या साधेपणाचे बंध
लाल दिवा केला बंद
तरी देखील जाणार नाही
व्हिआयपीपणाचा गंध

दिवा जरी नसला तरी
नवे चिन्ह हेरले जातील
व्हिआयपीचे लेबल लाऊन
कुणी इथे फिरले जातील

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, १८ एप्रिल, २०१७

तडका - धडा

धडा

कायद्यामुळे पळाला पण
कायद्यातच गटला
गटलेला विजय मल्ल्या
कायद्यानेच सुटला

कायद्याने गटवला,सोडवला
आता कायद्यातच अडकवावा
कायद्याचा धाक राहिल असा
मल्ल्याला धडा शिकवावा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, १७ एप्रिल, २०१७

तडका - कचरा एक समस्या

कचरा एक समस्या

वेग-वेगळ्या वापरातुन
निर्माण होतो हा कचरा
निर्माण झाल्या कचर्यातुन
आरोग्यास होईल खतरा

म्हणूनच तर या कचर्याची
समस्या लक्षात घेतली जावी
निर्माण होणार्या कचर्याची
योग्य विल्हेवाट केली जावी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, १६ एप्रिल, २०१७

तडका - तापमान विशेष

तापमान विशेष

बाहेर फिरायचं म्हणजे
हि ऊन्हाची भीती आहे
गाडीवरती फिरणारांची
आता मंदावती गती आहे

धरणी देखील तापली सारी
ऊन कुठवर सोसले जाईल
झाडे जेव्हा वाढवु तेव्हाच
हे तापमानही रोखले जाईल

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, १४ एप्रिल, २०१७

तडका - निर्णय

निर्णय

कधी मागे तर कधी पुढे
स्तुती,टिकास्र फिरत असतात
पण कोण चांगला कोण वाईट
विचारांवरतीच ठरत असतात

आपल्या कर्तृत्वानुसारच तर
असे समाजाचे मत ठरतात
पण चांगले निर्णय घेतले तर
विरोधकही स्वागत करतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, १३ एप्रिल, २०१७

देण बाबासाहेबांची

देण बाबासाहेबांची

                         कवी :- विशाल मस्के,सौताडा.
                         व्हाटस्अप :- 9730573783

जगाला दिपवते आहे,प्रगल्भता विचारांची
प्रजासत्ताक भारत ही,देण बाबासाहेबांची

भारतीय लोकशाही
जगभरात ग्रेट आहे
आदर्श राष्ट्रनिर्मिती
हि भिमाची भेट आहे

आज राज्यघटने मुळेच,सुखी काया लोकांची
प्रजासत्ताक भारत ही,देण बाबासाहेबांची

समता,न्याय,हक्क
निर्विवाद भेटत आहे
बंधुता आणि एकात्मता
मना-मनाला पटत आहे

ओतप्रोत भरली आहेत,ती मुल्ये मानवतेची
प्रजासत्ताक भारत ही,देण बाबासाहेबांची

सामाजिक बांधिलकीने
समाजही वागतो आहे
हक्क आणि स्वातंत्र्य
अधिकाराने भोगतो आहे

ना कमतरता कसली,मुलभुत अधिकारांची
प्रजासत्ताक भारत ही,देण बाबासाहेबांची

ना ठेवला तो थारा कुठे
जाती-धर्मांच्या गर्दाडांना
राष्ट्रीयताच आहे जात-धर्म
कधी कळणार हे मुर्दाडांना

प्रवाहात घेण्यासाठी,केली सोय उपेक्षितांची
प्रजासत्ताक भारत ही,देण बाबासाहेबांची

आपसातील सोडून द्वेश
एकमेकांचे बंधु व्हा रे
संविधानिक तत्वांनुसार
चला आनंदाने नांदु सारे

तरच लोकशाहीची,सदा ऊंचच राहिल ऊंची
प्रजासत्ताक भारत ही,देण बाबासाहेबांची

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. 9760573783

-------------------------------------

* कविता नावासह शेअर करण्यासाठी परवानगी

* सदरील कविता पाहण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा https://youtu.be/Q0z9McmA8bg

तडका - मानाचा प्रणाम

मानाचा प्रणाम

सामाजिक अविचारांना
विचारांनीच झापले आहे
विचार मांडले असे की
ज्याने जगही दिपले आहे

बाबासाहेबांच्या विचारांना
जगभरातुन सलाम आहे
अशा ज्ञानाच्या प्रतिकाला
आमचा मानाचा प्रणाम आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

हे ज्ञानसुर्य भीमराया

कवी,वात्रटिकाकार "विशाल मस्के" यांची "हे ज्ञानसुर्य भीमराया" हि कविता पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://youtu.be/MLHTlH9KESA

बुधवार, १२ एप्रिल, २०१७

तडका - कर्ज माफी

कर्ज माफी

शेतकरी कर्ज माफीचं
प्रकरण लांबलं आहे
नको नको ते पुढ्यात
सरकारने कोंबलं आहे

प्रादेशिकच्या मुद्द्यांहून
ऊगीच कुणी भडकु नये
आपसांतील वादांमध्ये
कर्ज माफी अडकु नये

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, ११ एप्रिल, २०१७

तडका - आपली जबाबदारी

आपली जबाबदारी

इकडे मोजले तिकडे मोजले
सगळीकडेच तापलेले आहे
ऊन्हाचा चढता पारा पाहून
म्हणे पर्यावरण कोपलेले आहे

मनाला प्रसन्नता देणारी ती
जणू थंडाईच लपली आहे
पण पर्यावरण संवर्धन करणे
हि जबाबदारी आपली आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, १० एप्रिल, २०१७

तडका - चंगळ ऑफर्सची

चंगळ ऑफर्सची

आता टेलिकॉम ऑफर्सचा
इथे रेट्या मागुन रेटा आहे
अनलिमिटेड कॉलिंगसह
जास्तीत जास्त डेटा आहे

कुणा-कुणाची ऑफर तर
इथे एस एम एस सकट आहे
पण लोक नव्याने शोधतात
कुठे आणखी काय फुकट आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, ९ एप्रिल, २०१७

तडका - आठवणी

आठवणी

कधी आपोआप येतात
कधी काढाव्या लागतात
मनातील जुन्या आठवणी
नव्याने ओढाव्या लागतात

कधी इतरांच्या आठवणीही
हुरूपाने साभार असतात
कधी-कधी मनं ऊसवतात तर
कधी मनाला आधार असतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, ८ एप्रिल, २०१७

तडका - कर्ज माफी विशेष

कर्ज माफी विशेष

विरोधकांनी ऊचलला
मिडीयाने धरला आहे
हा कर्ज मीफीचा विषय
मना-मनात पेरला आहे

आता सरकारने द्यावा दिलासा
हा आमचा विचार दडला नाही
पण दुरचे आदर्श देऊन सुध्दा
सरकारला फरक पडला नाही

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, ७ एप्रिल, २०१७

तडका - निष्ठा

निष्ठा

काय झाले कसे झाले
सर्व काही ऊघड आहे
अगदी सहज दिसणारे
इथे निष्ठेचे बेगड आहे

कोण काय करतो हे तर
सगळं काही स्पष्ट आहे
कोणाची निष्ठा कोणावर
हि बदलणारी गोष्ट आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, ६ एप्रिल, २०१७

तडका - राजकीय घडामोडींत

राजकीय घडामोडींत

नवे राजकीय समीकरणे
आता समोर येऊ लागली
पदं वाटपाची नाराजगी
चिवडा वाटून होऊ लागली

राजकीय हेव्या-देव्यांमध्ये
खाद्यपदार्थही तळू लागले
गमती-जमतीचे खेळ हल्ली
राजकारणात खेळु लागले

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, ५ एप्रिल, २०१७

प्रेमाची निशाणी

प्रेमाची निशाणी

                 कवी :- विशाल मस्के,सौताडा.
                 व्हाटस्अप:- 9730573783

तापमानाचा पारा सखे
वरवर लागलाय चढायला
धरले डोईवर हात तुझ्या
हि सावली घे तु दडायला

इवल्या इवल्या हातांची ही
सावली तुजला पुरणार नाही
पण हातांच्या या छायेने ऊन
डोईवरती तुझ्या सरणार नाही

ऊन्हाची एकेक तप्त झळाळी
जणू ह्रदयावर वार करते आहे
वसंताने बहरलेली सुंदर काया
मनाने तीळ-तीळ जळते आहे

या ऊन्हात तुजला पाहून सखे
जीवाची झालीय लाही-लाही
का वेळ आली तुजवरती ही
खटकतंय मनात काही-काही

वाढलेल्या तापमानाचा रोष
मानवां वरतीच येतोय सारा
मानवांनीच केली वृक्ष कत्तल
टोचतोय मनाला हा तप्त वारा

मानव चुकीचा पुतळा असेलही
पण आता चुकांनाही सुधरायचं
सुधारल्या आपणच आपल्या चुका
तर बंद होईल जगणंही हादरायचं

येईल तापमानही आटोक्यात
मिळेल सर्वांनाच शितल छाया
वृक्ष-वेली फूलतील फुला-फळांनी
सृष्टीचीही दिसेल खुलुन काया

निसर्ग सुरक्षित तर जिवन सुरक्षित
सखे हि गोष्ट मना-मनात भरायची
आपल्या प्रेमाची निशाणी म्हणून
चल आता वृक्ष लागवड करायची

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. 9730573783

* सदरील कविता नावासह शेअर करण्यासाठी परवानगी

* कविता ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

* कविता पाहण्यासाठी you tube लिंक :- https://youtu.be/OfpQ0boQofA

* चालु घडामोडींवर आधारित वात्रटिका वाचण्यासाठी ब्लॉग वर भेट द्या www.vishalmske.blogspot.in

तडका - अंधश्रध्देच्या कथा

अंधश्रध्देच्या कथा

कुठे लोक सुधरले तरीही
कुठे अजुनही मागे आहेत
समाजात खोलवर रूतलेले
हे अंधश्रध्देचे धागे आहेत

समाजात ऊघड चालणार्या
अजुन अघोरी प्रथा आहेत
अशिक्षितांसह शिक्षितांच्या
रोज वाढत्या कथा आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, ४ एप्रिल, २०१७

तडका - आजची गरज

आजची गरज

ऊद्भवणार्या व्याधींनी
जो-तो आता त्रासला आहे
ऊन्हाच्या समस्यांनी हा
समाजही ग्रासला आहे

दिवसें-दिवस समाजात
वाढली संख्या पीडांची
हे तापमान थोपवण्या
आता गरज आहे झाडांची

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, ३ एप्रिल, २०१७

तडका - शेतकर्याची काळजी

शेतकर्याची काळजी

काल मागणी करणारेच
आज मात्र टाळु लागले
सत्तेत आल्यापासुन म्हणे
कर्तव्यादूर पळू लागले

कर्जमाफीची मागणी सदैव
विरोधकांनीच का करायला हवी
शेतकर्याची काळजी खरं तर
सरकारलाही व्हायला हवी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, २ एप्रिल, २०१७

तडका - भेसळ

भेसळ

खाद्यपदार्थ हल्ली
ना सुरक्षित आहेत
जीवनावश्यक गोष्टी
का दुर्लक्षित आहेत

पैसा कमावण्यासाठी
नको त्याची भेसळ आहे
माणसांच्या विचारांत
बेईमानी सळ सळ आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, १ एप्रिल, २०१७

तडका - दारू बंदी

दारू बंदी

दारू बंदीच्या संकल्पनेची
इथे ऊडवली जातेय टर
दारूमुळे मिळतोय कर
पण कित्तेकांचे बुडतेय घर

दारू बंदीचा ऊत्तम मार्ग
पिणारालाच कळला पाहिजे
स्वत:चा तोटा लक्षात घेऊन
पिणारा दुर वळला पाहिजे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३