हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ३१ मार्च, २०१५

तडका - फसवा-फसवी दिन

फसवा-फसवी दिन,...

आपण फसु नयेत म्हणून
कुणी तयारीत बसले जातात
हलगर्जीपणामुळे कधी
कुणी सहज फसले जातात

कुठे फसवल्याचा हर्ष तर
कुठे फसल्याचा शीन असतो
फसणार्‍या अन् फसवणारांचा
हा फसवा-फसवी दिन असतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - डान्स बार कोठडी

डान्स बार कोठडी,..!

कायद्याचे रक्षकच कधी
इथे कायद्याला तडा देतात
अधिकाराच्या गैरवापराने
कायद्याचीच पीडा होतात

जबाबदार व्यक्तीकडूनही
कधी कर्तव्याची नाकर्ती होते
अन् आरोपींना ठेवण्यासाठी
कुठे डान्सबारची पार्टी होते,.!

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

सोमवार, ३० मार्च, २०१५

तडका - अंधश्रध्देच्या हद्दी

अंधश्रध्देच्या हद्दी,...

समाजामध्ये वावरताना
चारित्र्यवान शक्कल पाहिजे
आपण काय बोलावे याचीही
प्रत्येकाला अक्कल पाहिजे

जरी विज्ञानवादी विचाराच्या इथे
कुणी संकल्पना मांडल्या आहेत
तरी अंधश्रध्दा पसरविण्याच्याही
कुणी हद्दीच ओलांडल्या आहेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - अंधश्रध्देच्या हद्दी

अंधश्रध्देच्या हद्दी,...

समाजामध्ये वावरताना
चारित्र्यवान शक्कल पाहिजे
आपण काय बोलावे याचीही
प्रत्येकाला अक्कल पाहिजे

जरी विज्ञानवादी विचाराच्या इथे
कुणी संकल्पना मांडल्या आहेत
तरी अंधश्रध्दा पसरविण्याच्याही
कुणी हद्दीच ओलांडल्या आहेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - कायद्याचा धाक

कायद्याचा धाक,...

निवडणूका म्हटलं की
कुणाचा तोल जाऊ शकतो
कधी प्रचारातुन आचाराचा
संहिता भंगही होऊ शकतो

मात्र प्रसंगावधान बाळगत
वर्तनुकीत ना बाक पाहिजे
कायदा आणि सुव्यवस्थेसाठी
कायद्याचाही धाक पाहिजे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - पिस्तुल प्रकरण

पिस्तुल प्रकरण,...

त्यांची पिस्तुल पाहताच
यांनी वाभोळ्या काढल्या
खोटी पिस्तुल दाखवत
टिकेच्या गोळ्या झाडल्या

कुणाकडून म्हणे प्रताप होता
कुणाकडून बालिशपणा झाला
मात्र या पिस्तुल प्रकरणांचा
बोभाटाही ठण् ठणा झाला

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

रविवार, २९ मार्च, २०१५

तडका - हाकालपट्टी

हाकालपट्टी,...

कुणा-कुणाकडून काही गोष्टी
स्वत:पासुनच भटकू शकतात
कुणा-कुणाच्या काही गोष्टी
कुणा-कुणाला खटकू शकतात

मात्र भटकणारे अाणि खटकणारे
कधी गट्टीत,कधी कट्टीत असतात
अन् आपले वाटणारेही वेळेप्रसंगी
कधी-कधी हाकालपट्टीत असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - आप-आपले

"आप"-आपले,...

ज्यांना "आम"चे म्हटले होते
ते ना "आम"चे राहिले होते
इतरांचे वावटळी वारे जणू
त्यांच्यामध्येही वाहिले होते

कधी कुणी आपुलकीनं तर
कुणी निर्दयी वागू शकतात
"आप"ले-आपले म्हणणारेही
"आप"-आपले बघू शकतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शनिवार, २८ मार्च, २०१५

तडका - स्वभावी बाणे

स्वभावी बाणे,..

मवाळवादी बाणा कधी
जहालपणे वागुन बघतो
तर कधी जहालपणाही
मवाळतेला भोगुन बघतो

जहाल आणि मवालसुध्दा
एकमेकांत ओघळू शकतात
जशी वेळ येईल तस-तसे
स्वभावी बाणे बदलु शकतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - पाठिंब्याच्या आशा

पाठिंब्याच्या आशा,...

पाठिंबा देण्या-घेण्यासाठी
मना-मनामधुन गळ असतो
पाठिंब्यात मिळालेला आधार
जणू उम्मेदिचं बळ असतो

कधी इतिहासाच्या पाऊलखुणा
वर्तमानात पहूडलेल्या असतात
अन् पाठिंब्याच्या आशा मात्र
मना-मनात दडलेल्या असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शुक्रवार, २७ मार्च, २०१५

तडका - व्यक्तीची योग्यता,...

व्यक्तीची योग्यता,...

प्रत्येक-प्रत्येक व्यक्तीची
इथे योग्यता पाहिली जाते
योग्य व्यक्तींची अप्रत्यक्षही
कधी गाथा गायली जाते

विचार आणि कार्यावरून
व्यक्तीची योग्यता कळून जाते
अन् त्यांची यशस्वीता सुध्दा
जणू त्यांच्यासाठी चालुन येते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - सन्मान

सन्मान,...

चांगले काम करण्याच्या
प्रत्येकाला संधी असतात
अन् प्रत्येकाच्या कार्याच्या
इथे सर्व नोंदी असतात

त्यांच्या सत्कार्याचा भाग
देशाचीही शान होतो
अन् प्रत्येकाच्या सत्कार्याचा
सन्मानानं सन्मान होतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

गुरुवार, २६ मार्च, २०१५

तडका - कटू सत्य

कटू सत्य

भारतीयांच्या पराभवानं
कुणी अश्रु ढाळतो आहे
तर खेळाडूंना दोष देत
कुणी शाब्दिक छळतो आहे

मात्र हार असो की जीत
संयमानं रूचवावं लागतं
अन् विजयाच्या आनंदापरी
हरल्याचं दु:खही पचवावं लागतं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - हार-जीत

हार-जीत,...

जिंकण्याची आशा जरीही
मना-मनात हेरलेली असते
मात्र कुणाचीही हार-जीत
खेळामध्ये ठरलेली नसते

कधी न जिंकणाराची काया
कधी बदलली जाऊ शकते
तर जिंकणाराचीही खेळामध्ये
अवचकलीनं हार होऊ शकते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

बुधवार, २५ मार्च, २०१५

तडका - निवडणूकातील निवडचुका

निवडणूकातील निवडचुका

निवडणूका म्हटलं की
कुणाला धास्ती असते
तर कुणा-कुणाला इथे
हर्षभरित मस्ती असते

मात्र फिरवायच्या म्हणून
आता वारंवार फिरवू नयेत
निवडणूकातील निवडचुका
पुन्हा-पुन्हा गिरवू नयेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - आपली काळजी,...

आपली काळजी,...

तापमापीतील पाराही
आता वर-वर चढतो आहे
कारण ऊन्हाचा कहर
दिवसें-दिवस वाढतो आहे

या ऊन्हाच्या धग-धगीत
जबाबदारी ओतली पाहिजे
आपली काळजी आपणच
काळजीपुर्वक घेतली पाहिजे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

मंगळवार, २४ मार्च, २०१५

तडका - बाणा,...

बाणा,...

जुना बाणा,नवा बाणा
यात फरक असु शकतो
जशी वेळ येईल तसा
हा फरक दिसु शकतो

कधी-कधी मात्र स्वार्थासाठी
बाणा सुध्दा अडलेला असतो
कठोर बाणा अन् नरम बाणा
एकमेकांनाच जोडलेला असतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - हरभर्‍याचं झाड

हरभर्‍याचं झाड,...!

चढवणारे चढवत असतात
चढणारेही चढत असतात
चढता-चढता चढणारेही
धप्पदिशी पडत असतात

चढवणारांना अन् चढणारांना
अजुनही ना त्याची चाड आहे
मात्र या गोष्टीचा साक्षीदार
आजही हरभर्‍याचं झाड आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका आरक्षणाचा विचार

आरक्षणाचा विचार,...

आरक्षणाच्या बाबतीत
हलगर्जीपणा नसावा
विकासाच्या वाटेवरून
कुणी सुध्दा उणा नसावा

उगीच विचार करू म्हणत
टाळा-टाळीचा प्रकार नसावा
आता आरक्षणाच्या मागणीचा
विचारपुर्वक विचार असावा

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

सोमवार, २३ मार्च, २०१५

तडका - आरक्षणाचा एल्गार

आरक्षणाचा एल्गार

सरकार वरील रोषाची
अजुन भावना गेली नाही
दिल्या गेलेल्या शब्दाची
म्हणे पुर्तता झाली नाही

आता सरकार वरती  असा
कठोर आरोपाचा मार आहे
धनगर समाज आरक्षणाचा
आंदोलनात्मक एल्गार आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

रविवार, २२ मार्च, २०१५

बोलताना

तडका - ठाव मना-मनाचे

ठाव मना-मनाचे,...

कुणासाठी ठाव असतो
कुणासाठी घाव असतो
वेग-वेगळ्या मनामध्ये
वेग-वेगळा भाव असतो

जसे मनं बदलतील तसे
कधी अर्थ बदलु शकतात
कुण्या मनात उचलणारे
कुणा मनी आदळू शकतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शनिवार, २१ मार्च, २०१५

तडका - आरोप-प्रत्यारोप करताना

आरोप प्रत्यारोप करताना,...

समजु शकणार्‍या गोष्टींचे
कधी गैरसमज होऊ नयेत
फालतु अफवांच्या बळीही
आपल्या भावना जाऊ नयेत

प्रत्येक गोष्टीतली सत्यताही
चिकित्सकपणे जाणली जावी
आरोप-प्रत्यारोप करताना
आपली बुध्दी ना हिनली जावी

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

तडका - शुभ अशुभ

शुभ-अशुभ

कुणासाठी गारवा असतात
तर कुणासाठी उब असतात
कुणासाठी शुभ तर कधी
कुणासाठी अशुभ असतात

वेग-वेगळ्या भावनेच्या
वेग-वेगळ्या दृष्टी असतात
वेग-वेगळ्या नजरेमधून
वेग-वेगळ्या गोष्टी असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

शुक्रवार, २० मार्च, २०१५

तडका - गुढी पाडवा

गुढी पाडवा

पारंपारिक असली जरी
नव्या-नव्याने थाटली जाते
नव-वर्षाच्या स्वागताला
रूढीची गुढी नटली जाते

मना-मनात आपुलकी अन्
आनंदाचा गोडवा असतो
मरठी माणसांचं नवं साल
असा हा गुढी-पाडवा असतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

तडका - हे नवल नव्हे

हे नवल नव्हे,...

सरळ सरळ चालणारे
सरळ सरळ ठकू शकतात
कधी धनुष्याच्या बाणाचेही
इथे नेम चुकू शकतात

विश्वासाचे विश्वासही केवळ
इथे फक्त भासुन जातात
अन् कमलपुष्पातही म्हणे
घड्याळी काटे दिसुन येतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

गुरुवार, १९ मार्च, २०१५

तडका - क्रांतीवादी विचार

क्रांतीवीदी विचार

इतिहास हळहळला जाईल
भविष्काळ गहिवरला जाईल
इथल्या चळवळीचा इतिहास
जेव्हा-जेव्हा पाहिला जाईल

इथल्या क्रांतीकारांचे बलिदान
चळवळीची साक्ष असतील
अन् त्यांचे क्रांतीवादी विचार
भविष्याचेही भविष्य असतील

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

२० मार्च २०१५ दै. प्रजापत्र

तडका - भारतीयांचा हक्क

भारतीयांचा हक्क

विजयाच्या राशीतुन
मागं कधी सरला नाही
खेळ खेळला असा की
एकही डाव हरला नाही

भारतीयांच्या या खेळीनं
जग साराच थक्क असेल
अन् अशा खेळीनं भारतीयांचा
विश्वचषकावरही हक्क असेल

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

काका

काका,...

काका तुम्ही सोडून गेलात
याला मन संमत नाही
अन् श्रध्दांजली देण्याची
आमच्यामध्ये हिंमत नाही

गहिवरलं काळीज जरी
धरणी स्थिर राहिली नाही
आभाळाची भकास काया
अशी कधीच पाहिली नाही

कानात गुंजतो अजुनही
काका तुमचा आवाज
कसा विश्वास ठेवावा की
तुम्ही नाहित इथे आज

तुमच्या विचारानं विचार
समाजाचे बदलत आहेत
तुमचे उपदेशात्मक बोल
कानावरती आदळत आहेत

तुमचं हूबेहूब चित्रही
डोळ्यांपूढं साकारतं आहे
काका तुमच्या जाण्याला
मन आज नाकारतं आहे

तुमची वैचारिक क्रांती
मना-मनात रुजली आहे
सुरू राहिल ही चळवळ मात्र
मशाल आज विझली आहे,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

बुधवार, १८ मार्च, २०१५

तडका - घेरलेलं बजेट

घेरलेलं बजेट,...

बजेट जाहिर करताना
भावना म्हणे दूजी आहे
महा-बजेट वरती सुध्दा
कुठे महा-नाराजी आहे

बजेट आणि नाराजीचं
असं हे सुत्र ठरलेलं असतं
प्रत्येक-प्रत्येक बजेटला
नाराजीनं घेरलेलं असतं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

१९ मार्च २०१५ दै. प्रजापत्र

मंगळवार, १७ मार्च, २०१५

तडका- सरकारचा विरोध,...!

सरकारचा विरोध,...!

कुणी अडलेले आहेत
कुणी नडलेले आहेत
भु-संपादन विधेयकावर
कुणी इथे चिडलेले आहेत

जन कल्याणाचीच भुमिका
राज्यकर्त्यांनीही घ्यायला हवी
सरकारचा विरोध होण्याची
वेळच कशाला यायला हवी,..?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

१८/०३/२०१५ दै.प्रजापत्र

तडका- भु-संपादनाच्या विरोधार्थ

भु-संपादनाच्या विरोधार्थ,..

आप-आपल्या परिनं
कुणी पाठींबा दोतो आहे
भु-संपादन विधेयकाचा
चौफेर विरोध होतो आहे

प्रखर विरोध करण्यासाठी
कुणी पावले उचलले आहेत
भु-संपादनाच्या विरोधार्थ
कुणी भुमीवर चालले आहेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

सोमवार, १६ मार्च, २०१५

तडका- अविश्वासी ठराव

अविश्वासी ठराव,...

कुणी जोडला जाऊ शकतो
कुणी तोडला जाऊ शकतो
विश्वासावर विश्वास ठेऊन
अविश्वास घडला जाऊ शकतो

आकड्यांच्या संख्ये भोवती
साट्या-लोट्यांचा घेराव असतो
अन् विश्वासावर घाला घालुन
कधी अविश्वासी ठराव असतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

१७/०३/२०१५ दै.प्रजापत्र

विश्वासाचा ताल,...

दैनंदिन जीवनात,...

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय,...

कवी,वात्रटिकाकार "विशाल मस्के, 9730573783 " यांची महाराष्ट्रात गाजत असलेली कविता,...

मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,...

माझ्या समस्त मावळ्यांनो,महाराष्ट्राच्या कल्याणासाठी सांगतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||धृ||
आज तिनशे वर्ष होऊन गेले
हा महाराष्ट्र तुमच्याकडे सोपवला आहे
पण या महाराष्ट्रात आज
रासवांचा बाजार फोफावला आहे
म्हणूनच तर तुम्हाला आज,हा सांगावा धाडतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||१||
काय,चाललंय काय या महाराष्ट्रात
सर्वत्र अनागोंदी कारभार चाललाय
जणू गतानुगतिक आले संपुष्टात
अन् अराजकतेचाच दरबार भरलाय
प्रत्येकजण आप-आपल्या परीनं,या महाराष्ट्राला ओरबाडतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||२||
अन्याय अन् अत्याचार करणाराला
तेव्हा आम्ही पायदळी तुडवला
ते तुमचेच तर पुर्वज होते
ज्यांच्या सामर्थ्यांनं मी महाराष्ट्र घडवला
कुठे गेली ती क्रांतीची आग,का मराठी बाणा घुटमळतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||३||
आम्ही कित्तेक लढाया केल्या आहेत
पण कधीच शेतकर्‍याच्या पिकाला धक्का नव्हता
मंदिर,मज्जिद अन् कुराण बायबल
ना यांना कधी धक्का होता
म्हणूनच तर तो इतिहास, आजही जगभरात गौरवतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||४||
स्वराज्यात कधीच स्रीयांना भय नव्हतं
शत्रुंच्या स्रीयाही आम्ही जपलेल्या आहेत
कित्तेक गौरव केलेल्या स्रीयांना
इतिहासानंही टिपलेल्या आहेत
आज मात्र स्रीयांवरील अत्याचार पाहून,तलवारीतला जोर सळसळतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||५||
जाती-धर्माच्या भींती आम्ही तेव्हाच पाडल्या होत्या
अठरा पगड जाती स्वराज्यासाठी झटल्या होत्या
स्वराज्याची निर्मिती हेच ध्येय मनी ठेऊन
क्रांतीसाठी जणू पेटून ऊठल्या होत्या
आज मात्र आम्हालाच जाती-धर्मात अडकवण्याचा प्रयत्न होतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||६||
वागायचं असेल तर माणूसकीनं वागा
जगायचं असेल तर स्वाभिमानानं जगा
नाहीतर स्वत:चे शिरच्छेद करून घ्या
पण माझ्या महाराष्ट्राला काळीमा फासु नका
मानवतेच्या कल्याणासाठी हा,कठोरतेचा हूकूम सोडतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||७||
कित्तेक मावळ्यांनी रक्त सांडवुन
हा महाराष्ट्र जपलेला आहे
एका-एका मावळ्याचं शौर्य पाहून
हा आसमंतही दिपलेला आहे
म्हणूनच तर या महाराष्ट्रासाठी,आजही जीव तळमळतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||८||

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.9730573783

[ कविता वाचुन झाल्यावर शेअर करा परंतु कवितेखालुन नाव काढू नये,...]
( कवितेचा ऑडीओ/व्हिडीओ मिळविण्यासाठी व्हाट्सअप संपर्क:- 9730573783 )