हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ३१ मार्च, २०१७

तडका - फसवा-फसवी दिन

फसवा-फसवी दिन

एक एप्रिल दिवस ऊगवता
मनी विचारांची रनिंग असते
कोणाला कसं फसवायचं
डोक्यामध्ये प्लॅनिंग असते

कुणी अवचकलीने फसतोही
पण मनामध्ये ना शीन असतो
फसवणारा अन् हसवणारा
हा फसवा-फसवी दिन असतो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - सूट

सूट

दिसता कुठे सूट
केली जाते लुट
वस्तु आणि सुटीचं
नातं हे अतुट

ग्राहकांना मिळता सुट
खरेदीचे ओघ ऊतु जातात
मात्र प्रत्येक प्रत्येक सूटीमागे
वेग-वेगळे लपे हेतु असतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, २९ मार्च, २०१७

तडका - घरचा आहेर

घरचा आहेर

जशी आश्वासनं केलती
म्हणे तसं घडलं नाही
सरकारला खडसावण्या
खडसेंनीही सोडलं नाही

सरकारच्या नाकर्तीपणाचे
कुणी लक्षणं दावु लागले
दुरच्यांसह घरच्यांचेही
सरकार बोलणे खाऊ लागले

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, २८ मार्च, २०१७

तडका - आठवण माठाची

आठवण माठाची

पारंपारिक पाणपोई
काळा आड रेटली आहे
माठाची जागा हल्ली
फ्रिजने घेतली आहे

ऊन्हाची दाहकता वाढता
थंड पाण्याचा घाट आहे
पण फ्रिजच्या पाण्यापुढे
आठवणीत जुनाच माठ आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, २७ मार्च, २०१७

तडका - बोगसगीरी

बोगसगीरी

कोण- कोण खरे अन्
नक्की कोण खोटे आहे
समाजात बोगसगीरीचे
भले मोठे साटे-लोटे आहे

जे दिसतंय तेच सांगतो
ऊगीच काही फेकत नाही
कोणावर विश्वास ठेवावा
खात्रीने सांगु शकत नाही

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, २६ मार्च, २०१७

तडका - खंत

खंत

हि आजची गोष्ट नाही
वारंवारच घडते आहे
बेईमानांच्या कृत्यांमध्ये
इमानदारी पीडते आहे

इमानदारीवरून हल्ली
विश्वास दूर जातो आहे
बेईमानांचा आदर मात्र
आपुलकीने होतो आहे,.!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, २५ मार्च, २०१७

तडका - दिल की बात

दिल की बात

दिसताच प्रेमात पडावं
असं आकर्षक रूप आहे
तीच्या सुखमय आठवणीचा
हा जाहिररित्या प्रुफ आहे

ती जवळ नसतानाही तिचंच
कित्तेकांच्या मनात ड्रिम आहे
ऊन्हामध्येही थंडावा देणारी
ती गुळमट आइस्क्रीम आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - गद्दारीची डेफिनेशन

गद्दारीची डेफिनेशन

यांच्या नजरेत ते आहेत
त्यांच्या नजरेत हे आहेत
एकमेकांना गद्दार ठरवण्या
इथे वेग-वेगळे वे आहेत

खरं तर सर्वज्ञात असतं की
कुणी धुळ कुणाला चारली आहे
पण तरीही गद्दारीची डेफिनेशन
हवी तशी फ्लेक्झिबल ठरली आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, २३ मार्च, २०१७

तडका - निष्कर्ष

निष्कर्ष

राग सर्वांना येतो
आवरायला हवा
तोल सर्वांचा जातो
सावरायला हवा

तेव्हाच कुठे जगण्यात
गोडवा वाढला जाईल
माणसांच्या मना-मनात
स्नेह-भाव जोडला जाईल

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, २२ मार्च, २०१७

तडका - वार निलंबनाचा

वार निलंबनाचा

कधी कुणी नडतात
कुणी नडवले जातात
म्हणूनच निलंबनही
इथे घडवले जातात

जेव्हा जेव्हा नडले कोणी
तेव्हा हा प्रहार केला आहे
इतिहासाच्या पानांत देखील
निलंबनाचा वार झाला आहे,.?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - सत्तेचे नाते

सत्तेचे नाते

काल जे दुरचे होते
ते आज घरचे झाले
म्हणूनच सत्तेबाहेरचे
आज सत्तेवरचे झाले

ज्यांना फूल समजले
तेच कधी काटे असतात
जिकडे खाऊ तिकडे भाऊ
असे सत्तेचे नाते असतात,.?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, २१ मार्च, २०१७

तडका - सत्तेचे सुत्र

सत्तेचे सुत्र

कोणाला करावं जवळ
कोणाला लोटावं दूर
हे सांगणं अवघड की
कुठे कोणाचे जुळतील सुर

ज्यांना केला विरोध त्यांना
कधी जवळ करावे लागते
राजकीय डावपेच साधत
या सत्तेचे सुत्र हेरावे लागते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, १९ मार्च, २०१७

तडका - वादग्रस्त विशेष

वादग्रस्त विशेष

जे भडक भडक बोलले
ते कडक कडक चालले
जे जपुन जपुन बोलले
ते अडत अडत चालले

ज्यांनी ऊठवले वाद
त्यांचाच घुमतोय नाद
वादग्रस्त विशेषांना
मिळु लागली साद

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, १८ मार्च, २०१७

तडका - गाजर

गाजर

दिसायला आकर्षक
चविलाही छान आहे
वृत्ती बद्दल बोलताना
गाजरालाच मान आहे

म्हणूनच कित्तेकांचे मनंही
गाजरावरच कलले जातील
होणार्या कित्तेक आंदोलनांत
हमखास गाजर खाल्ले जातील

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, १७ मार्च, २०१७

तडका - हमी

हमी

वार आणि प्रतिवारात
आता हमी मागु लागले
शेतकरी कर्ज माफी वरून
शाब्दिक तोफा डागु लागले

आत्महत्या का होतात इथे
हि बाब लक्षात घ्यायला हवी
शेतकर्याला समजुन घ्यायची
आता हमीही द्यायला हवी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, १६ मार्च, २०१७

तडका - कर्ज माफी

कर्ज माफी

डोईवरच्या कर्जाची
मनामध्ये चिंता आहे
अवकाळी गारपीटीचा
नशिबातही गुंता आहे

शेतकर्याचा कर्जबाजार
हि तर सरपटणारी बाब
पण कर्जमाफीने होईल
क्षणिक सुखाचा लाभ

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, १५ मार्च, २०१७

तडका - अवकाळी तोरा

अवकाळी तोरा

त्याच्याच कारणाम्याने तो
बेभरवशाचा होऊ लागला
नुकसानाचीच हमी घेऊन
आता निसर्ग येऊ लागला

वादळासह गारांचाही
भयानक मारा आहे
मना-मनाला टोचणारा
हा अवकाळी तोरा आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, १४ मार्च, २०१७

तडका - अवकाळ वार्ता

अवकाळ वार्ता

जेव्हा जेव्हा गरज होती
तेव्हा मुद्दामहून दडला तो
पण जेव्हा आवश्यकता नाही
तेव्हा मुद्दामहून गडगडला तो

त्याची जुनी कारकिर्दही
आता मनाला चिरते आहे
ती अवकाळी पाऊस वार्ता
मनात धडधड भरते आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, १३ मार्च, २०१७

तडका - कर्ज माफी

कर्ज माफी

आतुन आणि बाहेरूनही
नार्यावरती नारे झाले
शेतकर्याची दयना पाहून
कर्जमाफीचे वारे आले

शेतकर्यांना कर्ज माफी व्हावी
हा तळमळीचा सुर आहे
तरी मात्र कर्ज माफी पासुन
शेतकरी अजुनही दुर आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - सत्तेची जुळवा-जुळव

सत्तेची जुळवा-जुळव

कधी इकडचे कधी तिकडचे
आपल्या बाजुस ओढावे लागतात
सत्ता स्थापन करण्यासाठी
बहूमताचे आकडे जोडावे लागतात

कारण जिकडे बहूमत असेल
तिकडेच सत्ता घसरत असते
म्हणूनच आकड्यांची जुळवा-जुळव
अविश्वासु राजकीय कसरत असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, १० मार्च, २०१७

तडका - एक्झिट पोल

एक्झिट पोल

गॅरंटी जरी नसली तरी
सहज झोप ऊडवू शकतात
एक्झिट पोलचे आकडे
दाना-दीनही घडवू शकतात

म्हणूनच तथ्य असो की नसो
एक्झिट पोलचा धाक असतो
कधी कधी वाटतो हा मेवा तर
कधी मात्र हा चपराक असतो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - प्रवास

प्रवास

प्रवास म्हटलं की
रस्ते आठवतात
रस्त्यांमधील खड्डे
मनाला सतावतात

खड्यांविना रस्ता हे
कित्तेकांचं स्वप्न आहे
मात्र हल्ली प्रवास म्हणजे
खड्या-खड्यातुन रापणं आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, ८ मार्च, २०१७

तडका - आमचे राष्ट्र

आमचे राष्ट्र

वेग-वेगळ्या जातीसह
वेग-वेगळे धर्म आहेत
तरी आपसातील प्रेमाचे
इथे वाढते मर्म आहेत

विविधतेतील एकात्मतेला
आमचे संविधान साक्ष आहे
अभिमान वाटतो आम्हाला 
हे राष्ट्र धर्मनिरपेक्ष आहे,...

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, ७ मार्च, २०१७

तडका - समाज हित

समाज हित

कितीही नाही म्हटलं तरी
अजुनही इथे दडले आहेेत
अंधश्रध्दाळू भोंदू बाबा
समाजामध्ये वाढले आहेत

घातक अंधश्रध्देला बळी पडून
कुणी चुकुनही ना फसला पाहिजे
भोंदूगिरीपासुन वाचण्यासाठी
समाज जागरूक असला पाहिजे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, ६ मार्च, २०१७

तडका - ऑफरचे सत्य

ऑफरचे सत्य

एकापेक्षा एक ऑफर
मोबाईल सांगु लागला
कॉलिंग दर अन् डेटा दर
नव्या नव्याने रंगु लागला

वेग-वेगळ्या कंपणी कडून
आपली वेग-वेगळी वाघर आहे
या नव-नविन ऑफर म्हणजे
ग्राहक खेचण्याचे गाजर आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, ५ मार्च, २०१७

तडका - आजचा प्रश्न

आजचा प्रश्न

आता मनाला तीची आस
भलतीच लागली आहे
पण ती कठोर मनाने
अशी का वागली आहे,.?

तीला शोधत शोधत आता
ऊन्हाने काया भाजली आहे
पण ती दुर्मिळ झालेली छाया
मानवी कुकर्मामुळेच त्रागली आहे,.?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - वृक्ष सखा

वृक्ष सखा

सरसर चढतोय पारा
ऊन्हाचा वाढला जोर
शितल सावली शोधण्या
जीवाचा वाढला घोर

दिवसें-दिवस भयानक
आता ऊन होऊ लागले
ऊन्हापासुन वाचताना
वृक्ष आसरा देऊ लागले

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, ३ मार्च, २०१७

तडका - सेल्फि पॉइंट

सेल्फि पॉइंट

सेल्फि ही फॅशन असली तरी
सेल्फि पॉइंट गरज झाली आहे
म्हणूनच सेल्फि पॉइंट वाचवण्या
सेल्फि पॉइंट चर्चा ओली आहे

सेल्फिला केंद्रस्थानी ठेऊनच
कधी भलेमोठे ऊठाव होतील
अन् भविष्यातील मोर्चे आंदोलनं
"सेल्फि पॉइंट बचाव" होतील

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, २ मार्च, २०१७

तडका - आमची इच्छा

आमची इच्छा

जिच्यावरती विश्वास ठेऊन
केले निवडणूकीय खटा-टोप
तीच्याच विश्वासाहर्तेवरतीही
आता होऊ लागले नवे आरोप

आमची प्रांजळ इच्छा आहे
मतदान पध्दत डमी नसावी
निवडणूकीय माध्यमांमध्ये
पारदर्शकतेची कमी नसावी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, १ मार्च, २०१७

तडका - पोकळ दावे

पोकळ दावे

पुढे काय होणार याची
जरी मनाला खात्री नसते
तरी पुढे काय करायचं
याची मनात चतुसुत्री असते

दुरगामी विचार कधी कधी
पोकळ दावे पेरून जातात
तर पोकळ दावेही कधी कधी
भरीव काम करून जातात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३