हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०१७

तडका - मनाचा बाक

मनाचा बाक

नको त्या गोष्टींचं मन
नको तितका विचार करतं
गरज नसताना देखील
ऊगीच भलता प्रचार करतं

मात्र आवश्यक गोष्टींकडे
कधी डोळेझाक असते
मनाची हिच तर प्रवृत्ती
आपल्या मनाचा बाक असते

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, ३० ऑगस्ट, २०१७

तडका - सल्ला पावसाळी

सल्ला पावसाळी

पडल्या मोठ्या पावसाने
शहरं तुडूंब भरले आहेत
दैनंदिन लाइफ ठप्प करण्या
पावसाने लोकं घेरले आहेत

पण एकमेका सहाय्य करा
माणुसकीत मागे हटु नका
पावसाचा घेत गैरफायदा
लोकहो लोकांस लुटु नका

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, २८ ऑगस्ट, २०१७

तडका - वैचारिक क्रांती

तडका - चालक बंधुंनो

रस्त्यावरचा प्रवास
हल्ली गरजेचा आहे
प्रवास सुरक्षिततेचा प्रश्न
यात बेरजेचा आहे

म्हणूनच चालक बंधुंनो
अपघात कारण ठरू नका
जागरूकता ठेवा जराशी
नियमोलंघन करू नका

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, २७ ऑगस्ट, २०१७

तडका - सामाजिक सत्य

सामाजिक सत्य

हि पहिलीच गोष्ट नाही
याला मोठी स्मृती आहे
गुन्हेगारांचं समर्थन करणे
हि भयाण विकृती आहे

गुन्हेगारांच्या समर्थनाला
नको तिथे लढले आहेत
अशा अंध भक्तांमुळेच
भोंदु बाबा वाढले आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०१७

तडका - पडताळणी

पडताळणी

नैतिक सुरक्षिततेचे बंध
सहज ऊसवले जातात
भाविक भाऊक होतात
म्हणून फसवले जातात

फसवेगीरीला समाजात
फेटाळणी दिली पाहिजे
भोंदु बुवांची भक्तांनीच
पडताळणी केली पाहिजे

अॅड. विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, २४ ऑगस्ट, २०१७

तडका - मेक-अप आणि चेहरे

मेक-अप आणि चेहरे

आतले वेगळे आणि
बाहेर वेगळे दावले जातात
चेहर्यावरती मटेरियलचे
लेपच्या लेप लावले जातात

लहान आहेत,तरूण आहेत
मेक-अपचे वृध्दही फॅन आहेत
पण कितीही करा मेक-अप
नॅचरल चेहरेच छान आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, २३ ऑगस्ट, २०१७

तडका - भ्रष्टाचार

भ्रष्टाचार

यांनी केले,त्यांनीही केले
आरोपावर आरोप आहेत
भ्रष्टाचार थांबवा जनतेचे
निरोपावर निरोप आहेत

पण ना भ्रष्टाचार थांबतोय
ना विकासही धावतो आहे
होऊ लागल्या विकासाला
इथे भ्रष्टाचारी चावतो आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, २२ ऑगस्ट, २०१७

तडका - वचन

वचन

पाऊस पाऊस करता
आला मोठाच पाऊस
हे शेतकरी राजा तु
नकोच आता भिऊस

हमखासच तुझं पिकही
आनंदाने डोललं जाईल
आशा अहे सरकारचंही
वचन चोख पाळलं जाईल

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, २१ ऑगस्ट, २०१७

तडका - बैल पोळा

बैल पोळा

रंगी-बेरंगी रंगांनी
नटवले सारेच बैल
पाऊसही बरसला
हर्षही झाला सैल

पोळ्यासह पावसामुळे
आनंदाने मन हसु लागले
बैलांच्या या सोहळ्यात
माणसं खुश दिसु लागले

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, १९ ऑगस्ट, २०१७

तडका - व्हाटस्अप डि पी

व्हाटस्अप डि पी

सांगायची गरज नाही
सरळ सरळ कळतंय
व्हाटस्अपचं डि पी ही
खुप काही बोलतंय

मनातील आनंद,रूसवा
ऊघड ऊघड दावतंय
मन व्यक्त व्हाया मन
डि पी कडेच धावतंय

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०१७

तडका - आमिष

आमिष

अमिषाचे गाजर
दाखवले जातात
विविध प्रकारे मनी
हे डकवले जातात

एकामागुन एक असा
अमिषांचा क्रम असतो
पण कुठे विश्वास ठेवावा
हाच मोठा संभ्रम असतो

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, १७ ऑगस्ट, २०१७

तडका - आधार

आधार

डिजिटलचे फॅड बघा
झपाट्याने येऊ लागले
जनावरांचे देखील आता
आधारकार्ड होऊ लागले

डिजिटलच्या युगात गुरे
अजुन पुढे जंप घेतील
शासकीय योजनांसाठी
जनावरांचे संप होतील

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - शेती

शेती,...!

पावसाची लांबण पाहून
जीव आमचा तुटतो आहे
सापक्या-सिपक्याचाही
मनी आधार वाटतो आहे

आशेवरती जगत जगत
सारी जिंदगी गेली आहे
ब्ल्यु व्हेलपेक्षाही भयाण
अहो ही शेती झाली आहे,.?

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, १४ ऑगस्ट, २०१७

हे देशबंधुंनो

हे देशबंधुंनो

हे स्वातंत्र्य,ऊगी-ऊगी ना
ठेवा जरा याची जाण
शान जपावी सदैव याची
तुम्हा स्वातंत्र्याची आन

लढले वीर ते झुकले नाही
होते हो पराक्रमाची खाण
स्वातंत्र्य दिन हे देण्या देशा
दिधली फासावरती मान

जळला जीव तो,मना-मनातुन
पेटवले स्वातंत्र्याचे ऊधाण
शत्रुंसंगे हो लढता-लढता
त्यांनी केले जीवाचे रानं

त्यांचे बलीदान व्यर्थ ना गेले
सांगते हे इतिहासाचे हो पान
त्यांच्या बलीदानामुळेच तर
भेटला हा स्वातंत्र्याचा बहूमान

आज सुखाने,अभिमानाने
याचे गातो आम्ही गुनगाण
न्याय,हक्क,समता,स्वातंत्र्य
आम्हा देते आमचे संविधान

तरीही सांगतो हे देशबंधुंनो
तुम्ही आहात या देशाचा प्राण
अपमान होईल,या देशाचा
असे करू नका कोणतंच कामं

कणा-कणाने कमवावे यश
पण होऊ नका हो बेभान
यश सदैव तर तुमचेच आहे
पण वाढवा जरा अवसानं

आप-आपसातील जपावे प्रेम
अन् जपावा स्वाभिमान
तरच वाढेल,टिकुन राहिल
अहो हा स्वातंत्र्याचा त्राण

जगभरात देखील ठरला ग्रेट
आमचा देश हा जनता प्रधान
शान जपावी सदैव याची
तुम्हा स्वातंत्र्याची आण

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - तिरंगा

तिरंगा

तिरंगा आहे शान
तिरंगा आहे जान
स्वतंत्र या देशाचा
तिरंगा आहे मान

वाढवु याची शान
वाढवु याचा मान
देता सलामी तिरंग्यास
अंगात वाढतो त्राण

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - गेम एक व्यसन

गेम एक व्यसन

गेमचे नव-नवे पाडाव
मनात रूतले जातात
मग लहानांसह मोठेही
सहजपणे गुतले जातात

हे व्यसन आहे असं की
सहज नाद सुटत नाही
सांगा कोण गॅरंटी देईल की
गेम माणसाला लुटत नाही

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, १३ ऑगस्ट, २०१७

तडका - शेतकरी लाइफ

शेतकरी लाइफ

केली केली म्हणत
अजुनही लांबवली
आश्वासनं देऊनही
कर्जमाफी थांबवली

शेतकर्याची जिंदगी
दु:खाने ओली आहे
जनतेची दिशाभुल
सरकारने केली आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, १० ऑगस्ट, २०१७

तडका - पाठराखणी

पाठराखणी

आपल्याला बाबु अन्
लोकाच्याला कारटं आहे
आपल्याच्या पाठराखणीस
जो तो इथे स्मार्ट आहे

आपल्याची पाठझाकणी
सहज टाळता टळत नाही
पण हा गैरसमज नसावा की
लोकांना काही कळत नाही

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - अश्वासनीय गत

अश्वासनीय गत

फुकट जमतात म्हणुन
कितीही दिले जातात
कर्तव्य दुर पण आधी
आश्वासनं केले जातात

वेळ मारून नेण्यासाठी
भयान खेळी खेळली जाते
अन् आश्वासनांची पुर्ती ही
सहजरित्या टाळली जाते

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, ७ ऑगस्ट, २०१७

तडका - सदाभाऊ

सदाभाऊ

जसे जमले असेल तसे
आतापर्यंत ढकलले
पण आता नाइलाजाने
पक्षाबाहेर हाकलले

सोबत असताना आपुलकीने
सदा भाऊ समजले असतील
पण हाकालपट्टीस कारण की
सदाभाऊ समजले असतील

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, ६ ऑगस्ट, २०१७

तडका - रीत

रीत

पारंपारिक ऊत्सवाला
नव्याने धाटणी आहे
मना-मनात वाढलेली
प्रेमाची ही दाटणी आहे

भहिण-भावांच्या प्रेमाची
हमखास न्यारी आहे
खात्रीने खात्री पटू शकते
हि रीतच भारी आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, ५ ऑगस्ट, २०१७

तडका - सेल्फीचा नाद

सेल्फीचा नाद

सेल्फी काढणं म्हणजे
अगदी सोपं काम आहे
हा सेल्फीचा नाद बघा
ज्याला-त्याला जाम आहे

सेल्फीच्या मोहात माणूस
सहज सहज गुतु शकतो
पण सेल्फिचा नाद कधी
जीवावरतीही बेतु शकतो

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०१७

तडका - आधारचा आधार

आधारचा आधार

माणसाच्या मृत्युनंतरही
आधार जपावं लागेल
मृत्यु सिद्ध करण्यालाही
आधार दाखवावं लागेल

मरणानंतरही कामाचा हा
आधार कार्डचा प्रुफ असेल
मरणोत्तर आधारकार्डांचाही
आता घरा-घरात ग्रुप असेल

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - कणखर सल्ला

कणखर सल्ला

आपल्याला जपायचं
लोकाला टोचायचं
अहो बंद करा हो हे
आता नाहिच पचायचं

निपक्ष:पाती इमानदारीने
मना-मनातुन फिरवा हो
आपला असो की लोकाचा
दोषीला दोषीच ठरवा हो

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, २ ऑगस्ट, २०१७

तडका - डाय गेम

डाय गेम

टाइमपासचा भाग नाही
घात-पाताचा डाव आहे
जीवघेण्या भयानक गेमचे
हल्ली चर्चेमध्ये नाव आहे

तंत्रज्ञानी बाबींपुढे पहा
मानव देखील हरू शकतो
टाइमपासचा भाग देखील
आता जीवघेणा ठरू शकतो

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, १ ऑगस्ट, २०१७

तडका - विश्वास

विश्वास

कितीही केलं कुंपण तरी
शेताला धोका आहेच हो
कुंपण करील रक्षण याची
मनातही शंका राहेच हो

ज्यांचा धीर वाटायला हवा
त्यांचीच भीती वाटते आहे
सामाजिक विश्वासाची दोरी
इथे विश्वासबाह्य तुटते आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३